यशोदाचे प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांचे दक्षा नागरीक पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
कराड: दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन पोलीस मित्र महाराष्ट्र राज्याच्या वतीने नुकतेच कराड येथे "संस्था परिचय व पदाधिकारी क्षमता बांधणी प्रशिक्षण" शिबिर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये यशदाचे प्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी क्षमता बांधणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन वृक्षाला जलदान व संविधान प्रस्तावना वाचन करून अँटी पायरसी सेल मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी जितू महादेव गुप्ता, दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेश भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष राजेश भोसले यांनी प्रस्तावना करताना संस्था परिचय या विषयावर संपूर्ण संस्था कामकाजाची माहिती दिली. त्यांनी संस्थेच्या उद्दिष्टांपासून कामकाजाची पद्धत आणि भविष्यातील योजनांची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या व कार्यपद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
यशदाचे प्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून संस्था ध्येय साध्य करण्यास कशी मदत होते याबाबत विस्तृत विवेचन केले. त्यांनी सांगितले की, "संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून त्यांची क्षमता वाढवून त्यांना अधिक सक्षम बनवले जाते. त्यामुळे संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते."
या प्रशिक्षण शिबिरास दक्ष नागरिक पोलीस मित्रच्या महाराष्ट्र सचिव सौ. भक्ती पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष बोधिसत्व माने, वित्त व मार्गदर्शक अधिकारी महाराष्ट्र राज्य अर्जुन सकट, महासंचालिका कमल बोले, महाराष्ट्र अध्यक्ष सुजाता चव्हाण, महेश भोसले, दत्तात्रय जाधव, रमेश चव्हाण, साधना राजमाने, सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील पाठक, सचिन पवार, लता शिरतोडे, मनीषा मोहिते, सुवर्णा शिंदे, स्वाती सूर्यवंशी यांसह संघटनेचे सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत एकत्रितपणे काम करण्याचे वचन दिले. सहभागी पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आणि सहभागी पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment