डोसक्यावर पडलेली मालिका "देवमाणूस"
एक सांगा मंडळी कोणती महिला अशी कापडं घालून गावातनं पळत बसलं, व्यायाम करायला ती गावातून कशाला पळत बसेल, तिच्या कड गाडी आहे ती कुठे तरी बाहेर जाऊन मोकळ्या वातावरणात जॉगिंग की फींगिंग करेल नाही तर घरात योगा करेल.
हे एक दुसरं म्हणजे व्यायाम करण्यासाठी पूर्ण अंग झाकलेलं कपडे मिळतात च की स्पोर्ट्स ड्रेस
तिसरं शहरातून आलेल्या महिलांना समजतं गाव हे गाव असतं ती कमी कपडे घालून का पळत बसेल हो अशी
चौथं शहरातून आलेल्या पोरी महिला अजून ही अश्याच गावात आल्या की वागतात हे दाखवणं चूक च आहे उगाच त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन आतातरी बदला.
पाचवं सर्वात महत्वाचं गावाकडील पुरुष, तरुण पोरं दिसली बाई की एवढे लाळ घोटे पणाने न्याहळत बसत नाहीत गावाकडील हे दृश्य सिनेमा मध्ये होतं तो झाला भूतकाळ गाव शहरापेक्षा याबाबत (महिला अत्याचाराच्या बातम्या गावातून शहरापेक्षा खूप कमी येतात) खूप पुढे गेलीत
तवा गाव दाखवताना जरा नीट विचार करून दाखवायला हवं उगाच गावाची लायकी काढत बसू नये
तसंच शहरात मधील डॉक्टर का बर दाखवला गेला नाही हो आमचे गावाकडील डॉक्टर हा खरा देव माणूस च असतोय पैशासाठी, पोरीबाळीवर नजरा ठेऊन तुमी दाखवता एवढा हलकट नसतोय उलट गावातील गरीब लोकांच पैसे न घेता 24 तास म्हटल तरी धावून येणारा असतोय.
त्या तुमच्या बोगस डॉक्टरला शहराती घेवून जा आणि मालिकेच्या प्रोमोमध्ये जसं दाखवलय ना शहरातील डॉक्टर तस दाखवा.
No comments:
Post a Comment