Translate

Monday, December 20, 2021

The wedding of Om and Sweetu took place in this famous temple.

येऊ कशी कशी मी नांदायला या झी मराठी वरील मालिकामधील ओम  आणि स्वीटू यांचं लग्न रत्नागिरीत जयगडमधील कचरे या छोट्याशा गावात विनायकाचे एक मंदिर आहे या प्रसिद्ध मंदिरात झालं लग्नाचे चित्रकरण झाले. सदरचे मंदीर अतिशय सुंदर आहे. 



2003 साली या मंदिराची स्थापना झाली. गावातील जिंदाल मंडळाने हे मंदिर उभारले. तुम्हाला इथे भेट द्यायची असल्यास रत्नागिरी बस स्थानकापासून मंदिर जवळपास 37 किलोमिटर अंतरावर आहे आणि गणपती पुळे 13 किलोमिटर अंतरावर आहे. तसेच 6 किलोमिटरवर जयगडचा किल्ला देखील आहे. 

त्यामुळे या ठिकाणी आल्यावर अनेक व्यक्ती विनायकाच्या मंदिराला देखील भेट देतात. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला मूषकराजाचे दर्शन होते. इथे हनुमाची देखील एक मूर्ती आहे. जिची उंची 6 फूट एवढी आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर देखील नयनरम्य आहे. माशांनी भरलेलं तलाव आणि हिरवळीची मखमल असलेला बगीचा इथे आहे.  


तुम्ही जर रत्नागिरीला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या भव्य मंदिराला देखील नक्की भेट द्या.



आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Show on Google Map

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...