Translate

Thursday, March 9, 2023

Panchakarma Therapist

 

Diploma in Panchakarma Therapist



सध्याचे आयुष्य धावणारे आयुष्य झालेलं आहे. अत्यंत धकाधकीचे असे सर्वासामान्य माणसाचे आयुष्य झालेले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत सतत कोणते तरी टेन्शन घेऊन माणसे जगताना दिसतात.

बदलत्या  राहणीमानामुळे आपल्याला चांगले स्वास्थ मिळणे अवघड झालेले आहे कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये येणा-या भाज्या कडधान्ये व इतर पदार्थ केमिकलयुक्त आहेत, कारण शेतामध्ये जी फवारणी होती आहे ती केमिकल आहे, त्यामध्ये अनेक विषदृवै असतात जी आपण भाज्यांबरोबर रोज खात आहे.
तसेच आपल्या आयुष्यात फास्टफूडचे स्थान खूप मोठे झालेले आहे. लहान मुले, युवक-यवती किंवा वयस्कर  हे सगळेचजण चहा बरोबर टोस्ट बिस्कीटे खाताना, वडापाव खाताना, मिसळ खाताना दिसतात. आठवड्यातून 1, 2 वेळा हे पदार्थ खाल्ले जातातच. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम झालेले दिसत आहेत.

या सगळ्या मधून टॉक्सिन शरीरामध्ये प्रचंड वाढल्याच दिसते.  तळलेले पदार्थांमध्ये 
मध्ये  पुन्हा पुन्हा वापरलेले खूप जास्त तापवलेले वापरलेले असते त्यामुळे त्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल, विषद्रव्ये तयार झालेली असतात आणि तेच पदार्थ आपण आनंदाने चावीने खातोय.

त्यामुळे बराचसे टॉक्सिन आपल्या शशिरामध्ये तयार होत आहे आणि वाढत आहे . परिणामी हार्ट अटॅक, प्यारालिसिस , कॅन्सर, दमा, अशा प्रकारचे अनेक आजार होताना दिसत आहेत. त्याच बरोबर आपली इम्युनिटी, आरोग्य शक्ती, प्रतिकार क्षमता बरीचशी कमी झालेली दिसते.

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरातन आयुर्वेद शास्त्रामध्ये टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक उपचार पद्धती दिलेल्या आहेत. त्या पैकी पंचकर्म ही एक अत्यंत गुणकारी आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असणारी आरोग्य उपचार पद्धती आहे. पंचकर्म शरीरामध्ये जी विषद्रव्ये साठलेली आहेत ती बाहेर काढून टाकण्यासाठी उपयुक्त पद्धती आहे. पंचकर्म केल्यामुळे  शरीराची आरोग्य क्षमता खूप चांगली वाढते आणि आपण आजारी पडणार नाही असे शरीर तयार होण्यास  आपोआप मदत होते. त्याचमुळे पंचकर्म पद्धती ही अत्यंत लोकप्रिय आणि समाज मान्य झाली आहे.

ही पंचकर्म पद्धत समजून घेण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योग संधी समजून घेऊन आपला व्यवसाय सुरु करता येणेसाठी डिप्लोमा इन पंचकर्म थेरीपस्ट हा ट्रेनिंग प्रोग्राम 28 एप्रिल पासून प्रत्येक शुक्रवारी दुपारी 3.00 ते 5.30 या वेळेत 6 महिने कालावधीचा आयोजित केलेला आहे.
यामध्ये आयुर्वेदाची ओळख, शशीरशास्त्र, पंचकर्म ओळख, पूर्वकर्म, स्नेहन, स्वेदन, विरेचन,  बस्तीचे वेगवेगळे प्रकार, रक्तमोक्षन, नस्य, वमन, केरळीय पंचकर्म.

यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्र आणि पंचकर्म सेंटर सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी 

महेश कुलकर्णी ,
राजधानी टाँवर 3 मजला राजवाडा बसस्टाँप जवळ सातारा 

Mobile : 9822397384.


No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...