डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स (DNYS)
प्रवेश सुरू
पंचमहाभुतांनी निसर्ग तयार झाला आहे आणि निसर्गातील प्रत्येक सजीवही पंचभुतांनीच तयार झाला आहे. मानवी शरीरही पंचभुतांनीच तयार झाले आहे. एक प्रकारे आपण निसर्गाचेच आपत्य असल्यामुळे निसर्ग आपल्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत आसतो. पण आपण बुद्धीजीवी निसर्ग नियमांना पायदळी तुडवून आजारांना निमंत्रण देत आहोत. याचा परिणाम आपली आरोग्य शक्तीच क्षीण होत चालली आहे.
निसर्ग उपचार केंद्र सुरू करता येण्यासाठी भारत सरकार नोंदणीकृत उद्यमिता प्रशिक्षण केंद्रा मार्फत डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स प्रशिक्षणाचे प्रवेश सुरू होत आहेत.
हे प्रशिक्षण 23/6/2024 पासून प्रत्येक रविवारी दु. 11.00 ते 1.30 असे एक वर्ष कालावधीचे असेल.
यामध्ये शरीरशास्त्र, शरिराला होणारे आजार व त्याची शास्त्रोक्त कारणे, शुद्ध निसर्गोपचार नियम, निसर्गोपचाराच्या विविध पद्धती यांमध्ये नाभीपरिक्षण,स्नेहन, स्वेदन( शास्त्रोक्त मसाज), शरिरशुद्धी(विषद्रंव्ये शरीराबाहेर काढणे ), विविध चिकित्सा पध्दती यामध्ये जलचिकित्सा, मडथेरपी, कुंजीर, हीपबाथ, कॅल्शिअम बाथ, एनिमा, एक्युप्रेशर शास्त्रोक्त पद्धतीने प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहेत. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहीती साठी व प्रवेशप्रक्रियेसाठी
महेश कुलकर्णी , राजधानी टाॅवर्स, राजवाडा बसस्टाॅपजवळ सातारा
येथे संपर्क साधावा. 9822397384.
फी किती आहे आणि वयाची मर्यादा आहे का?
ReplyDelete