डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरामध्ये आहे.डोळ्यामुळेच आपण हे सुंदर सृष्टी पाहू शकतो, आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी आनंदी करण्यासाठी, डोळे हे आपले अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.सध्याच्या जीवनशैलीमुळे खूप लवकर डोळ्यांच्या अनेक तक्रारी खूप कमी वयात सुरू झालेल्या दिसून येतात.चष्मा लागणं ही आता वयावर अवलंबून असणारे गोष्ट राहिलेली नाही.अगदी लहान वयापासून चष्मा लागण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसून येते त्याचमुळे चष्मा तयार करून देण्याच्या व्यवसायाला फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.
नेत्रतज्ञ म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी चष्मा निर्मिती आणि चष्मा दुकान सुरू करता येण्यासाठी भारत शासन नोंदणीकृत उद्यामिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा आयोजित डिप्लोमा इन ऑप्टोमेट्रीस्ट प्रशिक्षण कार्यक्रम सातारा येथे सुरू होत आहे. एक वर्ष कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १२/०२/२०२४ असून यामध्ये डोळ्यांची रचना त्याचे कार्य डोळ्यांचे आजार नंबर चे प्रकार चष्म्याचे प्रकार चष्मा तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध मशिनरींचे माहिती त्याचा वापर चष्मा तयार करणे चष्मा दुरुस्त करणे असा सर्व सखोल अभ्यास शिकवण्यात येणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भारत शासनाच्या प्लानिंग कमिशन द्वारा स्थापित भारत सेवक समाज या टेक्निकल .बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्वतःचे चष्मा तयार करण्याचे दुकान सुरू करणे, चष्मा दुरुस्ती व विक्रीचे दुकान सुरू करणे, त्याचबरोबर डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या कडेे नेत्रतज्ञ या पदावर नोकरी मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम शासनाने प्रारित केलेला आहे.
या प्रशिक्षणात प्रवेश मर्यादित असून पात्रता दहावी पास व त्यापुढे आहे.या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी महेश कुलकर्णी संचालक उद्यामिता विकास प्रशिक्षण केंद्र राजधानी टॉवर , तिसरा मजला राजवाडा बस स्टॉप जवळ सातारा फोन नंबर 98 223 97 384 येथे संपर्क साधावा.