Translate

Wednesday, June 9, 2021

Satara's delicious identity Dadaj Biryani साताऱ्याची लज्जतदार ओळख दादाज् बिर्याणी

 साताऱ्याची लज्जतदार ओळख "दादाज् बिर्याणी"



साताऱ्याच्या खाद्यसंस्कृतीत मागील काही वर्षांत अनेक नव्या ब्रँडची भर पडली आहे. सातारची दादाज् बिर्याणी हा ब्रँड त्यापैकी एक. एखाद्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर कष्ट घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी असेल तर छोट्या व्यवसायाचं अल्पावधीत मोठ्या व्यवसायात रूपांतर करता येतं. याच उत्तम उदाहरण म्हणजे दादाज् बिर्याणी हाऊस. श्रीकांत व प्रशांत या फडतरे बंधुंनी १४ वर्षांपूर्वी हॉटेलिंगच्या व्यवसायात उतरून तो यशस्वी करुन दाखविला आहे. साधारण १६ वर्षांपूर्वी आपल्या चुलत भावांसोबत भू विकास बँक चौकात (सातारा पेट्रोल पंपाशेजारी) चहा व वडापावचा गाडा सुरू केला. व्यवसाय छोटा असला तरी स्वप्न मात्र मोठी होती. 

सगळेच  करतात त्यापेक्षा वेगळ्या व्यवसायाची गणितं मांडली गेली. दहा-पंधरा वर्षांपूर्वी स्पेशल बिर्याणी खिलवणारी हॉटेलं साताऱ्यात नव्हतीच असं म्हटलं तरी चालेल. मेन्यू पक्का झाल्यानंतर १३ ऑगस्ट २००७ रोजी शाहू स्टेडियममध्ये (सातारा पेट्रोलपंपासमोर) एका गाळ्यात दादाज् बिर्याणी हाऊसचा शुभारंभ झाला. अवघ्या दोन कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू झालेलं हे बिर्याणी हाऊस आज ५० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे.  



आज इथे व्हेज व नॉनव्हेज अशा मिळून सव्वाशेपेक्षा जास्त डिश बनवल्या जातात. दादाज् म्हटलं की इथली लज्जतदार बिर्याणी आणि डिलिशियस चिकन तंदूर, एवढी ओळखही पूरेशी ठरते. केवळ अन्न पदार्थांचा दर्जा न साभाळल्याने म्हणा किंवा जास्तीचा नफा मिळविण्याच्या नादात केलेल्या तडजोडींमुळे कोट्यवधींची गुतंवणूक करुन सुरू केलेली रेस्टॉरंट अल्पायुषी ठरल्याची उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. 


दादाज् बिर्याणीमध्ये पदार्थांची चव जपण्याच्या बाबतीत कसलीच तडजोड केली जात नाही. लांब सडक ब्रँडेड तांदळापासून बनवलेली बिर्याणी असो, तंदूर असो अथवा इतर कोणताही पदार्थ... तो बनविण्यासाठी वापरला जाणारा सर्व मसाला घरीच बनविला जातो. बिर्याणीला दम देण्यासाठी गॅस न वापरता फक्त कोळशाचा वापर कटाक्षाने केला जात असल्याने चिकन, मटणाचा अर्क पूरेपूर उतरल्याचा अनुभव घास तोंडात गेल्या गेल्या येतो. घरी बनविलेल्या तुप व दह्यामुळे बिर्याणी आणि तंदूरची ऑथेंटिक चव तुमच्या जिभेवर दरवळत राहते. इथे घरगुती मसाल्यांचा सिक्रेट फॉर्म्युला असल्याने तुमचे पोट बिघडणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. ग्राहक हाच सर्वोपरी मानून श्रीकांत व प्रशांत हे बंधू इथे मालक व कामगार या दोन्ही भूमिकांमध्ये वावरताना दिसतात. रोज सकाळी ६ वाजता भाजी व मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदीपासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो.


सुरुवातीच्या काळात जास्त कामगार ठेवणे परवडत नसल्याने  आई-वडिलांसह दोघा भावांनी कसलीही लाज न बाळगता भांडी धुण्यापासून साफसफाई, प्लेटा उचलण्यासह आचाऱ्याच्या हाताखाली कामे केली. शिकून घेतले. व्यवसाय वाढवायचा, काहीतरी करून दाखवायचे एवढीच जिद्द होती. त्याचा व्यवसाय वाढीसाठीच फायदा झाला. अनेक अडीअडचणी येऊनही चव व दर्जा जपण्यात कसलीच तडजोड केली नाही. परिणामी चव लोकांना आवडत गेली. लोकांनी केलेली स्तुती हेच आमचं मार्केटिंग होतं. त्यामुळे जाहिरातीवर वेगळा खर्च करण्याची गरज पडली नाही. पहिली तीन वर्ष खर्च भागत होता. कर्जाचा हप्ता कधीतरी थकायचा मात्र, या दोघा बंधुंनी हार मानली नाही. ग्राहक व त्याच्या अपेक्षांची पुर्तता करीत गेले. हेच यशाचे गमक ठरले. 

त्यामुळे सुरुवातीला फक्त बिर्याणी व तंदूर हे दोनच पदार्थ होते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेल्यानंतर थाळी व डिश सिस्टिम आली. व्हेज पदार्थ आले. तीन वर्ष संघर्षात गेल्यानंतर व्यवसाय वाढू लागला तर जागा कमी पडू लागली. त्याचवेळी श्रीकांत व प्रशांतचे मामा मदतीला धावून आले. त्यांनी त्यांचे मुंबईतील घर गहाण ठेवून पैसे दिले व आणखी एक गाळा विकत घेतला. जागा वाढल्याने ग्राहकही वाढले. मग मागे वळून बघण्याची गरजच पडली नाही. त्याने त्या एका गाळ्याचे आठ गाळे झाले. त्यासोबतच दादाज् बिर्याणी हाऊसचा पसाराही वाढत गेला. दोन-तीन तासात हजार माणसांचे जेवण बनविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पहिल्या दिवसापासून जपलेली चव व दर्जा हे दादाजच्या आजच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच साताऱ्याचा हा बिर्याणी ब्रँड राज्यभर पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.


आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...