Translate

Monday, November 1, 2021

Happy Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सोशल मिडीया सातारा दिवाळी निमित्त सादर करत आहे 
साध्या सोप्या मराठी भाषेतून दिवाळीच्या शुभेच्छा... 
ज्या आपण  आपल्या मित्रपरिवारास कॉपी करुन शेअर करु शकता...
.



छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 


 पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.


उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


नवा गंध, नवा वास नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी... या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत




आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...