Translate

Saturday, November 27, 2021

Devmanus Serial Statue Rajwada Satara

चर्चा मालिकेच्या पुतळ्याची 


सातारा शहरातील गजबजलेल्या राजवाडा परिसरात वाई भागात झालेल्या हत्याकांडावर आधारीत एका मालिकेच्या दुस-या भागाची जाहिरात करणेच्या उद्देशाने चक्क त्या मालिकेतील खलनायकाचा पुतळा ठेवण्यात आला.

खर पाहिल तर जे झाल ते झाल त्यावर पोळी भाजत राहून घेण्यात मालिकेच्या निर्मात्यांना ती मालिका दाखविण्या-या वाहिनेने आता आवरत थांबलेल. पहिल्याच भागात डॉक्टर, पोलिस, ग्रामिण ग्रामस्थ, वकिल, ग्रामीण भागातील महिला यांच्या विषयी यथेच्छा चेष्टा या पूरेपूर करुन घेतली होती हे सर्वांनी पाहिलच होत. मालिकेचा टी-आर-पी कमी झाल्यामूळे सदरची मालिका टुकार शेवट करुन उरकण्यात आली होती. असे असताना पुन्हा दुसरा भाग नको रे बाबा अशी सर्व सामान्य धारणा असू शकते.

सातारा शहरातील राजवाडा भागात अशा प्रकराचा पुतळा बसविण्याची मूळात परवानगी कोणी दिली की कोणालाच न विचारता बसवला गेला हा प्रश्न आहे.  

आओ जाओ घर तुम्हारा अशी साताराची अवस्था तर नाही ना...

पुतळा कोणी बसवला हे उघडच आहे. (अज्ञात व्यक्तीने बसवला अस सांगितल जातयं आता अज्ञात व्यक्ती कोण हे सर्वानाच माहिती असणार (अर्थात मालिकेतील संबंधीत))  दुचाकी चार चाकी नोपार्किंग मध्ये दिसली तरी दंडात्मक कठोर कारवाई होते. तसच हा पुतळा बसविणा-यांच्या विरोधात   संबंधीतांवरही कारवाई होणे अपेक्षित.

आमच्या सातारला ग्रामीण बाज नक्कीच आहे. पण याचा अर्थ त्यास मालिकेच्या टी-आर-पी साठी टुकारपणातून दाखवणे कितपत योग्य आहे. पुतळ्या बसवले नंतर रकानेच्या रकाने मालिकेच्या जाहिराती संबंधी छापून येवू लागले. असले उद्योगास सामाजिक जागेत परवानगी देत कोण...

बाहेर गावाकडून येणा-या बाया-बापड्या या पुतळ्यास पाया पडत असल्याचीही चर्चा सुरु होती.पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पण टुकार मालिकेच्या जाहिरातीसाठी ऐतिहासिक राजवाडा परिसरात अशा प्रकारचा पुतळा बसवणेची मानसिकता तरी कोठून येते असेल प्रकार कायमचे बंद होणं गरजेच.



No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...