राजधानी साताराच्या काळात राजवाड्याच्या शेजारीच असलेले तळे "मोती तळे" म्हणून ओळखले जात आहे.
या तळ्याचे पाणी एवढे स्वच्छ होते की मोती जरी यात पडला तरी तो दिसत होता असे म्हटले जात असे तसेच मोती नावाचा हत्ती या तळ्यात पाणी पिण्यास येत होता म्हणून मोती तळे नाव पडले असावे.
तसे पाहिल तर हे ऐतिहासिक तळे आहे. या तळ्याची रचना पुरातन दिसून येते, काही ठिकाणी भगदाड पडले आहे इतर ठिकाणी तळे भक्कम रित्या आजही उभे आहे.
नगर पालिका च्या मालिकचे हे तळे ऐतिहासिक दृष्ट्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याकडे सातारा नगर पालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येते. तळ्या भोवती कूंपन घातले तरीही सातारकर यात कचरा टाकत असतात. यातील शेवाळे, वाढणा-या वनस्पती, गाळ वेळोवेळी काढण्यासाठी नगर पालिका उदासीन दिसते त्यामूळे नाव जरी मोती असल तरी अनोळखी व्यक्ति ला ही एक कचरा कुंडीच भासते.
विशेष म्हणजे परिसरात असणारे सातारकरांना आपल्या ऐतिहासिक वास्तू जपव्यात या बद्दल काहीही वाटत नाही त्यापैकी ही एक वास्तू आहे.
तस पाहिल तर सातारा शहर हे ऐतिहासिक शहर मात्र निरुत्साही धोरणांमूळे मराठा राजधानी फक्त कागदावर राहिली असल्याचे चित्र आहे.
नगर पालिकेने, सातारकरांनी राजधानी साताराच्या खुणा जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment