Translate

Tuesday, October 19, 2021

Autumn | October Heat

 शरद ऋतू | ऑक्टोबर हीट


साधारणतः पावसाळा संपून ऑक्टोबर महिना सुरू झाला की वातावरण सूर्याची हुकूमत पुन्हा डोकावते. आयुर्वेद वर्णित शरद ऋतू आधुनिक नुसार ऑक्टोबर हीट हे शब्द नित्य दिनचर्येत प्रकर्षाने जाणवू लागतात.वातावरणात पर्यायाने शरीरात वाढलेली उष्णता जाणवू लागते.

ऋतुबद्दल एक ऋतू संपून जेंव्हा दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळी बाह्य वातावरणात झालेले बदल पर्यायाने शरीरात विविध व्याधी परिस्थिती निर्माण करते.आपल्या पूर्वजांना या गोष्टीचे ज्ञान होते.त्यामुळे ऋतुंबदल झाल्यावर पुढील ऋतुप्रमाणे आपला आहार विहार दिनचर्या यात बदल करणे आयुर्वेदानुसार अनिवार्य आहे आणि असे बदल आपण केले नाहीत तर आपण बदललेल्या वातावरणाने लगेच आजारी पडतो ही गोष्ट पाहायला मिळते.

वर्षा ऋतू अर्थात पावसाळ्यात शरीर अवयवांना थंडीची सवय झालेली असते.ऑक्टोबर शरद ऋतू मध्ये अचानक सूर्य संताप वाढतो.या काळाला ऑक्टोबर हीट किंवा second summer म्हणतात.

या काळात पित्त दोष मोठ्या प्रमाणात वाढून पित्ताचे विकार जसे की अंगावर पित्त, गांधी उटणे.हात पाय डोळे शरीर याची आग होणे,तोंड येणे,रांजणवाडी नाकामध्ये फोड येणे होतात.

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिले की नाक गळणे सर्दी शिंका ताप कणकण चक्कर अशक्तपणा थकवा या गोष्टी हटकून होतात.

यासाठी या ऋतूमध्ये आहारात गुलकंद,मोरावळा,आवळा,पेठा, मनुके,बेदाणे,सुके अंजीर,खडीसाखर ,चंदन यांचा समावेश करावा.

तिखट मसालेदार आले लसूण मिरची दही मासे अंडी शेवगा शेपू मेथी शिमला मिर्च या उष्ण गोष्टींचा अतिरेक टाळावा.

उन्हामध्ये काम करणे उन्हात फिरणे टाळावे फिरायचे झाल्यास डोक्यावर टोपी छत्री वापरावी.अंगाला खोबरेल तैल चंदन तैल सारखी शीत तैल वापरावीत.

एका ऋतूचा शेवटचा आठवडा व पुढे येणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा याला आयुर्वेदात ऋतुसंधी म्हणतात. यावेळी पूर्वीच्या ऋतूची दिनचर्या विधी त्याग करून सुरू होणाऱ्या ऋतूच्या वातावरणातील बदलानुसार दिनचर्या विधी क्रमाने प्रारंभ करावा.तो विधी एकदम बंद किंवा सुरू केल्याने त्याची सवय नसल्यामुळे आजार निर्माण होतात.उदा. आपण अचानक उन्हात फिरले काम केले की ऑक्टोबरमध्ये लगेच आजारी पडतो.

"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।"

वैद्य राहुल चव्हाण वैद्या सुमिता चव्हाण

शाश्वत आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक व केशायुर्वेद ब्रँच सातारा

shashwatayurvedic.com

Mo. 9421619384

7 comments:

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...