आयुर्वेदिक फार्मासिस्ट प्रशिक्षण
आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती ही अत्यंत जुनी, अत्यंत गुणकारी आणि जनमानसांनी विश्वासाने स्विकारलेली चिकित्सा पद्धती आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली ही चिकित्सा पद्धत असल्यामुळे आणि साईड इफेक्टस् अत्यल्प असल्यामुळे या चिकित्सा पद्धतीला चांगलीच मागणी आहे. त्याचमुळे आयुर्वेदिक औषधांच्या विक्री व्यवसायाला खूपच चांगला वाव आहे. आयुर्वेदिय औषधांचे दुकान सुरु करता यावे याकरिता उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत सातारा मार्फत आयुर्वेदा फार्मासिस्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भारत सरकार नोंदणीकृत
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा
येथे दि. 14 मार्च 2021 पासून प्रत्येक
प्रत्येक रविवारी दु. 02 ते 4.30
यामध्ये शास्त्रिय आयु्र्वेदाची ओळख, आयुर्वेदाचा इतिहास, आयुर्वेद परंपरा, स्वास्थ्य, त्रिदोष कल्पना, सप्तधातु कल्पना, त्रिमल कल्पना, आत्मा आणि इंद्रिये, मन कल्पना, अग्नि कल्पना, स्त्रोतस कल्पना, अष्ठविध परिक्षा, एकादशविचार, विकास उत्पत्ती, विकार कारणे, विकार लक्षणे, विविध विकारांची माहिती, महत्वाच्या वनस्पती व त्यांचे उपयोग, औषधांचे विविध प्रकार, पंचविध कशाय कल्पना, द्रव्यगुण माहिती, 120 वनस्पतींची माहिती, विविध विकारांवरील औषधांची ओळख, प्रमुख आजारांची ओळख, 250 हून अधिक औषधांची माहिती, दुकान सुरु करताना कायदेशीर बाबींची माहिती, औषधांच्या कंपन्यांची माहिती, औषधांचे मार्केटिंग कसे करावे याची माहिती इत्यादींचे तज्ञांकडून सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्रवेश मर्यांदित असून प्रथम येणा-यांनी प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहीती साठी
महेश कुलकर्णी ,
संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा
9822397384 येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment