आपल्यासाठी मुद्दाम मेजेशीर खुमासदार लेख...
झी मराठी वाहिन्यावरील मालिका म्हणजे संपूर्ण कुटूंबासाठी मनोरंजनाची रोजची मेजवानीच. अशा मालिकांनी अनेकांना स्वता:ची सुख-दुखं विसरायला लावून देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. या मालिका रोजच्या वेळेत पाहिल्या तर जातातच त्याचबरोबर दिवसाही आवडीने पाहणारा प्रक्षेक वर्गही मोठा आहे.
वेळेत मालिका पाहण्याची जणू रोजची घरातील कामधाम आवरली जातात. काही वर्षांपूर्वी या मालिकांतून खरच उद्बबोधक विचारही मांडले जायचे.
असाच विचार सध्या लोकप्रिय होत असलेली "येऊ कशी तशी मी नांदायला". वजनदार असलेल्या मुलींच्या लग्नाचा तसचे तिला समाजामध्ये येणा-या अडी-अडचणीवर भाष्य करणा-या मालिकेने लवकरच लोकप्रियता मिळवली आहे.
तस पाहता या अगोदरची मालिक माझ्या नव-याची बायको प्राईम टाईम संध्याकाळी ८ या वेळेत प्रचंड लोकप्रिय झालेली होती. त्यावेळेस तितक्याच ताकदीची येऊ कशी तशी मी नांदायला ही देखील मालिका आहे यात शंकाच नाही.
या मालिकेत नायक अतिशय श्रीमंत दाखवला आहे, नायिका तशी नव्हे ब-याच प्रमाणत गरीब दाखवली आहे. एवढी की त्या गरीबीवर सोशल मिडीयावर काही मिम्सही येवून गेल्या.
ही मालिकेतील नायिकेची आईचा चपातीचा व्यवसाय दाखवला गेला आहे. बर या चपात्या दिवसाला किती, किती... किती... तर तब्बल ३०० चपात्या रोज तयार केल्या जातात. (येथे ३०० कोटीची राधिका मॅडम आणि ३०० चपात्या यांचे साधर्म्य जोडण्याचा प्रयत्न केला तर नसेल ना).
येथे सहज विचार येतो जर ३०० रोज चपात्या तयार होवून त्या संपत असतील आणि एका चपातीची किंमत किमान १५ रुपये असेल ३०० x १४ = ४,५०० रुपये रोजचे होतात. महिन्याचे १ लाख ३५ हजार तर वर्षाचे १६ लाख २० हजार होतात हो...
जर एवढा टर्न ओव्हर असेल तर नायिकेचे कुटूंब इतके हालाकिचे जीवन जगाताना दावखले जाते की धीस ईज टू मच नाही का...!!!
मालिका डोक्याला जास्त ताण न देता पाहायच्या असतात... धकाधकीच्या जीवनातून एक करमणूक म्हणून पाहिल्या तर खूप एन्जॉय करता येतात. आपल्यासाठी मुद्दाम मेजेशीर खुमासदार लेख
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो.
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...
No comments:
Post a Comment