Translate

Saturday, December 24, 2022

Bakery business training


मॉडर्न खाद्य संस्कृती मध्ये बेकरी पदार्थाचे फार मोठे स्थान आहे. अनेक चटपटीत,अबाल वृद्धांना आवडणारे पदार्थ बेकरी पदार्थांपासून बनविले जातात त्याच प्रमाणे बेकरीचे सगळेच पदार्थ आवडीने खाल्ले जातात.प्रत्येकाचा वाढदिवस लज्जतदार केक कापल्याशिवाय साजराच होत नाही. 

याचमुळे प्रचंड मागणी असणारा कायम चालणारा बेकरी व्यवसाय प्रशिक्षण दि. 30 जानेवारी 2024 पासून उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,सातारा (UVTC SATARA) येथे सुरू होत आहे. हे प्रशिक्षण प्रत्येक मंगळवारी स.10 ते 1 असे अडीच महीने कालावधीचे आहे. हा प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम आसून स्वतःची बेकरी सुरू करता येण्यासाठी बेकरीचे सर्व पदार्थ प्रत्यक्ष बेकरीमध्येच सर्व बारकाव्यासह शिकविण्यात येणार आहेत. यामध्ये लादी पाव, बन पाव, ब्रेडचे प्रकार, पिझ्झा बेस, बटरचे प्रकार, टोस्ट खारीचे प्रकार, डोनेट, क्रिमरोल, नानकटाई, बिस्किट प्रकार, पेस्ट्री, केकचे प्रकार इ. बेकरीचे सर्व पदार्थांचे प्रोफेशनल प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण समाप्तीनंतर प्रमाणपत्राहीदिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले नंतर व्यवसायासाठी स्वत:चे युनीट सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन सुमारे 22 वर्षांचे पदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तींकडून देण्यात येणार आहे. याच बरोबर व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी देखील योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Join Bakery business training Whats app Group 

तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स, ३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा

No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...