सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात राहणे, कार्यमग्न राहणे, ताणतणावात राहणे,सतत धावपळीचे आयुष्य जगणे यामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे त्याच्यामुळे आपले आयुर्मानही सध्या कमी होत चालले आहे. आपली जीवनशैलीच सारे बदलून गेले आहे. आधुनिक संसाधनांचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे अधिकाधिक सुखसोयी निर्माण होत आहेत. अनेक यंत्रे आपल्या दिमतीला असल्यामुळे शरीराला कष्टाची सवयच राहिलेली नाही. वारेमाप रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे अन्नातील सकसता निघून गेली आहे. किंबहुना आपण बरेच विषयुक्त अन्ना दररोज खात आहोत.
अशा अनेक कारणांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपले आयुर्मानही बरेच कमी झाले आहे. हृदयरोग, डायबिटीस, पॅरलिसीस, कॅन्सर अस्थमा, अशा अनेक आजारांनी आपण ग्रस्त झालो आहोत. आपली आरोग्य शक्तीचा फार कमी होत चालली आहे. आणि त्याच मुळे करोना सारख्या आजाराला असंख्य लोक आपल्याकडे बळी पडलेले दिसून आले. निरोगी आयुष्य जगणे याचा थेट संबंध आपल्या आहाराशी आहे हे आता लोकांना समजायला लागले आहे.
त्यामुळेच आहार तज्ञांकडून आपल्या आहाराचे नियोजन करून घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. आहार तज्ञ म्हणून कायदेशीर प्रॅक्टीस करता येण्यासाठी
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा
येथे
डिप्लोमा इन डायटेशियन अॅन्ड न्युट्रिशिअन (आहार तज्ञ)
यामध्ये शरिरशास्त्र, पॅथॉलॉजी, क्लिनिकल प्रॅक्टिस, जीम डायट प्रॅक्टिस, स्पोर्टसमन डायट प्रॅक्टिस, वजन वाढवणे, वजन कमी करणे, मुलांमध्ये ग्रोथ डायट प्रॅक्टिस, जनरल डायट प्रॅक्टिस इ. PHD, Post Dr. असणा-या तज्ञांकडून शिकण्याची संधी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर याची परीक्षा घेण्यात येणार असून याचे भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी महेश कुलकर्णी, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर, तिसरा मजला, राजवाडा बस स्टॉप जवळ सातारा 9822397384 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment