Translate

Sunday, September 20, 2020

Crisis may occur Boycott Bollywood

बॉलिवूडचा बहिष्कार होण्याची भीती उद्भवू शकते

सुशांत सिंग च्या आत्महत्ये नंतर विशेषत: हिंदी चित्रपट सृष्टीचे सर्व सामान्य जनतेला न पटणारे रूप समोर आले, एक उभरता नायक त्याची अनेक जणींशी भानगडी, ड्रग्ज, किळसवाणा वाटणारा रोजच नवीन होणारा खुलासा, अहंकारच्या शिखरावरावरुन वाट्टेल ते आरोप, तोंडाला तोंड देवून चित्रपट सृष्टीची लक्तरे वेशीवर टांगणारी स्व घोषित महारणी (कादचित राजकीय पक्ष पुरस्कृत) नायिका...

 यामूळे सर्व सामान्य जनतेला सहज प्रश्न येवू शकतो "अरे आपण यांचे चित्रपट करमणूक म्हणून पाहतोय, यांना आपणच दिलेल्या पैशावर किती गुर्मी" 

कोरोना मूळे अनेक कलाकार बेरोजगार झालेत तो उद्योग पुन्हा कधी सक्षम रित्या चालू होईल याचा अंदाज नाही, चित्रपट गृह कधी चालू होणार माहिती नाही. 

या परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला असे फुटक ज्वलंत चित्र पाहावयास मिळत आहे हे नक्कीच भविष्यासाठी चांगले नाही. 

"चित्रपट, नाटक पाहणे त्यात रममाण होवून जाणे महत्वाच नाही हे कोरोनाने सिद्ध केले आहे."

 आधीच चित्रपटाला कोरोनाने तसेच प्रेक्षकांनी या काळात नगण्य स्थान दिले आहे. चित्रपट गृह चालू करा यासाठी कोणीही बोलत नाही, टि व्ही मालिका चित्रण सुरु झाले असले तरी त्याकडे प्रेक्षक म्हणावा एवढा वळलेला नाही. (Already the film has been given a negligible place by Corona as well as the audience during this period. No one is talking about starting a movie house, even though the TV series has started filming, the audience is not so keen on it.)

येणा-या काळात हिंदी चित्रपट सृष्टीकडे सर्व सामान्य जनतेतील प्रेक्षक कायमची पाठ फिरवू शकतो हा संभाव्य मोठा आहे. कारण त्यातील किळसवाणे प्रकारच एवढे उघड होत आहेत.

यासाठी चित्रपट सृष्टीत सर्व काम करणा-यांनी वेळीच सावध होणे ही काळाची गरज आहे.

हिंदी  चित्रपट सृष्टी मधील उघडकीस येणा-या घमेंडी, ड्रग्ज, आत्महत्या, वारसा परंपरा, वशीला बाजी, पैसा,  अश्लीलता, भानगडी, गुन्हेगारी, जनतेच्या पैशावर चालणारी चैन, अहंकार आदी प्रकरांनी 
प्रेक्षकांनी चित्रपटांकडे कायमची पाठ फिरवली तर याचा विचार हवेत उडणा-या अनेकांनी करणे आवश्यक आहे. 

कारण ।।ये जो पब्लिक है सब जानती है।।

जी सर्व सामान्य जनता सत्तेचे तख्त बदलू शकते ती हिंदी चित्रपट सृष्टीला ही "BOYCOTT बहिष्कार" करु शकते!!!

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...