निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर
निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर 2001 पासून कार्यरत आहे. सर्वांगीण आरोग्याला महत्व देवून असलेले आरोग्य टिकवणे व विविध आजारांवर उपचार करताना आयुर्वेद, योग व पंचकर्माचा उपयोग करणे हा या सेंटरचा प्रमुख हेतू आहे.
याठिकाणी खालील प्रकारचे उपचार केले जातात.
विविध आजारांवरील उपचार
संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यांचे आजार, पॅरलेलीस, पचनाच्या तक्रारी, पित्ताचा त्रास, कावीळ, मुळव्याध, मुतखडा, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, जुनी सर्दी, बाळदमा, दमा, त्वचा विकार, नागिण, विस्मरण, मानसिक ताण-तणाव, महिलांच्या पाळीच्या तक्रारी इ. आजारांवर उपचार केले जातात.
पंचकर्म उपचार
शरीराचे आरोग्य टिकवणे तसेच आजार बरा करण्यासाठी शरीर शुद्धीची प्रक्रिया म्हणजे पंचकर्म होय. निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर येथे शास्त्रोक्त पंचकर्माची सोय उपलब्ध आहे.
आयोम
शरीर व मनाचे बळ वाढविणारी तसेच संतुूलन साधणारी आयुर्वेद, योग, समुपदेशन, मनोविज्ञानावर आधारीत "आयोम" या विशेष उपचार पद्धतीची सोय आमचे सेंटरमध्ये उपलब्ध. याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. SBN 24 तास या सातारा येथील टि. व्ही. चॅनेलने मुलाखतीच्या स्वरुपात आयोम चे महत्व सांगणारे 103 भाग प्रसारित केले आहेत.
ध्यानगर्भ
आनंदी, आरोग्यसंपन्न व समृद्ध जगणे महत्वाचे आहे. यासाठी निसर्ग नियमांचे रहस्य समजून घेत मनाच्या गाभा-यात घेऊन जाणारा ध्यानगर्भ हा विशेष उपक्रम राबवला जातो.
समुपदेशन
सर्वांगिण विकास साधण्यासाठी मूले व पालकांना समुपदेशन केले जाते. मूले व पालकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात.
बुद्धी, स्मृती, एकाग्रता
आयुर्वेद व योगाचा प्रभावी वापर करुन बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे.
उंची
मुलांची वयाप्रमाणे उंची कमी असल्यास उंची वाढवणारे उपचार केले जातात.
गर्भसंस्कार
सदृढ, सुंदर, सुजाण, सुसंस्कृत व विवेक्युक्त भावी पिढीच्या जडणघडणीस उपयुक्त गर्भसंस्काराचे मार्गदर्शन केले जाते. विस्तृत माहितीसाठी व्हिडीओ पहा... गर्भसंस्कार
सुवर्णबिंदू प्राशन
लहान मुलांच्या प्रतिकारशक्तीसह स्मरणशक्ती वाढवणारे सुवर्णबिंदूप्राश हे विशेष औषध उपलब्ध आहे.
आहार मार्गदर्शन
आयुर्वेदाने सर्वांगीण आरोग्यासाठी आहाराचे महत्व सांगितले आहे. सर्व वयोगटातील तसेच विविध आजारांसाठी आहार मार्गदर्शन केले जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क
निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म
डॉ. मोहन सोनावणे (आयुर्वेदाचार्य) | डॉ. सौ. ज्योती सोनावणे (आयुर्वेदाचार्या)
संपर्क मोबाईल नंबर + 91 985 095 9842
No comments:
Post a Comment