Translate

Monday, July 8, 2024

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती


पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटकंतीला जातात. हा काळ निसर्गसौंदर्याने भरलेला असतो, पण तितकाच आव्हानात्मक आणि धोकादायकही असतो. अशा परिस्थितीत आपत्कालीन मदत मिळण्यासाठी खालील संपर्कांची माहिती तुमच्या जवळ असणे अत्यावश्यक आहे. 


आपत्कालीन संपर्क क्रमांक


 रायरेश्वर

- श्री अनिल जंगम: +91 87881 38688

- श्री तानाजी जंगम: +91 86899 66772


 केंजळगड

- श्री सागर पाकिरे: +91 90490 62073


 रोहिडा (विचित्रगड)

- श्री घनश्याम: +91 93705 73877

- श्री शंकर ढवळे: +91 93736 43561


शिवनेरी

- श्री रमेश खरमाळे: +91 83900 08370

- श्री देविदास मिसाळ: +91 70300 02533

- श्री नितीन विधाते: +91 93220 66817


राजगड

- श्री विशाल पिलावरे: +91 90827 59781

- श्री अशोक कचरे: +91 90673 36894

- श्री बांपु साबळे: +91 75170 24681


सुधागड

- श्री दत्ता सावंत: +91 82371 49484

- श्री रोशन बेलोसे: +91 84462 23563


 मल्हारगड

- श्री कुंडलिक जाधव: +91 90212 95004

- श्री मोन्या काळे: +91 86698 17308


सिंहगड

- ॲड मारुती आबा गोळे: +91 92844 74039

- श्री अमोल पांढरे: +91 99216 99698

- श्री प्रकाश केदारी: +91 98508 92721

- श्री किरणकुमार पाटिल: +91 99229 22293

- श्री दत्ता जोरकर: +91 79723 22885


 जिवधन

- श्री सुभाष आढारी: +91 98501 84948

- श्री करण आढारी: +91 91121 24479


 किल्ले वसंतगड

- श्री रामभाऊ माळी: +91 98506 43388

- श्री अनंत चव्हाण: +91 98818 70502

- श्री दत्ता जामदार: +91 90829 82845


सदाशिवगड

- श्री राहुल जाधव: +91 90288 98555

- डॉ. योगेश कुंभार: +91 98506 79932


 वर्धनगड

- श्री किशोर घोरपडे: +91 98507 60130

- श्री संजय घोरपडे: +91 81086 42761

- श्री अक्षय अनपट: +91 70302 22444


हरिश्चंद्रगड

- श्री ज्ञानेश्वर बादड: +91 96894 94769

- श्री दत्ता भारमल: +91 89567 93310

- श्री श्रीमंत भारमल: +91 91453 92423

- श्री मारुती भारमल: +91 86053 25156


 किल्ले सुंदरगड दातेगड

- श्री लक्ष्मण चव्हाण: +91 98819 57485

- श्री रामचंद्र साळुंखे: +91 98501 95099


रायगड

- श्री सागर नलावडे: +91 90225 56690

- श्री राजू शिदे: +91 93594 70585


किल्ले हाडसर

- श्री सिताराम पवार: +91 98192 95595


किल्ले निमगिरी

- श्री अशोक साबळे: +91 91305 85239

- श्री तानाजी असवले: +91 78228 44374

- श्री रोहिदास साबळे: +91 78219 57094


किल्ले चांवड

- श्री मारुती उतळे: +91 96230 52539


 किल्ले शिंदोळा

- श्री प्रभाकर भालचिम: +91 88507 74145


 किल्ले राजमाची

- श्री सुरज वरे: +91 96236 78804

- श्री सुरज वरे: +91 83295 96057


 लोहगड

- श्री बाळु ढाकोळ: +91 99231 95938


### किल्ले विसापुर

- श्री सागर कुंभार: +91 83808 52138


 किल्ले तुंग

- श्री सचिन शेडगे: +91 82081 39518

- श्री बाळा भाऊ ढाकोळ: +91 85529 94303


किल्ले तिकोना

- श्री सुजित पोळ: +91 95458 63824


 शिवदुर्ग मित्र रेसक्यू टीम लोणावळा

- श्री सुनिल गायकवाड: +91 98225 00884


सह्याद्री रेसक्यू टीम भोर

- श्री सचिन देशमुख: +91 92727 18008


जुन्नर रेसक्यू टीम

- श्री रुपेश जगताप: +91 91756 90083

- श्री राजकुमार: +91 98505 06248

महत्वाची सूचना


पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर भटकंती करत असताना काही आपत्ती ओढवेल अशा प्रकारचे ट्रेक करू नयेत. आपणास काही आपत्कालीन मदत लागल्यास वरील दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा.

जय शिवराय! 🙏🚩

सुरक्षित भटकंतीसाठी सर्वांना शुभेच्छा!

(टीप- मोबाईल नंबर्सची खात्री करुन घ्यावी ही विनंती)

Sunday, July 7, 2024

Yashoda's coach Vidyadhar Gaikwad guidance to the office-bearers of Daksha Nagarik Police Friends Association

यशोदाचे प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांचे दक्षा नागरीक पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन



कराड: दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन पोलीस मित्र महाराष्ट्र राज्याच्या वतीने नुकतेच कराड येथे "संस्था परिचय व पदाधिकारी क्षमता बांधणी प्रशिक्षण" शिबिर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये यशदाचे प्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी क्षमता बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शिबिराचे उद्घाटन वृक्षाला जलदान व संविधान प्रस्तावना वाचन करून अँटी पायरसी सेल मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी जितू महादेव गुप्ता, दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेश भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष राजेश भोसले यांनी प्रस्तावना करताना संस्था परिचय या विषयावर संपूर्ण संस्था कामकाजाची माहिती दिली. त्यांनी संस्थेच्या उद्दिष्टांपासून कामकाजाची पद्धत आणि भविष्यातील योजनांची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या व कार्यपद्धतींबाबत मार्गदर्शन केले.

यशदाचे प्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून संस्था ध्येय साध्य करण्यास कशी मदत होते याबाबत विस्तृत विवेचन केले. त्यांनी सांगितले की, "संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून त्यांची क्षमता वाढवून त्यांना अधिक सक्षम बनवले जाते. त्यामुळे संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते."

या प्रशिक्षण शिबिरास दक्ष नागरिक पोलीस मित्रच्या महाराष्ट्र सचिव सौ. भक्ती पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष बोधिसत्व माने, वित्त व मार्गदर्शक अधिकारी महाराष्ट्र राज्य अर्जुन सकट, महासंचालिका कमल बोले, महाराष्ट्र अध्यक्ष सुजाता चव्हाण, महेश भोसले, दत्तात्रय जाधव, रमेश चव्हाण, साधना राजमाने, सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील पाठक, सचिन पवार, लता शिरतोडे, मनीषा मोहिते, सुवर्णा शिंदे, स्वाती सूर्यवंशी यांसह संघटनेचे सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत एकत्रितपणे काम करण्याचे वचन दिले. सहभागी पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आणि सहभागी पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

MP Medhatai Kulkarni met Suvarnantai Patil during visit to Satara district

 

 खासदार मेधाताई कुलकर्णी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सुवर्णांताई पाटील यांची घेतली भेट




सातारा, दि. ७ जुलै: भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरीय कार्य योजनेच्या अंतर्गत पुणे राज्यसभा खासदार आणि भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चा उपाध्यक्षा, सौ. मेधाताई विश्राम कुलकर्णी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रदेश कार्यकारणी सदस्या, सुवर्णांताई पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभांचे प्रमुख, आमदार, विधानसभा निवडणूक प्रमुख आणि बूथ कार्य समितीचे सर्व पदाधिकारी यांची बैठकही या निमित्ताने होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही योजना आखता येतील आणि सर्व मतदारसंघ महायुतीच्या विजयासाठी कसे बांधता येतील यासाठी खा. मेधाताई कुलकर्णी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यांच्याबरोबर सामूहिक मीटिंग घेऊन, चर्चा करून भविष्यातील नियोजन ठरवले जाईल. पक्षाच्या दृष्टीने आणखी नवीन काय करता येईल यासंदर्भातही सौ. सुवर्णांताई पाटील यांच्या घरी चर्चा झाली.

सौ. सुवर्णांताई पाटील यांच्या बद्दल बोलताना खासदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, "सुवर्णांताई पाटील या भाजपाच्या खूप जुन्या जाणत्या पदाधिकारी आहेत. महिला मोर्चाच्या कामापासून आतापर्यंत त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. पक्ष जिवंत राहण्यासाठी आणि पक्षाच्या वेगवेगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे सातत्याने काम केलं आहे. महिलांना उद्योगप्रिय बनवणे आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिलाई मशीन, आटा चक्की यांचेही वाटप केले आहे. तनिष्का सारख्या मोठ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि बचत गटांच्या माध्यमातून त्यांचे बरेच काम सुरू आहे. नुकतीच सुरू झालेली 'लाडकी बहीण' योजना ही त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू ठेवली आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सातत्याने काम करत आहेत."

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...