Translate

Tuesday, December 7, 2021

Why the color of the passenger plane is white

माहित करुन घ्या... प्रवासी विमानाचा रंग हा पांढरा का असतो!! 

विमान प्रवास आपल्यापैकी अनेकांनी केला असेल किंवा नसेलही केला तरी लहानपणापासून अनेकांनी दूरुन का होईना विमान पाहिलेलं असतं. हे पाहत असताना तुम्ही याकडे कधी लक्ष दिलं नसेल की, काही अपवाद वगळता बहुतेक प्रवासी विमाने ही पांढऱ्या रंगांची असतात. 

मग ते कोणत्याही देशाचं असो. पण कधी विचार केलाय का, की प्रवासी विमानांना पांढराच रंग का असतो? 

खरंतर याच्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. ती काय हे जाणून घेऊया....

सूर्याचा प्रकाश होतो रिफ्लेक्ट

विमानाला पांढरा रंग ठेवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाचा चांगला रिफ्लेक्टर असतो. काळा किंवा इतर कोणत्या डार्क रंगांप्रमाणे पांढरा रंग हा सूर्याचा प्रकाश आणि त्याची गरमी शोषूण घेत नाही. जर विमानाचा रंग डार्क असेल तर याने सूर्य प्रकाश आणि त्याची गरमी शोषूण घेतली जाईल आणि याने विमानाच्या मशीनवर वाईट प्रभाव पडू शकतो. 

तेलगळती सहज कळते

 जर विमानातील मशीनरी किंवा कोणत्याही भागातून तेलगळती होत असेल तर, तेव्हा पांढऱ्या रंगामुळे ती सहजपणे बघता येऊ शकते. त्यामुळे विमानांचा रंग हा पांढरा ठेवला जातो. 

शोधणं सोपं होतं

जर विमानाचा अपघात झाला असेल आणि विमान कुठे जंगलात किंवा पाण्यात पडलं असेल तर पांढऱ्या रंगामुळे शोधणं सोपं होतं. रात्रीच्या अंधारात पांढऱ्या रंगाचं विमान सहज बघितलं जाऊ शकतं. 

        


शाश्वत आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक व केशायुर्वेद ब्रँच सातारा
shashwatayurvedic.com Mo. 9421619384

आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय 
सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

No comments:

Post a Comment

SK Spirulina – The Natural Superfood from Karad, Satara

 Are you looking for a natural supplement to boost your energy, immunity, and overall health? SK Spirulina Farming & Manufacturing, Kara...