Translate

Sunday, November 21, 2021

Demolished 135 year old bridge at Wai district Satara

वाई जिल्हा सातारा येथील 135 वर्षे जुन्या पूलाचा अस्त...

 19 नोव्हेंबर 2021 हा  दिवस वाईकरांच्या कायम लक्षात राहिल. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला तसेच गाजलेल्या अनेक हिंदी - मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणात महत्वाचा ठरलेला सुमारे 135 वर्षांपासूनचा पूल या दिवशी पाडण्यात आला.

 वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य पुल म्हणून ज्याची ओळख आहे, असा किसनवीर या मुख्य चौकास जाडणारा ब्रिटिशकालीन पूल असा हा पूल होता. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला पूल हा १८८४ साली ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३५ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानतंर १९८४ साली ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्याबाबतीत पत्र पाठविण्यात आले होते.

दरवर्षी येणा-या पूरातही हा पूल आपले अस्तित्व टिकवून ठेवत होता. त्यास ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणून राखीव ठेवून दुस-या सक्षम पूलाची निर्मीती हा पर्याय होऊ शकला असता तर... असा प्रश्न सर्व सामान्य वाईकरांस पडणे स्वाभाविक आहे.

असो...

आता या पूलाचे दर्शन त्यावर छायाचित्रण झालेल्या चित्रपटांमधून होत राहिल हे मात्र खरं...

  


शाश्वत आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक व केशायुर्वेद ब्रँच सातारा
shashwatayurvedic.com
Mo. 9421619384

आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...