मकर संक्रांत आहारदृष्ट्या महत्त्व ....
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
हा दिवस आपल्या जीवनातील आनंद वृद्धींगत करण्यासाठी, आपल्या स्वप्नांना वास्तविकतेत रुपांतर करण्यासाठी आणि आपल्या सर्व प्रयत्नांना प्रचंड कामगिरी बनवण्याच्या सर्वोत्कृष्ट संधी आणेल. आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक मकर संक्रांती 2021 च्या शुभेच्छा
संपर्क
निर्झर आयुर्वेद, योग व पंचकर्म सेंटर, पाचवड सातारा, सातारा - 415513
985 095 9842
No comments:
Post a Comment