कोरोना काळातील सातारा जिल्हाची आरोग्य सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळापासून सातारा आपली ओळख जपत आलेला आहे. निसर्गाची मुक्त उधळण झालीये या जिल्हामध्ये महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा, कोयना असे अनेक ठिकाणांनी देशालाच नव्हे तर जगालाही भूरळ घातली आहे.
एवढ सर्व काही असतानाही नाही ते फक्त आरोग्य सुविधा...
हो आरोग्य सुविधा आणि हे सिद्ध केलय कोरोनाने. ग्राम पातळीवरुन खासदार आमदार सरपंच निवडणूका लढविणारे नेते असो वा देशाला दिशा देणारे या सर्वांनी ग्राम आरोग्याचा विचार ही केलेला नाही.
लाखो लोक बाहेरुन येत होते कोरोना पसरु शकतो हे माहिती असतानाही मार्च २०२० पासून ग्राम पातळीवर कोविड रुग्णालये तयार करण्याची साधी कल्पना ही येवू नये.
सातारा जिल्हातील ग्राम स्तरावरील तालुका स्तरावर तसच जिल्हा स्तरावरील आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे हे कोरोनाने सिद्ध केले.
यातून कोणी बोध घेईल हीही आशा नाही. कारण सातारकर कमालीेचे शांत आहेत. काही होवू द्या शांतीप्रियता ते सोडत नाहीत.
लढवय्यापणा नसलेने त्यांचा लाभ नेते मंडळी नेहमीच घेत आले आहेत हे ही सत्यच...
असो कोरोनाने सर्वांनाच त्यांची पात्रता दाखवून दिली आहे
No comments:
Post a Comment