Translate

Saturday, December 18, 2021

Vastu shastra वास्तुशास्त्र तज्ञ प्रशिक्षण

 वास्तुशास्त्र तज्ञ प्रशिक्षण 


जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणा पर्यंत माणूस सुख मिळण्यासाठी सतत धडपड करत असतो. 

चांगले राहणीमान,चांगले आरोग्य , चांगला जोडिदार, चांगली संतती, सुंदर टूमदार घर, चांगली आर्थिक स्थिती हे सुख मिळावे असे सगळ्यांनाच वाटत असते. अनेकांकडे यातील सर्व सुखे कमिजास्त प्रमाणात असतातही. पण ब-याचदा यश,सुख समाधान खूप प्रयत्न करूनही हवे तसे मिळत नाही . याची कारणे शोधताना आपण ज्या वास्तूमध्ये राहतो,आपला व्यवसाय ज्या वास्तू मध्ये आहे ती वास्तू कशी असावी याचा शास्त्रोक्त अभ्यास वास्तूशास्त्रा मध्ये केलेला आढळतो. पंचमहा भुतांनी आपली पृथ्वी तयार झालेली आहे. आणि आपले शरीरही पंचमहाभूतांनीच तयार झालेले आहे हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. 

याच सिद्धांतांवर अधारीत असणाऱ्या वास्तूशास्त्राचा अभ्यास केल्यावर लक्षात येते कि आपल्या अनेक संशोधक रृशी मुनींनी अत्यंत बारकाईने मनुष्याला वास्तूसुख मिळण्यासाठी वास्तू कशी असावी याचा आभ्यास केलेला आहे. 

वास्तू अभ्यासपूर्ण बांधलेली असेल, चांगली हवा, प्रकाश यांच्या नियोजनासह अर्थातच वास्तू चांगली उर्जा देणारी असेल तर मनुष्याला निरोगी आयुष्य मिळेल,तो सुदृढ असेल,जीवनात सुख, समाधान,यश यामुळे मिळेल आसा विचार करून वास्तूशास्त्राची निर्मिती व आखणी झालेली आहे. 

वास्तूशास्त्र समजून घेण्यासाठी व अधुनिक वास्तूशास्त्राशी सांगड घालून सुखदाई वास्तू कशी होते हे समजून घेण्यासाठी 

त्यातील उद्योग संधीचा शोध घेण्यासाठी वास्तूशास्त्र  तज्ञ प्रशिक्षणाचे आयोजन 

रविवार दि.23 जानेवारी पासून 

भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा 

येथे करण्यात आलेले आहे. 

हे प्रशिक्षण 4 महिने कालावधीचे 

प्रत्येक रविवारी सकाळी 11 ते 1 यावेळात घेण्यात येणार आहे. 

यामध्ये वास्तूशास्त्राचा इतीहास, वास्तू दिशा ज्ञान, प्रवेशव्दार,प्लॉट, फ्लॅट, दुकान गाळा यांची रचना त्यामध्ये असणारे दोष, त्यामुळे येणाऱ्या अडचणी , 

त्यावरील उपाय, विविध संस्कार जसे नंदाप्रतिष्ठापना, शंकूस्थापना, पंचशीर्ष स्थापना ,रत्नदिप संस्कार ,पि-यामिड वास्तू,धातू संस्कार ,धान्य संस्कार , औषध संस्कार , विविध यंत्रांचा अभ्यास, 

विविध विधींचा अभ्यास वृक्षछेदन विधी, वास्तूशांत विधी अधुनिक काळानुसार वास्तूरचना इत्यादींचा  सखोल अभ्यास करून घेतला जाणार आहे. 

प्रवेश मर्यादित आहेत. 

अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी 

महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. 

फोन नं. 9822397384

No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...