Translate

Sunday, January 22, 2023

Snack center or fast food center training


 

अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये अतिशय झपाट्याने वाढणारी इंडस्ट्री म्हणून स्नॅक सेंटर आणि फास्ट फूड सेंटर याकडे बघितलं जाते. प्रचंड मागणी असणारे असे हे क्षेत्र आहे. स्वतः चा उद्योग सुरु करणे हे तेवढस अवघड नाही कारण भांडवल गुंतवणूक त्या तुलनेने कमी लागत असते आणि प्रॉफीट परसेंटेज  ४० टक्क्यापेक्षा जास्त असल्यामूळे या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे.

रुचकर, चटपटीत असणा-या टेस्टमूळे अनेकांची पावले स्नॅक सेंटरकडे त्याचबरोबर फास्ट फूड सेंटर कडे पुन्हा पुन्हा वळत असतात. त्यामुळे   स्नॅक सेंटर आणि फास्ट फूड सेंटर नेहमीच भरभरुन चालताना आपल्याला दिसतात. स्नॅक सेंटर किंवा फास्ट फूड सेंटर सुरु करुन चांगले पैसे कमविता येण्यासाठी उद्यमिता विकास ट्रैनिंग सेंटर प्रशिक्षण केंद्र सातारा येथे दि. दि. २६.०२.२०२४ ते २८.०२.२०२४ , (३ दिवस ) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

या प्रशिक्षणा अंतर्गत

स्नॅक्स : वडापाव, मिसळ, पोहे, उपमा, शिरा, पुरीभाजी, पाव भाजी, भजी, साबुवडा, मेदूवडा, टोमॅटो ऑम्लेट, मसाला डोसा, स्पन्ज डोसा, दावनगिरी डोसा, लोणी डोसा, उत्तपा, आप्पे, थालीपीठ, इडली सांबर, पनीर क्रिस्पी, पनीर चिली, चायनीज भेळ, ट्रिपल राईस, ट्रिपल नूडल्स, हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, नूडल्स हॉंगकॉंग, फ्राईड राईस, व्हेज मन्चुरिअन, व्हेज लॉलीपॉप, सोया फ्राय, व्हेज शोरमा.

फास्ट फूड : भेळ, पाणीपुरी, एस पी डी पी, रगडा पुरी, रगडा पॅटिस, मसाला पुरी, कच्छि दाबेली, स्प्रिंग पोटॅटो, फ्रुट सॅलेड, बदाम शेक, मसाला दूध इ. चे प्रोफेशनल प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण समाप्तीनंतर प्रमाणपत्राही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले नंतर व्यवसायासाठी स्वत:चे युनीट सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन सुमारे 22 वर्षांचे पदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींकडून देण्यात येणार आहे. याच बरोबर व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी देखील योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Join Whats app Snack center or fast food center training Group

तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क ९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा.

Sunday, January 15, 2023

Google Doodle Pays Tribute to Khashaba Dadasaheb Jadhav, India's First Athlete To Win Olympic Medal

ऑलिम्पिक पदक जिंकणारे भारताचे पहिले खेळाडू खाशाबा दादासाहेब जाधव यांना गुगल डूडलने श्रद्धांजली वाहिली.

गुगलने रविवारी 15 जानेवारी 2023 खाशाबा दादासाहेब जाधव यांना त्यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त खास डूडलद्वारे आदरांजली वाहिली. श्री जाधव हेलसिंकी येथे 1952 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक खेळाडू म्हणून स्मरणात आहेत. नामांकित कुस्तीपटूला श्रद्धांजली वाहताना, डूडलमध्ये त्याचे स्केच दाखवण्यात आले आहे ज्यामध्ये तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्यास तयार आहे.


Republic Day Sale

Peter England Men Shirt under 999

Raymond Men Shirt under 999

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...