दिवाळी म्हणजे विविध पदार्थांची रेलचेल
सगळ्या सणांचा राजा दिवाळी हा सण आहे या सणाला उत्साहाचा आनंदाचा भरभराटीचा सण म्हणूनही ओळखलं जाते.
या सणाला भरपूर खरेदी केली जाते नवीन कपडे नवीन वस्तू नवीन गाडी नवीन मोठ्या वस्तू यांची खरेदी या सणाला होत असते त्याचबरोबर वेगवेगळ्या लज्जतदार पदार्थांची रेलचेल या सणांमध्ये घरामध्ये असते.
लाडू ,चकली ,करंजी, शेव, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे ,बालुशाही, अनारसे ,शंकरपाळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असे अनेक पदार्थ दिवाळीमध्ये करण्याची, खाण्याची हौस आणि मौज मोठी वेगळीच असते. परंतु आता नवरा आणि बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे किंवा कामा निमित्त बाहेर पडत असल्यामुळे हे सगळे पदार्थ करायला वेळच शिल्लक उरत नाही आणि म्हणूनच या पदार्थांच्या व्यवसायाला फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.
गौरी गणपती आणि दिवाळीच्या सणाच्या वेळी या पदार्थांना बाजारात मोठी मागणी असते.
या उद्योग संधीचा फायदा घेता येण्यासाठी उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,सातारा येथे दिवाळी स्पेशल या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण 22 ऑगष्ट ते 26 ऑगष्ट 2022 असे 5 दिवस 11 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे .
यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून मोतीचूर लाडू, रवा लाडू ,बेसन लाडू ,मुग लाडू ,रवा बेसन लाडू,वेगवेगळ्या प्रकारच्या करंजा ,चकल्या ,शेवेचे वेगवेगळे प्रकार ,शंकरपाळी, चिवड्याचे वेगवेगळे प्रकार यामध्ये भाजके पोह्यांचा चिवडा, लक्ष्मीनारायण चिवडा, तळून करण्याचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा, लक्ष्मिनारायण चिवडा, असे विविध प्रकारचे चिवडे कडबोळी, अनारसे, बालुशाही, चिरोटे, दोन कलर बर्फी, तीन कलर बर्फी,काही वेगळे मिठाईचे प्रकार अशा अनेक पदार्थ यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून शिकवले जाणार आहेत.
या पदार्थांना महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तर मागणी आहेच याशिवाय आला परदेशातही खूप मोठी मागणी आता मिळू लागले आहे .म्हणून वेगळी व्यवसाय संधी म्हणून त्याच्याकडे आता बघितले जाते .
अधीक माहितीसाठी व प्रवेशासाठी
संचालक श्री. महेश कुलकर्णीसर
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा.
फोन नं. 9822397384