Translate

Wednesday, October 27, 2021

Share Trading Training | Udyamita Vikas Training Center

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा
शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण 
शेअर मार्केटिंग मधील परिपूर्ण प्रशिक्षण


कमी कालावधीमध्ये जास्त फायदा मिळत असल्यामुळे शेअर्स ट्रेडिंग हे क्षेत्र सर्वांचेच आकर्षण ठरलेले आहे.मात्र या क्षेत्राबाबत असलेले अपूर्ण ज्ञान आणि गैरसमज यांमुळे इच्छा असूनही शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे अनेकांना अवघड वाटते. 

संपूर्ण ज्ञान मिळवून या क्षेत्रातून पैसे मिळवता यावेत यासाठी 
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे 

दि. १४ नोव्हेंबर 2022 पासून ५ दिवस

या वेळेत असणार आहे.  

 शेअरबाजार व्याप्ती आणि इतिहास, भारतीय शेअर बाजार, शेअर म्हणजे काय, प्राथमिक शेअर मार्केट, इनिशियल पब्लिक ऑफर, अलॉटमेंट, ग्रे मार्केट, लिस्टिंग, सेकंडरी शेअर मार्केट, निफ्टी आणि सेन्सेक्स, व्यवहार पद्धती, वायदा बाजार, फ्युचर आणि ऑप्शन, गोल्ड ईटीएफ, गोल्ड बीझ ट्रेडिंग, स्टॉक स्प्लिट, बोनस आणि डिव्हिडंड, कर विषयक प्रणाली, पैशाचे व्यवस्थापन,  नफा मिळविण्याचे अचूक तंत्र, फंडामेंटल अनालिसिस, कंपनीची योग्य निवड, रेशो अनालिसिस, बॅलन्स शीट अभ्यास, शेअर खरेदीची अचूक वेळ, टेक्निकल ऍनालिसिस चा अभ्यास, लाईन चार्ट, बार चार्ट, कॅण्डल स्टिक चार्ट, प्राईस पॅटर्न, इंडिकेटर्स, करन्सी मार्केट ट्रेडिंग, कमोडिटी मार्केटचा अभ्यास

ऑनलाइन ट्रेडिंग आणि प्रात्यक्षिक असे शेअर मार्केटचे परिपूर्ण  प्रशिक्षण असेल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना  काही अडचण अल्यास पुढे दोन वर्षे मार्गदर्शन  करण्यात येणार आहे..

Join Share Trading Training What's App Group

प्रवेश मर्यादित  

प्रवेशासाठी व अधिक माहीतीसाठी संपर्क 
श्री. महेश कुलकर्णी सर

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , 
राजधानी टॉवर्स, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा 
+91 9822397384 येथे साधावा .




Sunday, October 24, 2021

Download COVID 19 Vaccination Certificate | MyGov Corona Helpdesk


Click here to visit MyGov Corona HelpDesk


Type Certificate into it and enter 

Generating an OTP for the number  xxxxxxxx16. You will receive an OTP from Cowin.

Enter the 6 digit OTP below within 3 minutes

We're confirming your OTP, this may take up to 30 seconds ⌛

Here are the members registered with this number 👇

1. Your Name

2. Other person name

💡 Type 1-2 to select a member for downloading Cowin Certificate or type Menu to view the Main Menu.

Vaccine Number: Here is your COVID 19 Vaccination Certificate. 

Vaccine Number: What would you like to do next?

You can choose following options too 👇 

1. What to do if you have symptoms of COVID-19

2. Vaccination - Book Appointment, Download Certificate, Centre & FAQ

3. Latest Updates & Useful Alerts on COVID-19

4. Professional Advice & Ways to Improve Immunity

5. Where to Get Help - National & State Level

6. MythBusters - Authenticate News

7. Together We Can - Success Stories & Positive Harmonies

8. Info on Coronavirus, Symptoms and How to Reduce Risk


💡 Tip: You can type 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 to make a selection of the menu options.


Click here to visit MyGov Corona HelpDesk

 

Tuesday, October 19, 2021

Autumn | October Heat

 शरद ऋतू | ऑक्टोबर हीट


साधारणतः पावसाळा संपून ऑक्टोबर महिना सुरू झाला की वातावरण सूर्याची हुकूमत पुन्हा डोकावते. आयुर्वेद वर्णित शरद ऋतू आधुनिक नुसार ऑक्टोबर हीट हे शब्द नित्य दिनचर्येत प्रकर्षाने जाणवू लागतात.वातावरणात पर्यायाने शरीरात वाढलेली उष्णता जाणवू लागते.

ऋतुबद्दल एक ऋतू संपून जेंव्हा दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळी बाह्य वातावरणात झालेले बदल पर्यायाने शरीरात विविध व्याधी परिस्थिती निर्माण करते.आपल्या पूर्वजांना या गोष्टीचे ज्ञान होते.त्यामुळे ऋतुंबदल झाल्यावर पुढील ऋतुप्रमाणे आपला आहार विहार दिनचर्या यात बदल करणे आयुर्वेदानुसार अनिवार्य आहे आणि असे बदल आपण केले नाहीत तर आपण बदललेल्या वातावरणाने लगेच आजारी पडतो ही गोष्ट पाहायला मिळते.

वर्षा ऋतू अर्थात पावसाळ्यात शरीर अवयवांना थंडीची सवय झालेली असते.ऑक्टोबर शरद ऋतू मध्ये अचानक सूर्य संताप वाढतो.या काळाला ऑक्टोबर हीट किंवा second summer म्हणतात.

या काळात पित्त दोष मोठ्या प्रमाणात वाढून पित्ताचे विकार जसे की अंगावर पित्त, गांधी उटणे.हात पाय डोळे शरीर याची आग होणे,तोंड येणे,रांजणवाडी नाकामध्ये फोड येणे होतात.

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिले की नाक गळणे सर्दी शिंका ताप कणकण चक्कर अशक्तपणा थकवा या गोष्टी हटकून होतात.

यासाठी या ऋतूमध्ये आहारात गुलकंद,मोरावळा,आवळा,पेठा, मनुके,बेदाणे,सुके अंजीर,खडीसाखर ,चंदन यांचा समावेश करावा.

तिखट मसालेदार आले लसूण मिरची दही मासे अंडी शेवगा शेपू मेथी शिमला मिर्च या उष्ण गोष्टींचा अतिरेक टाळावा.

उन्हामध्ये काम करणे उन्हात फिरणे टाळावे फिरायचे झाल्यास डोक्यावर टोपी छत्री वापरावी.अंगाला खोबरेल तैल चंदन तैल सारखी शीत तैल वापरावीत.

एका ऋतूचा शेवटचा आठवडा व पुढे येणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा याला आयुर्वेदात ऋतुसंधी म्हणतात. यावेळी पूर्वीच्या ऋतूची दिनचर्या विधी त्याग करून सुरू होणाऱ्या ऋतूच्या वातावरणातील बदलानुसार दिनचर्या विधी क्रमाने प्रारंभ करावा.तो विधी एकदम बंद किंवा सुरू केल्याने त्याची सवय नसल्यामुळे आजार निर्माण होतात.उदा. आपण अचानक उन्हात फिरले काम केले की ऑक्टोबरमध्ये लगेच आजारी पडतो.

"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।"

वैद्य राहुल चव्हाण वैद्या सुमिता चव्हाण

शाश्वत आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक व केशायुर्वेद ब्रँच सातारा

shashwatayurvedic.com

Mo. 9421619384

Monday, October 18, 2021

घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य


बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.


आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहू या व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे...


वैशिष्ट्ये :

(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत.

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३) पहिले कडवे मराठीत असून, उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.

(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हटली जाते.

(५) सर्व कडवी कृष्णाला उद्देशूनआहेत.

(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे...

आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहू या

१) घालीन लोटांगण वंदीन चरण

     डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

     प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन

     भावे ओवाळीन म्हणे नामा ॥

वरील कडवे संत नामदेव महाराजांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे.

अर्थ...

कृष्णाला (विठ्ठलाला) उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.


२)  त्वमेव माता च पिता त्वमेव ।

     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥

     त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

     त्वमेव सर्व मम देव देव ॥

हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ...

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.

(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा

    बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात ।

    करोमि यद्येत सकल परस्मै

    नारायणापि समर्पयामि ॥

हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ…

श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा! माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.


(४) अच्युतम केशवम रामनारायणं।

      कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी ॥

      श्रीधर माधवं गोपिकावल्लभं ।

      जानकी नायक रामचंद्र भजे ॥

वरील कडवे आद्य शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ…

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.


(५) हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।

     हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे. (ख्रिस्तपूर्व काळातील आहे).

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.

 🚩 राम कृष्ण हरी 🚩


आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Sunday, October 17, 2021

Modicare Azadi Call Center

 Azadi Call Center is now LIVE with enhanced features. 

Consultants can get Business Information through 24*7 Self Service.

Roshni at Call Center can help the consultants with the following details-

1.KYC Status (Self/Donwline)

2.NEFT Status (Self/Donwline)

3.Order Status 

4.Password Reset 

5.Loyalty Details

6.Bonus Information


7.Promotions of the month

8.Store Locator

The new alternate number - 0124-6912900 is now LIVE

Save this number as Modicare Roshni or Modicare Azadi Call Centre and cascade this to your teams. 


In order to experience the Self Service IVRS , we request you to please call us from your registered mobile number.

Azadi Call Centre Number- 0124-6912900

Want to Join Modicare click here

Call : RJ Savita Jadhav 9423867329

Visit our site RJSavita

Sunday, October 10, 2021

Job | TATA MOTORS PUNE

 भारत सरकारच्या कमवा व शिका धोरणा अंतर्गत 

National Employability Enhancement  Mission (NEEM) 

च्या माध्यमातून  NTTF ही संस्था  

12 सायन्स युवतींना 

TATA MOTORS PUNE

 येथे ट्रेनि म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. 

अधिक माहिती खलील प्रमाणे:

शिक्षण:  - 12th Science with 60 % Marks

Training Company Partner : TATA MOTORS PUNE

Stipend : Rs. 12800/- प्रति महिना

इतर सुविधा: Working Lunch & Transport (Deduction Rs. 15/- per month)

Duration : 12th Pass (3 yrs) ITI ( 2YRS)

Certification : प्रशिक्षण यशस्वी पणे पूर्ण केल्यानंतर Diploma  In Manufacturing Technology.

अधिक माहितीसाठी संपर्क :  

महेश कुलकर्णी ,
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , 
राजधानी टॉवर, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा. 

Phone 9822397384.

Register here



 

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...