Translate

Saturday, February 20, 2021

Election speech despite heavy rains in Maharashtra's Satara


 
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी दोन वर्षांपूर्वीची उभ्या पावसातील सातारच्या भूमीवरील "ती" सभा विविध कारणांनी चर्चेत कायमच चर्चेत राहणार यात शंका नाही.

कोण भिजले, किती भिजले कसे भिजले हे अनेकजण तेलमीठ कीतीही सांगत असले तरी खरे भिजले ते सभेला उपस्थिती असलेले समस्त सर्वसामान्य सातारकर, साताराचे कार्यकर्ते, ड्युटीवर असलेले पोलीस बांधव आणि हो साळुंखे मंडप-डेकोरेटर्स यांचा तो माईक - मंडप. त्या सभेतील एकही सातारकर पाऊस पडतोय म्हणून साधा आडोशालाही गेला नाही की पांगला नाही आणि त्यांनीच त्यांचा दृढनिश्चय करुन राजकारणाला कलाटणी दिली. त्याच कोडकौतूक कराव अशी कोणाचीही इच्छा नाही. मात्र यावरुन होणारी निरर्थक चर्चा सातारकरांना आपेलशी वाटत नाही हे मात्र खर.  साताराची त-हाच न्यारी जी सहज कोणालाही गवसत न्हाई...

सर्वसामान्य सातारकर कसलेही संकट असो पाय रोवून उभा असतोय हे सर्व राज्याला त्या पावसातील सभेने दाखवून दिलय. भल मग तेव्हा कोण किती भिजल असाव थिजले ते सातारकरच...



हा लेख आपणाला कसा वाटला आपली कमेंट जरुर करा. अशाच प्रकारचे खुमासदार माहिती वाचण्यासाठी सबस्क्राईब करा सोशल मिडीया सातारा ब्लॉग

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...