Translate

Friday, November 12, 2021

One day digital marketing workshop | Swarnim Udyog Samuh Ashta, Dist. Saganli


एक दिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा

व्यवसाय कोणत्याही प्रकारचा असो सर्वच व्यवसायांचा ग्राहक वर्ग सध्या आणि येणा-या काळात ऑनलाईन आहे आणि असणार आहे. आपला ग्राहक ऑनलाईन असल्यामूळे आपला व्यवसायही ऑनलाईन घेवून जाणे ही काळाची गरज ठरत आहे. 

आता व्यवसाय ऑनलाईन न्यायचा म्हणजे नेमकं काय काय करायचं... त्याचा किती खर्च येतो. सर्वसामान्य छोट्या व्यवसायिकांना ही बाब शक्य आहे का... वेबसाईट असलीच पाहीजे काय की फक्त सोशल मिडीया पुरेसा आहे. गुगल वर सर्च टाकल्यास आपला इतरांना कसा दिसेल. बिझनेस डिरेक्टरी सबमीशन म्हणजे नक्की काय... व्यवसाय वृद्धीसाठी गुगल टूल्स चा प्रभावशील वापर ...सोशल मिडीयावर कुठे कसं जायचं. कशा पद्धतीने तो आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी वापरता येईल इ.

आपला व्यवसायाची यशस्वीपणे ओळख होण्यासाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी महत्वपूर्ण अशा प्रकारची कार्यशाळा स्वर्णिम उद्योग समूह आणि प्रशिक्षण केंद्र आष्टा जिल्हा सांगली व डिजिटल शेंडे  सातारा यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा आयोजित केली आहे.या कार्यशाळे अंतर्गत डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय साठी महत्त्वाचे मार्गदर्शन दिले जाईल.

आपला प्रवेश आजच निश्चित करा

अधिक माहितीसाठी संपर्क 

अध्यक्ष
स्वर्णिम उद्योग समूह आणि प्रशिक्षण केंद्र आष्टा, जि. सांगली
फोन नं. +91 9175096253


Thursday, November 11, 2021

घरच्या घरी पंचकर्म कार्यशाळा | Home Panchakarma Workshop

 सोपे पंचकर्म घरच्या घरी

घरच्या घरी सोपे पंचकर्म कार्यशाळा:


"पंच" म्हणजे 5 आणि "कर्म" म्हणजे कार्यपद्धती. आयुर्वेदिक पंचकर्म या 5 प्रक्रिया आहेत ज्याद्वारे आपण आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध आणि कायाकल्प करू शकतो. ते आहेत - वामन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण

या कार्यशाळेत आपण प्राचीन उपचार पद्धती पार पाडण्याची तपशीलवार पद्धत देखील शिकाल जसे की -

पादाभ्यंग,पत्र पिंडा स्वेदन, योनी धूपन, नेत्र तर्पण, जानू बस्ती, शिरोधारा, लेपन, चिकित्सा , गर्भसंस्कार, दिनचर्या इ.

या आयुर्वेदिक प्रक्रियेमुळे डिटॉक्सिफिकेशन, शरीराच्या अवयवांमधील वेदना बरे करणे, आपले - रक्त, त्वचा, उती आणि आपल्या शरीराचे प्रमुख अवयव आणि प्रणालींना पोषण मिळण्यास मदत होते. ते करू शकतात:

1. रोगग्रस्त व्यक्तीला लवकर बरे होण्यास मदत करते.

2. निरोगी व्यक्तीला आयुष्यभर चांगले आरोग्य राखण्यासाठी मदत करते !

या कार्यशाळेचा दिवसनिहाय तपशील

दिवस 1 - 2

पंचकर्म, पूर्वकर्म आणि पश्चात कर्म यांचा परिचय

आयुर्वेदानुसार तुम्ही "निरोगी व्यक्ती" म्हणून पात्र आहात का?

दिवस 3 - 4

कोणत्या आयुर्वेदिक पद्धती घरी सुरक्षितपणे करता येतात?

कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींना चिकीत्सकाच्या निरीक्षणाखाली करावे लागते?

दिवस 5-6

पंच कर्मांमध्ये अंर्तशुद्धी - वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण

- प्रक्रियेचे स्पष्टीकरण

- हे कोणी केले पाहिजे

- प्रत्येक कर्माद्वारे बरे होणारे आजार

दिवस 7-8

घरी बरे करण्यासाठी जानू बस्ती, कटी बस्ती, उरो बस्ती इत्यादी करण्याची प्रक्रिया -

स्नायू दुखणे/कडक होणे, स्पॉन्डिलायसिस, गुडघेदुखी, सांधेदुखी, लंबो सॅकरल वेदना इ.

दिवस 9-10

शिरोधारा - तणाव/नैराश्य/चिंता दूर करण्यास मदत करते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते.

थालापोथीचिल - केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि केसांशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यासाठी आयुर्वेदिक सराव

दिवस 11-12

नास्य - सर्व 5 इंद्रियांचे पोषण करण्यासाठी लोकप्रिय आयुर्वेदिक सराव.

मानेपासून डोक्यापर्यंतच्या सर्व समस्या/रोगांसाठी उपचार पद्धती (सर्व मानसिक रोगांसह)

नेत्र तर्पण - डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सराव

बिडालक - डोळ्यास सुखदायक पेस्ट तयार करणे

दिवस 13-14

पत्र पिंडा स्वेदन - पाठदुखी, मानदुखी, पेटके, कटिप्रदेश, संधिवात इत्यादी बरे करण्यास मदत करते

कर्ण पुरण - वात दोष संतुलित करण्यास मदत करते, कानाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, डोकेदुखी सोडते इ

दिवस 15-16

रेसिपी आणि पंचामृत खाण्याचे फायदे - रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे

गर्भसंस्कारावर सत्र

दिवस 17-18

सर्व आयुर्वेदिक उपचारांची आई - पादाअभ्यंग - घरी करण्याची तपशीलवार प्रक्रिया

योनी धूपन - स्त्रियांच्या स्त्रीरोगविषयक आरोग्य राखण्यासाठी डिझाइन केलेली अनोखी चिकित्स


स्थळ - व्हॉट्सअॅप आणि कायमस्वरूपी शंका समाधान माहिती तुमच्याजवळ  

मध्यम - वैयक्तिकरित्या रेकॉर्ड केलेले सत्र, संदर्भ नोट्स, पीडीएफ सारांश, 24*7 शंका अॅड्रेसल सुविधा

पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल

आपण कार्यशाळेत सामील होऊ इच्छित असल्यास, आपण नोंदणी गटात सामील होऊ शकता

शंका निरसन any time, whats app  गृपवर वर.

 कधीही, कुठेही,केव्हाही जॉईन होऊन लाभ घेऊ शकता.त्यासाठी ऑनलाइन राहण्याची गरज नाही.

Gpay no 9405593596

Or

nitayadav70@okhdfcbank

Or

HDFC bank, satara.

Acount no. 50100263790888

Acount-savings

IFSC code-HDFC0000790

 भाषा मराठी,इंग्लिश 

संपर्क -हाय टेक विश्व कन्सल्टन्सी 9405593596

https://chat.whatsapp.com/Ixvdsp4SROh92LiS6WlJzV

Monday, November 1, 2021

Happy Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सोशल मिडीया सातारा दिवाळी निमित्त सादर करत आहे 
साध्या सोप्या मराठी भाषेतून दिवाळीच्या शुभेच्छा... 
ज्या आपण  आपल्या मित्रपरिवारास कॉपी करुन शेअर करु शकता...
.



Wednesday, October 27, 2021

Share Trading Training | Udyamita Vikas Training Center

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा
शेअर ट्रेडिंग प्रशिक्षण 
शेअर मार्केटिंग मधील परिपूर्ण प्रशिक्षण


कमी कालावधीमध्ये जास्त फायदा मिळत असल्यामुळे शेअर्स ट्रेडिंग हे क्षेत्र सर्वांचेच आकर्षण ठरलेले आहे.मात्र या क्षेत्राबाबत असलेले अपूर्ण ज्ञान आणि गैरसमज यांमुळे इच्छा असूनही शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे अनेकांना अवघड वाटते. 

संपूर्ण ज्ञान मिळवून या क्षेत्रातून पैसे मिळवता यावेत यासाठी 
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे 

दि. १४ नोव्हेंबर 2022 पासून ५ दिवस

या वेळेत असणार आहे.  

 शेअरबाजार व्याप्ती आणि इतिहास, भारतीय शेअर बाजार, शेअर म्हणजे काय, प्राथमिक शेअर मार्केट, इनिशियल पब्लिक ऑफर, अलॉटमेंट, ग्रे मार्केट, लिस्टिंग, सेकंडरी शेअर मार्केट, निफ्टी आणि सेन्सेक्स, व्यवहार पद्धती, वायदा बाजार, फ्युचर आणि ऑप्शन, गोल्ड ईटीएफ, गोल्ड बीझ ट्रेडिंग, स्टॉक स्प्लिट, बोनस आणि डिव्हिडंड, कर विषयक प्रणाली, पैशाचे व्यवस्थापन,  नफा मिळविण्याचे अचूक तंत्र, फंडामेंटल अनालिसिस, कंपनीची योग्य निवड, रेशो अनालिसिस, बॅलन्स शीट अभ्यास, शेअर खरेदीची अचूक वेळ, टेक्निकल ऍनालिसिस चा अभ्यास, लाईन चार्ट, बार चार्ट, कॅण्डल स्टिक चार्ट, प्राईस पॅटर्न, इंडिकेटर्स, करन्सी मार्केट ट्रेडिंग, कमोडिटी मार्केटचा अभ्यास

ऑनलाइन ट्रेडिंग आणि प्रात्यक्षिक असे शेअर मार्केटचे परिपूर्ण  प्रशिक्षण असेल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना  काही अडचण अल्यास पुढे दोन वर्षे मार्गदर्शन  करण्यात येणार आहे..

Join Share Trading Training What's App Group

प्रवेश मर्यादित  

प्रवेशासाठी व अधिक माहीतीसाठी संपर्क 
श्री. महेश कुलकर्णी सर

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , 
राजधानी टॉवर्स, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा 
+91 9822397384 येथे साधावा .




Sunday, October 24, 2021

Download COVID 19 Vaccination Certificate | MyGov Corona Helpdesk


Click here to visit MyGov Corona HelpDesk


Type Certificate into it and enter 

Generating an OTP for the number  xxxxxxxx16. You will receive an OTP from Cowin.

Enter the 6 digit OTP below within 3 minutes

We're confirming your OTP, this may take up to 30 seconds ⌛

Here are the members registered with this number 👇

1. Your Name

2. Other person name

💡 Type 1-2 to select a member for downloading Cowin Certificate or type Menu to view the Main Menu.

Vaccine Number: Here is your COVID 19 Vaccination Certificate. 

Vaccine Number: What would you like to do next?

You can choose following options too 👇 

1. What to do if you have symptoms of COVID-19

2. Vaccination - Book Appointment, Download Certificate, Centre & FAQ

3. Latest Updates & Useful Alerts on COVID-19

4. Professional Advice & Ways to Improve Immunity

5. Where to Get Help - National & State Level

6. MythBusters - Authenticate News

7. Together We Can - Success Stories & Positive Harmonies

8. Info on Coronavirus, Symptoms and How to Reduce Risk


💡 Tip: You can type 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 to make a selection of the menu options.


Click here to visit MyGov Corona HelpDesk

 

Tuesday, October 19, 2021

Autumn | October Heat

 शरद ऋतू | ऑक्टोबर हीट


साधारणतः पावसाळा संपून ऑक्टोबर महिना सुरू झाला की वातावरण सूर्याची हुकूमत पुन्हा डोकावते. आयुर्वेद वर्णित शरद ऋतू आधुनिक नुसार ऑक्टोबर हीट हे शब्द नित्य दिनचर्येत प्रकर्षाने जाणवू लागतात.वातावरणात पर्यायाने शरीरात वाढलेली उष्णता जाणवू लागते.

ऋतुबद्दल एक ऋतू संपून जेंव्हा दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळी बाह्य वातावरणात झालेले बदल पर्यायाने शरीरात विविध व्याधी परिस्थिती निर्माण करते.आपल्या पूर्वजांना या गोष्टीचे ज्ञान होते.त्यामुळे ऋतुंबदल झाल्यावर पुढील ऋतुप्रमाणे आपला आहार विहार दिनचर्या यात बदल करणे आयुर्वेदानुसार अनिवार्य आहे आणि असे बदल आपण केले नाहीत तर आपण बदललेल्या वातावरणाने लगेच आजारी पडतो ही गोष्ट पाहायला मिळते.

वर्षा ऋतू अर्थात पावसाळ्यात शरीर अवयवांना थंडीची सवय झालेली असते.ऑक्टोबर शरद ऋतू मध्ये अचानक सूर्य संताप वाढतो.या काळाला ऑक्टोबर हीट किंवा second summer म्हणतात.

या काळात पित्त दोष मोठ्या प्रमाणात वाढून पित्ताचे विकार जसे की अंगावर पित्त, गांधी उटणे.हात पाय डोळे शरीर याची आग होणे,तोंड येणे,रांजणवाडी नाकामध्ये फोड येणे होतात.

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिले की नाक गळणे सर्दी शिंका ताप कणकण चक्कर अशक्तपणा थकवा या गोष्टी हटकून होतात.

यासाठी या ऋतूमध्ये आहारात गुलकंद,मोरावळा,आवळा,पेठा, मनुके,बेदाणे,सुके अंजीर,खडीसाखर ,चंदन यांचा समावेश करावा.

तिखट मसालेदार आले लसूण मिरची दही मासे अंडी शेवगा शेपू मेथी शिमला मिर्च या उष्ण गोष्टींचा अतिरेक टाळावा.

उन्हामध्ये काम करणे उन्हात फिरणे टाळावे फिरायचे झाल्यास डोक्यावर टोपी छत्री वापरावी.अंगाला खोबरेल तैल चंदन तैल सारखी शीत तैल वापरावीत.

एका ऋतूचा शेवटचा आठवडा व पुढे येणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा याला आयुर्वेदात ऋतुसंधी म्हणतात. यावेळी पूर्वीच्या ऋतूची दिनचर्या विधी त्याग करून सुरू होणाऱ्या ऋतूच्या वातावरणातील बदलानुसार दिनचर्या विधी क्रमाने प्रारंभ करावा.तो विधी एकदम बंद किंवा सुरू केल्याने त्याची सवय नसल्यामुळे आजार निर्माण होतात.उदा. आपण अचानक उन्हात फिरले काम केले की ऑक्टोबरमध्ये लगेच आजारी पडतो.

"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।"

वैद्य राहुल चव्हाण वैद्या सुमिता चव्हाण

शाश्वत आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक व केशायुर्वेद ब्रँच सातारा

shashwatayurvedic.com

Mo. 9421619384

Monday, October 18, 2021

घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य


बाप्पाची आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.


आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहू या व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे...


वैशिष्ट्ये :

(१) प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत.

(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.

(३) पहिले कडवे मराठीत असून, उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.

(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हटली जाते.

(५) सर्व कडवी कृष्णाला उद्देशूनआहेत.

(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे...

आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहू या

१) घालीन लोटांगण वंदीन चरण

     डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

     प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन

     भावे ओवाळीन म्हणे नामा ॥

वरील कडवे संत नामदेव महाराजांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे.

अर्थ...

कृष्णाला (विठ्ठलाला) उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.


२)  त्वमेव माता च पिता त्वमेव ।

     त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥

     त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

     त्वमेव सर्व मम देव देव ॥

हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.

अर्थ...

तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.

(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा

    बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात ।

    करोमि यद्येत सकल परस्मै

    नारायणापि समर्पयामि ॥

हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.

अर्थ…

श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा! माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.


(४) अच्युतम केशवम रामनारायणं।

      कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी ॥

      श्रीधर माधवं गोपिकावल्लभं ।

      जानकी नायक रामचंद्र भजे ॥

वरील कडवे आद्य शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.

अर्थ…

मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.


(५) हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।

     हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे. (ख्रिस्तपूर्व काळातील आहे).

कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.

 🚩 राम कृष्ण हरी 🚩


आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...