Translate

Wednesday, July 27, 2022

Diploma in Taxation and Business Accounting | Udyamita Vikas Prashikshan Kendra Satara

 



Diploma in Taxation and Business Accounting

स्वतःचा व्यवसाय सुरु करता येण्या साठी त्याच प्रमाणे प्रत्येक उद्योगामध्ये हमखास नोकरी मिळवता येण्या साठी उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत Diploma in Taxation and Business Accounting हा प्रशिक्षण कार्यक्रम  सुरु होत आहे.

यामध्ये बेसिक अकाउंटींग च्या कन्सेप्ट पासून टॅक्स ऑडिटर म्हणून काम करता येण्यासाठी अकाउंटींग मधील प्रत्यक्ष कामकाज चालते तसे सर्व बरकाव्यासह प्रॅक्टिकल ओरिएंटेड अभ्याक्रमचा समावेश केला आहे त्याच बरोबर टॅक्स कलयुलेशन करण्यापासून GST आणि इन्कम टॅक्स चे रिटर्न भरण्यापर्यंत सर्व प्रॅक्टिकल्स अभ्यासाचा समावेश केलेला आहे. 

त्यामुळे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटट म्हणून त्याचप्रमाणे टॅक्स कन्सल्टन्ट म्हणून स्वतंत्र व्यवसाय करता येतो त्याच बरोबर चांगली नोकरी मिळवता येण्यासाठी, इंटरव्हिव्ह टेकनिक, इंग्लिश स्पिकिंग याचाही समावेश या प्रशिक्षणात केला आहे.

कोर्स संबंधित व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा...!

 हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारत सरकार नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात येते.

या प्रशिक्षणा नंतर खात्रीने टॅक्स कन्सल्टन्ट म्हणून स्वतः चे ऑफिस सुरु करता येते हमखास चांगली नोकरी मिळते. या प्रशिक्षणात कोणत्याही शाखेचा व्यक्तीला (art, commerce, science) प्रवेश घेता येतो.

टॅक्स कन्सल्टंट म्हणून करीअर, ऑडीटर म्हणून प्रॅक्टिस करता येते, सर्व व्यवसायांचे, उद्योगांचे अकौटींगचे काम करता येते, नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध...

अभ्यासक्रम 

इनकम टॅक्स प्रॅक्टिस, GST प्रॅक्टिस, बिझनेस अकौटींग, इंटस्ट्रियल अकौटींग, NGO अकौटींग, ऑडीट, प्रोजेक्ट रिपोर्ट, सॉप्टस्किल्स, इंटरव्ह्युव टेक्निक आणि बरेच काही

२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सुरु (कालावधी १ वर्ष) प्रवेश अंतिम तारीख २५ ऑक्टोंबर २०२३ 

अधिक माहितीसाठी संपर्क

९८२२३९७३८४ श्री. महेश कुलकर्णी सर, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर्स,
३ रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा

Monday, July 18, 2022

डिप्लोमा इन डायटेशियन अॅन्ड न्युट्रिशिअन आहार तज्ञ उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा



डिप्लोमा इन डायटेशियन अॅन्ड न्युट्रिशिअन (आहार तज्ञ)

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात राहणे, कार्यमग्न राहणे, ताणतणावात राहणे,सतत धावपळीचे आयुष्य जगणे यामुळे  आपले आरोग्य धोक्यात आले आहे त्याच्यामुळे आपले आयुर्मानही सध्या  कमी होत चालले आहे. आपली जीवनशैलीच सारे बदलून गेले आहे. आधुनिक संसाधनांचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे अधिकाधिक सुखसोयी निर्माण होत आहेत. अनेक यंत्रे आपल्या दिमतीला असल्यामुळे शरीराला कष्टाची सवयच राहिलेली नाही.  वारेमाप रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे अन्नातील सकसता निघून गेली आहे. किंबहुना आपण बरेच विषयुक्त अन्ना दररोज खात आहोत.  

अशा अनेक कारणांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे.  आपले आयुर्मानही बरेच कमी झाले आहे. हृदयरोग, डायबिटीस, पॅरलिसीस, कॅन्सर अस्थमा, अशा अनेक आजारांनी आपण ग्रस्‍त झालो आहोत. आपली आरोग्य शक्तीचा फार कमी होत चालली आहे. आणि त्याच मुळे करोना सारख्या आजाराला असंख्य लोक आपल्याकडे बळी पडलेले दिसून आले. निरोगी आयुष्य जगणे  याचा थेट संबंध आपल्या आहाराशी आहे  हे आता लोकांना समजायला लागले आहे.  

त्यामुळेच आहार तज्ञांकडून  आपल्या आहाराचे नियोजन  करून घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.  आहार तज्ञ म्हणून कायदेशीर प्रॅक्टीस करता येण्यासाठी 

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा 
येथे 

डिप्लोमा इन डायटेशियन अॅन्ड न्युट्रिशिअन (आहार तज्ञ)

 हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. १०/१२/२०२३  पासून प्रत्येक रविवारी सुरू होत आहे.  कालावधी ६ महिने 

यामध्ये  शरिरशास्त्र, पॅथॉलॉजी, क्लिनिकल प्रॅक्टिस, जीम डायट प्रॅक्टिस, स्पोर्टसमन डायट प्रॅक्टिस, वजन वाढवणे, वजन कमी करणे, मुलांमध्ये ग्रोथ डायट प्रॅक्टिस, जनरल डायट प्रॅक्टिस इ. PHD, Post Dr. असणा-या तज्ञांकडून शिकण्याची संधी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर याची परीक्षा घेण्यात येणार असून याचे भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी महेश कुलकर्णी, उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, राजधानी टॉवर, तिसरा मजला, राजवाडा बस स्टॉप जवळ सातारा 9822397384 येथे संपर्क साधावा.

Join Whats app Group

Friday, June 24, 2022

दिवाळी स्पेशल प्रशिक्षण

 



दिवाळी म्हणजे विविध पदार्थांची रेलचेल

सगळ्या सणांचा राजा दिवाळी हा सण आहे या सणाला उत्साहाचा आनंदाचा भरभराटीचा सण म्हणूनही ओळखलं जाते. 

या सणाला भरपूर खरेदी केली जाते नवीन कपडे नवीन वस्तू नवीन गाडी नवीन मोठ्या वस्तू यांची खरेदी या सणाला होत असते त्याचबरोबर वेगवेगळ्या लज्जतदार पदार्थांची रेलचेल या सणांमध्ये घरामध्ये असते. 

लाडू ,चकली ,करंजी, शेव, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे ,बालुशाही, अनारसे ,शंकरपाळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असे अनेक पदार्थ दिवाळीमध्ये करण्याची, खाण्याची हौस आणि मौज मोठी वेगळीच असते. परंतु आता  नवरा आणि बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे किंवा कामा निमित्त बाहेर पडत असल्यामुळे हे सगळे पदार्थ करायला वेळच शिल्लक उरत नाही आणि म्हणूनच या पदार्थांच्या व्यवसायाला फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.  

गौरी गणपती आणि दिवाळीच्या सणाच्या  वेळी या पदार्थांना बाजारात मोठी मागणी असते. 

या उद्योग संधीचा फायदा घेता येण्यासाठी उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,सातारा येथे दिवाळी स्पेशल या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण 22 ऑगष्ट ते 26 ऑगष्ट 2022 असे 5 दिवस 11 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे .  

यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून मोतीचूर लाडू, रवा लाडू ,बेसन लाडू ,मुग लाडू ,रवा बेसन लाडू,वेगवेगळ्या प्रकारच्या  करंजा ,चकल्या ,शेवेचे वेगवेगळे प्रकार ,शंकरपाळी, चिवड्याचे वेगवेगळे प्रकार यामध्ये भाजके पोह्यांचा चिवडा, लक्ष्मीनारायण चिवडा, तळून करण्याचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा, लक्ष्मिनारायण चिवडा, असे विविध प्रकारचे चिवडे कडबोळी, अनारसे, बालुशाही, चिरोटे,  दोन कलर बर्फी, तीन कलर बर्फी,काही वेगळे मिठाईचे प्रकार अशा अनेक पदार्थ यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून शिकवले जाणार आहेत. 

या पदार्थांना महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तर मागणी आहेच याशिवाय आला परदेशातही खूप मोठी मागणी आता मिळू लागले आहे .म्हणून   वेगळी व्यवसाय संधी म्हणून त्याच्याकडे आता बघितले जाते .

अधीक माहितीसाठी व प्रवेशासाठी 
संचालक श्री. महेश कुलकर्णीसर
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा 
येथे संपर्क साधावा. 

फोन नं. 9822397384

Friday, June 17, 2022

Wangikar Classes | Karad



||तमसो मा ज्योतिर्गमय|| 

कराड शहरातील विद्यार्थ्यांचे हमखास यश म्हणजे वांगीकर क्लासेस 

 १०० टक्के यशाची हमी, ८वी, ९वी, १० वी प्रवेश सुरु, प्रवेश मर्यादित

Semi English & English Medium 

Mathematics, Science, English, Social Studies.

JEE, NEET Foundation Batch

241/ब, सोमवार पेठ पाण्याच्या टाकी जवळ कराड

आजच संपर्क साधा

9403245901, 9404456413


Sunday, May 1, 2022

ज्योतिष विषारद प्रशिक्षण


माणसाचे जीवन म्हणजे न उलघडलेल्या कोडे आहे. इंद्रधनुष्यातील अनेक रंगानी सजलेले असे आयुष्य असते. 

आनंद,सुख,समाधान, ऐश्वर्य ,समृद्धी ,श्रीमंती ,मान सन्मान ,प्रतीष्ठा, या सगळ्या हव्या हव्याशा बाबी तर निराशा,दुःख , गरीबी, एकटेपण,अपमान अशा नकोशा बाबी यांची गुंफन म्हणजे आयुष्य . 

क्षणात सुख तर क्षणात दुःख असणाऱ्या या जिवणात सुखी आनंदी आयुष्य असावे असे सर्वांनाच वाटत असते आणि उद्याचा दिवस आनंदी असावा म्हणून सदैव सर्वजन धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. भविष्यात काय घडणार आहे याची उत्सुकता  सगळ्यांनाच असते.

 उद्याच्या आयुष्यात डोकावता आलेतर असे सर्वांना वाटते. त्याच मुळे अनेक संशोधक   रूशी,मुनींनी संशोधन करून ज्योतिष शास्राची निर्मिती  केलेली आहे. गितेत सांगितल्या प्रमाणे क्रयमान,संचित आणि प्रारब्ध या नियमांनी तयार झालेल्या अत्यंत सखोल खगोल शास्त्राच्या सभ्यास, संशोधनामुळे  ज्योतिष शास्तातील तर्कविज्ञान अचंबीत करणारे असे आहे.

 भविष्यकाळातील काय घडामोडी घडणार आहेत यांचा अंदाज या शास्त्रामुळे लावता येतो आणि जीवन आनंदी करता येते. 

ज्योतिष शास्त्र समजून घेण्यासाठी तज्ञ ज्योतिषी होण्यासाठी 

ज्योतिष विषारद प्रशिक्षणाचे 

आयोजन उद्यमिता विकास प्रशिक्षण केद्र, सातारा येथे रविवार दि. 19 जून 2022 पासून प्रत्येक रविवारी दु. 2:30 ते   5ः 00 यावेळेत 6 महिने कालावधीचे करण्यात आलेले आहे. 

 यामध्ये पंचांगाचा अभ्यास,प त्रिका तयार करणे यासाठी गावांचा सुर्योदय,सुर्यास्त काढणे , स्पष्ट लग्न काढणे,स्पष्ट ग्रह काढणे, विविध कुंडल्या तयार करणे,प्रामुख्याने लग्न कुंडली,भावचलीत कुंडली,नवमांश कुंडली,सुर्य कुंडली,राशी कुंडली,पत्रिकेचा दर्जा, पत्रिकेतील ग्रहयोग,राजयोग, श्रीमंत होणार का? गाडी, बंगला,फ्लॅट,दुकान,स्थावर संपत्ती , यश, कीर्ती, प्रसिद्धी ,मुलांचे शिक्षण ,व्यवसाय,नोकरी,परदेशा गमन,आजारपण,अपघात, अनेक प्रकारच्या अडचणी, अशा अनेक प्रश्नांची उकल कशी करावी याचे सखोल ज्ञान देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


अधीक माहितीसाठी व प्रवेशासाठी 
संचालक श्री. महेश कुलकर्णीसर
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र ,
राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा 

येथे संपर्क साधावा. 

फोन नं. 9822397384

Thursday, April 7, 2022

मोठा माणूस | निळू फुले

 

महाबळेश्वरला जाताना वळण घेण्याआधी पुणे सातारा मार्गावर एक हॉटेल लागायचं, त्यावर निळू फुले यांचे चित्र  होतं आणि लिहलेले असायचं "मोठा माणूस" फक्त खलनायकी भूमिका पाहिलेल्या लोकांना नीलकंठ कृष्णाजी फुले हउर्फ निळूभाऊंचे हे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते आणि प्रत्यक्ष जीवनात मितभाषी आणि संकोची वृत्तीचे होते हे सांगूनही खरं वाटणार नाही. श्रीराम लागू यांना आम्ही भेटायला ( मुलाखत ) गेलो असताना डॉक्टरांना मी प्रश्न विचारला होता की निळूभाऊंबरोबर तुमचे संबंध कसे होते ? तर त्यावर लागू म्हणाले की फार मोठा मनाचा माणूस आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हा प्रसंग मी स्वतः अनुभवला आहे त्यामुळे निळूभाऊ माझ्यासाठी वेगळं समीकरण बनले, मी अनेक पुस्तकं, सेवादल व विवेक मासिक व दिवाळी अंक वाचत हा माणूस समजत गेलो. महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. 

               सुरुवातीपासूनच चे राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत कार्यरत होते. अशा ठिकाणी त्यांच्यातला नट कधीच अस्तित्वात नसायचा. विनम्रता आणि भिडस्तपणा एवढा की, आजूबाजूच्या माणसांना संकोच वाटावा.  ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण करत ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर त्यांनी साकारलेली ‘झेलेअण्णांची’ भूमिका निळू फुलेंना चित्रपट जगतात एक वेगळीच ओळख देउन गेली. मराठी चित्रपट सृष्टीत ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटातून निळूभाउंनी साकारलेल्या भूमिका आजतागायत अजरामर आहेत. नाटक आणि सिनेमामधून त्यांनी साकारलेल्या नायकी-खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली खरी, पण निळू फुलेंनी साकारलेल्या जवळपास सर्वच खलनायकी पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. नाट्यक्षेत्रातही त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय.

       कराड येथे एकदा नाट्यसंमेलन  भरले होते तेव्हा मनोहर जोशी हे संमेलनाध्यक्ष होते  आणि लोकसभेचे देखील अध्यक्ष होते ते विजय तेंडुलकर यांची महती सांगत गुणगान करीत होते तेव्हा निळूभाऊ त्यांचे भाषण वाचून आले आणि दुसऱ्या दिवशी कडाडले की .... . . . ‘काल लोकसभेचे सभापती माननीय मनोहर जोशी म्हणाले की, तेंडुलकर हे मोठे नाटककार होते. पण याच जोशींना मी पंचवीस वर्षापूर्वी निदर्शनं करताना आणि नाटय़गृहातल्या खुच्र्याची, लाइटची मोडतोड करताना पाहिलंय. कलावंतांना स्टेजवर शॉक बसायचे म्हणून कलावंत घाबरायचे. आणि आज हे सांगताहेत तेंडुलकर थोर नाटककार होते म्हणून. तेंडुलकर मोठे होते, हे समजायला यांना पंचवीस वर्षे लागली. म्हणून म्हणतो, अहो जरा वाचत जा. विचार करीत जा. समजत नसेल ते समजून घेत जा...’  असा होता हा माणूस....... सज्जन परंतु रोखठोकपणे सामाजिक बांधिलकी जपत प्रहार करणारे. बंदिस्त नसलेल्या लोकनाटय़ात हजरजबाबीपणाचे दर्शन घडविणारे निळूभाऊ.. एरवी नम्र असलेले मात्र, रंगमंचावर दरारा असलेले..

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मुलगी गार्गीला पुरेसा वेळ देता येत नसे. मात्र, तरीही वेळ मिळाल्यावर गार्गीशी नाटक, चित्रपट, अभिनय या विविध विषयांवर चर्चा करण्यास फुले प्राधान्य देत. त्यांनी गार्गीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. वडिलांच्या बऱ्या-वाईट भूमिकेबद्दल ती त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायची. वडीलांच्या नावाचा प्रभाव न वापरता तिने जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. तुला पाहते रे मध्ये गार्गी फुले यांना तुम्ही पाहिलं असेलच. 

मोठा माणूस

 ...  राम नगरकर यांनी ‘रामनगरी’मध्ये त्या संदर्भातली आठवण लिहिलीय. १९७२च्या दुष्काळातली ही घटना आहे. त्या काळात राम नगरकरही निळूभाऊंच्या घरी राहायला, जेवायला होते. निळूभाऊ त्यांच्याकडून काहीही घेत नव्हते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवादलानं गोळा केलेलं धान्य निळूभाऊंच्या घरी ठेवलं होतं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस निळूभाऊ आणि राम नगरकर बाहेर जायला निघतात,तेवढय़ात निळूभाऊंची आई त्यांना हाक मारून बोलावते. म्हणते, थोडे पैसे दे. निळूभाऊ म्हणतात, माझ्याकडं पैसे नाहीत. आई म्हणते, घरात धान्याचा कण नाही, काय करायचं? त्यावर ते म्हणतात, काहीही कर. त्या माऊलीला साहजिकच घरातल्या धान्याच्या पोत्यांची आठवण येते. ती सहज म्हणते,यातलं पायलीभर धान्य घेऊ का, दोन दिवसांनी पैसे आल्यावर त्यात ते परत टाकूया. त्यावर निळूभाऊ तिला सांगतात, ‘ते लोकांचं आहे. उपाशी मेलो तरी चालेल, पण त्यातल्या दाण्यालाही हात लावायचा नाही.’ 

Tuesday, March 29, 2022

सामुहिक व्रतबंध (मौंजीबंधन) संस्कार सोहळा.




 आखिल ब्रांह्मण महा संघ,(रजि. नं.महा.एफ.१४५४५-२००७)

391,सिद्धेश्वर काँप्लेक्स,सोमवार पेठ,सातारा, 9604584682

सामुहिक व्रतबंध (मौजेबंधन) संस्कार सोहळा.

आखिल ब्राह्मण महासंघ,सातारा आयोजित सामुहिक व्रतबंध सोहळा शु. 3 सोमवार  22 मे 2023 रोजी सातारा येथे आयोजित केला आहे.
व्रतबंध मर्यादीत आहेत. 

नाममात्र शुल्क रू.7500/- आहे.यांमध्ये बटू सह घरातील १० व्यक्तीच्या जेवण   खर्च,मुंज विधी खर्च सामील आहे.

मुहुर्त मेढ, ग्रहमक ज्याचा त्याने आपल्या घरी करावयचा आहे. बटुचा लंगोट किंवा सोवळ्याची चड्डी, मुंडावळी,पिंपळाचा किंवा उंबराचा दंड,बटुचा पोषाख,अंतरपाठ,औक्षणाचे साहित्य,भिक्षावळ पदार्थ ज्याचे त्यांनी आणावयाचे आहे. हार,गुच्छ,पुजेचे साहित्य,गुरूजी, वैदीक साहित्य,मुंजीचे 5 फोटो,जेवण खर्च ,कार्यालय खर्च संस्थे मार्फत करण्यात येणार आहे.  

ज्यांना व्रतबंध सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.सहभाग मर्यादित असल्यामुळे सहभाग शुल्क रू.7500/- भरणा-यांचेच सहभाग निश्चित धरण्यात येतील. सहभाग शुल्क 'अखिल ब्राम्हण महासंघ, आय डी बी आय बँक , बचत खाते क्र.45110010958672,

IFSC नं IBKL 0000451

अथवा 

जनता सहकारी बँक लि. ,बचत खाते क्र. 0060302012226000,

IFSC नं. IBKL0451 JSB यामध्ये RTGS अथवा चेक द्वारे अथवा अखिल ब्राम्हण महासंघ,391, सिद्धेश्वर काँप्लेक्स,सोमवार पेठ,सातारा येथे रोख भरून आपला सहभाग निश्चित करावयाचा आहे.

वरील Scan करुन शुल्क अदा करु शकता
 

अधिक माहीतीसाठी
श्री.धनंजय कुलकर्णी (अध्यक्ष ) 9422603545,
श्री. भास्कर मेहेंदळे(सचिव) 9637180779
श्री. महेश कुलकर्णी 9822397384
यांचेकडे संपर्क सधावा.




Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...