Socail media वरील अनेक बातम्या मधून लसी बाबत अनेक उलट सुलट बातम्या देण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते. खरं तर या प्रकार च्या बातम्या मुळे सर्व सामान्य जनतेला दिलासा कमी आणि गोंधळ जास्त मिळत आहे.
खरं काय हे कोणालाच माहिती नसावं हे यावरून दिसत आहे. खरतर लसीकरण म्हणजे संजवीनी नाही की अमृतही नाही की जी घेतलं की आपणास काहीच होणार नाही. मन मर्जीने आपण वागू शकतो असेही नाही तर लसीकरण ही मृत्यू प्रमाण रोखणे, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच कोरोना लागण झाल्यास त्याचे गम्भीर परिणाम पासून सुटका मिळणार आहे, घरच्या घरी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन त्यातून लवकर बरे होता येणार आहे
लस घेतल्यावरही त्रिसूत्री च पालन करावंच लागणार आहे.
तेव्हा या बातम्या वाल्यानी लसी बाबत योग्य जन जागृती करून जास्तीत जास्त लसी करण मोहिमेत जनता कशी सहकार्य करेल याकडे लक्ष द्यावं.
अजून विशेष बाब म्हणजे याबाबत केंद्र सरकार किंवा आरोग्य यंत्रणा कधी काहीच माहिती जाहीर करताना दिसत नाही, मग यांनाच ही माहिती मिळते तरी कोठून, बरं हे टीव्ही चॅनेल वर या बाबत चे लाईव्ह टेलिकास्ट ही करताना दिसून येत नाहीत.
Social media वर धडाधड बातम्या प्रकशित करण्यात यांचा सपाटा असतो
Social media वर हजारो लोक ऍक्टिव्ह असतात त्यांना अशा प्रकारच्या बातम्या निश्चितच त्रास दायक ठरत असणार तेव्हा...
सर्वच लसी या अतिशय उपयुक्त आहेत या मध्ये वर्गीकरण करून बातम्यावाल्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये हीच अपेक्षा...