माणसाचे आयुष्य अनेक भावभावनानी भरलेले आहे, सजलेले आहे.आनंद, दुःख, राग, माया, उत्साह, नैराश्य, उमेद अश्या भावनांची गोळाबेरीज म्हणजे आयुष्य आहे असे म्हटले तर वावागे ठरणार नाही. या सगळ्यां भावभावना मनाशी संबंधित आहेत. मन हे एक अथांग समुद्रासारखे आहे, त्याची खोली सहजा सहजी कळत नाही. वरून माणूस शांत वाटत असला तरी त्याचा मनात कल्लोळ चाललेला असू शकतो.
मनामुळेच एखाद्याला अचंबित करणारे असे यश एखाद्या खेळा मध्ये मिळू शकते आणी एखाद्याला निराशेच्या गर्तेत नेऊ शकते. अशा मनाचा अभ्यास करता यावा, मानस शास्त्र समजून घेऊन त्या द्वारे माणसाला मदत करता येण्यासाठी , मानस शास्त्रतिल व्यवसाय संधीं शिकण्यासाठी डिप्लोमा इन सायकॉलॉजी अँड हिपनोथेरपी प्रशिक्षणाचे आयोजन प्रत्तेक शनिवारी दुपारी 2:30 ते 5 असे एक वर्ष कालावधीचे करण्यात आलेले आहे. यामध्ये
मानस शास्त्र ओळख, वर्तणूक शास्त्र , मानसशास्त्राचा दैनंदिन उपयोग , सेल्फ अँड पर्सन्यालिटी, स्ट्रेस मॅनेजमेंट, गुणवत्तांचा विकास, मन व एकाग्रता, चाईल्ड सायकोलॉजी, डिसऑर्डर ओळखणे, मोटिव्हेशन, स्वसंमोहन, हिप्नॉटिझम, मास हिप्नॉटिझम, स्टेजशोज, क्लिनिकल हिप्नॉटिझम, पास्टलाईफ रिग्रेशन, मेस्मोरिझम आणि बरेच काही... फायदे
१) मानसमित्र म्हणून काम करता येते. २) हिप्नोथेरपीस्ट म्हणून व्यवसाईक काम करता येते. ३) समुपदेशक व्यवसाय करता येतो.