खासदार मेधाताई कुलकर्णी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सुवर्णांताई पाटील यांची घेतली भेट
सातारा, दि. ७ जुलै: भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरीय कार्य योजनेच्या अंतर्गत पुणे राज्यसभा खासदार आणि भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चा उपाध्यक्षा, सौ. मेधाताई विश्राम कुलकर्णी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रदेश कार्यकारणी सदस्या, सुवर्णांताई पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभांचे प्रमुख, आमदार, विधानसभा निवडणूक प्रमुख आणि बूथ कार्य समितीचे सर्व पदाधिकारी यांची बैठकही या निमित्ताने होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही योजना आखता येतील आणि सर्व मतदारसंघ महायुतीच्या विजयासाठी कसे बांधता येतील यासाठी खा. मेधाताई कुलकर्णी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यांच्याबरोबर सामूहिक मीटिंग घेऊन, चर्चा करून भविष्यातील नियोजन ठरवले जाईल. पक्षाच्या दृष्टीने आणखी नवीन काय करता येईल यासंदर्भातही सौ. सुवर्णांताई पाटील यांच्या घरी चर्चा झाली.
सौ. सुवर्णांताई पाटील यांच्या बद्दल बोलताना खासदार मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, "सुवर्णांताई पाटील या भाजपाच्या खूप जुन्या जाणत्या पदाधिकारी आहेत. महिला मोर्चाच्या कामापासून आतापर्यंत त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलं आहे. पक्ष जिवंत राहण्यासाठी आणि पक्षाच्या वेगवेगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे सातत्याने काम केलं आहे. महिलांना उद्योगप्रिय बनवणे आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिलाई मशीन, आटा चक्की यांचेही वाटप केले आहे. तनिष्का सारख्या मोठ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि बचत गटांच्या माध्यमातून त्यांचे बरेच काम सुरू आहे. नुकतीच सुरू झालेली 'लाडकी बहीण' योजना ही त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू ठेवली आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सातत्याने काम करत आहेत."
No comments:
Post a Comment