Translate

Saturday, April 17, 2021

Avoid Coronaphobia

एक सकारात्मक पाऊल...

कोरोना कोरोना कोरोना वाचून पाहून ऐकून डोकं आऊट होत असेल तर हा लेख आपल्यासाठी...


सध्याच्या काळात वर्तमानपत्र, टि.व्ही. बातम्या चैनेल्स, सोशल मिडीया पोस्ट, आपसातील चर्चा यांचा कोरोना हाच महत्वपूर्ण अथवा गप्पांचा विषय होताना दिसत आहे. ब-याच ठिकाणी विदारक अशी परिस्थितीच आहे हे ही सत्य नाकारता येणार नाही. 

कुटूंबातील हरएक जण रोजच्याच जर कोरोना विषयक बातम्या पाहून हळहळ करीत राहीला तर संकट दूर जाणार नाही उलट आपल मानसिक स्वास्थ्य मात्र हरवलं जावू शकतं.

टि. व्ही. चॅनल्स कोरोना सोडून सध्या तरी काहीही दाखवताना आपणास दिसत नाहीत. खरं-खोट यांचा सारासार विचार सर्व सामान्य जनता करत बसत नाही. तर जे समोर येतय त्यावरच जास्त करुन विचार-आचार करताना आपल्याला दिसते.

परिस्थीती अशीच शाबूत राहीली तर कोरोनो पेक्षा मानसिक आजार असलेले रुग्ण येणा-या काळात आढळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्याला आपण कोरोनाफोबिया अस नाव देवू शकतो.


यातून मार्ग काढण्याठी खालील मार्ग आपण जाणिवपूर्वक अमलात आणू शकता.

मनाशी खूणगाठ बांधा...

 आजपासून पुढील काही दिवस  सोशल मिडीयावर, व्हॉटस्अप  ग्रुपवर कोरोना संदर्भात पुढीलपैकी कुठल्याही पोस्ट टाकायच्या नाहीत.  

डॉक्टरांचे व्हिडीओज,  गावठी उपचार,  सल्ले-सूचना,  भीतीदायक व्हीडीओज्,  अंत्यविधीचे वीडियो, भावपूर्ण श्रद्धांजलीचे फोटोज आणि पोस्ट.. 


कारण त्यामुळे लोकांमध्ये निगेटिव्ह वातावरण पसरते.  

लक्षात ठेवा ख-या संकटापेक्षा त्याची चर्चाच जास्त हानीकारक असते.

तसेच मोबाईल मधील सर्व कोरोना संदर्भातील फोटो, वीडियो, मेसेजेस,  भावपूर्ण श्रध्दांजलीचे फोटो डिलीट करून टाकावे. 


त्याचबरोबर आपल्या सोशल मिडीयाच्या वॉल जर अशा प्रकारच्या पोस्ट दिसल्या तर पोस्टच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन आडव्या डॉट वर ... टॅप करुन I dont' want to see this हा ऑप्शन सिलेक्ट करुन Hide Post हा ऑप्शन सिलेक्ट केल्या अशा प्रकारच्या पोस्ट आपणास जास्त करुन दिसणार नाहीत.

टी. व्ही. चॅनलवर सुरु असलेल्या सततच्या  कोरोना विषयक बातम्या सतत पाहणे टाळू शकता.

तातडीच्या कारणांसाठी असल्यास जवळचे अत्यावशयक सेवा देणारे नंबर वहीत लिहून ठेवू शकता.


एक पाऊल Positive(+ve) च्या ऐवजी सकारात्मक होण्याकडे टाकूया.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...

2 comments:

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...