दादा गाडी जावू द्या .... नव्या बोगद्यातून !!!
सातारा शहराच्या पोवई नाका परिसर भागात वाहतूकची गर्दी कमी होण्यासाठी ग्रेड सेपरेटर करण्यात आला. त्याच दोनदा उद्घाटनही केले गेले. अशा प्रकारचे काहीतरी वेगळं पाहण्याची सातारकरांची तशी वेळ कमीच.
कोल्हापूरला सातारा मधून जाताना मस्त अनुभव आला.
एस. टी. बस होती दौंड - फलटण - सातारा - कराड - कोल्हापूर.
बस वाहक चालक यांना ग्रेड सेपरेटर बाबत काहीच कल्पना नव्हती. बस बाहेरच्या बाजूने निघत असल्याचे वयस्कर बाबांचे लक्षात आले. बाबा कंडक्टरला चिडलेल्या आवाजातच "अहो, त्या बोगद्यातून का गाडी नेली नाही, आता पुढच्या बाजूने पुन्हा पोवई नाक्याकडे वळवा म्हणजे नव्या बोगद्यातनं जाता येईल" या वाक्यानं वाहक-चालक दोघहं गांगरले. दोघही जुन्या आर. टी. च्या भागातून बस नाक्याकडे वळवण्यास तयार झाले. तेव्हा बाबा खूश... पण ग्रेड सेपरेटर मध्ये प्रवेश त्या रस्त्यावरुन होणे अशक्य होत कारण तो घेण्यासाठी अगदी अलिकडूनच प्रवेश करावा लागतो. तसे लक्षात आणून दिल्यानंतर बाबांचा चेहरा पार उतरला.
वाहक-चालक यांना आपलं काहीतरी मोठ्ठं मीस झालं एवढा स्पष्ट भाव चेह-यावर दिसून आला. "बघू पुढच्या वेळेस" बोलून दोघही विसरुन गेले. बाब तशी छोटीसीच मात्र साताराच्या ग्रेड सेपरेटरच सर्व सामान्य सातारकरांना की अप्रूप वाटतय याच हे एक उदाहरण..
ग्रेड सेपरेटरच खरचं कौतूक सर्वांनाच असं वाटतय हे विशेष.... काहीजण तर मुद्दामच नाक्यावर आलं की त्यातून कस जाता येईल याचा विचारही करताना दिसतात.
ग्रेड सेपरेटर ची शहरातून बाहेर पडताना तसेच शहरात प्रवेश करताना वैशिष्ट्यपूर्णरित्या रचना करण्यात आलेली असल्याने तो सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment