सातारा जिल्हा मध्ये कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. जिल्हा बंदी उठविण्याच्या आधीच लाखो लोक मुंबई पुणे तसेच बाहेरील भागातून जिल्हा मध्ये दाखल झाल्याचे प्रशासनास माहित होते. जिल्हा बंदी उठल्यानंतर किती लोक आले याची प्रत्यक्ष नोंद नाही. आता ई पास ची सक्ती शिथील झाल्यानंतर कोण कधी कुठून येतोय कुठे जातोय याचीही नोंद ठेवणे अशक्यच.
कोरोनाशी लढताना सातारा प्रशासन, नेते मंडळी यांची अनास्था पहिल्या पासूनच दिसून आली. कोरोना चाचणी केंद्र सुरु होण्यासाठी तब्बल १० ते १२ हजार रुग्ण संख्या होण्याची वाट पाहावी लागली. त्याच बरोबर जिल्हा प्रवेश प्रक्रिये मधील भष्ट्राचारही चर्चेचा विषय झालाच. जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, सातारकरांचा सवय भान हरपल्याचा पुरावा, आशा ताईना न मिळालेला प्रतिसाद हे कोरोना युद्ध वाढत चाललेची खुण मानावी लागेल.
सुमारे ११ तालुके असलेल्या सातारा मध्ये कोविड रुग्णालयाची गरज उद्भवू शकते याची पुसटशी ही शंका प्रशासनास येवू नये हे विशेष आहे, जिथे लाखो लोक दाखल झाले तिथे रुग्ण वाढणारच त्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊले न उचलल्यामूळे रुग्णास बेड ही न मिळण्याची अवस्था सातारा सारख्या निम्न शहरी भागात झाली...
तहान लागली की आड खणायचा या म्हणी येथे विचार येतो...
रुग्ण संख्या हाता बाहेर जावू लागली, बेडची कमतरता पडू लागल्यावर कोविड रुग्णालय उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या.
हे रुग्णालय सुरु कधी होणार तो पर्यंत रुग्ण संख्या तितकी वाढणार...
सातारा मध्ये युद्ध पातळीवर गावोगावी कोविड रुग्णालये उभे करणे आवश्यक आहे हाच पर्याय होवू शकतो. आता तरी जागे होवून वेळीच पाऊले उचलणे गरजेचे नव्हे तर जगण्यासाठी अतिशय आवश्यक बनले आहे.
साताराची शांतता त्यांच्याच मूळावर उठता कामा नये हीच अपेक्षा!!!
टिप: आपले मत जरूर नोंद करा, शेयर करा
No comments:
Post a Comment