भावा सातारकरांना पडलीये
राजधानी सातारा च्या सेल्फी पॉईंटची अभिमानास्पद भुरळ...
सातारा ही मराठा साम्राज्याची चौथी राजधानी. सातारा शहरच काय एकूण जिल्हाच ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण आहे. जरी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असला तरी सातारामध्ये ऐतिहासिक वास्तूचं जतन म्हणावं एवढ झाल नाही हे सत्य आहे. त्यामूळे राजधानी असलेला सातारा हा तसा अनोळखी राहीलाय अस म्हटल तर वावगं ठरणार नाही.
सध्या सातारा शहर वेगाने कात टाकत आहे. त्यात मैलाच दगड ठरलाय तो ग्रेड सेपरेटर ... आहा.. अहो... सातारा मध्ये एंट्री घेताना किंवा सातारामधून बाहेर जाताना हौसेने ग्रेड सेपरेटरचा वापर करणारी मंडळी पाहायला मिळत आहेत.
त्या बरोबर नुकतचं लोकापर्ण झालेलं राजधानी सातारा सेल्फी पॉईंट ने तर सातारामध्ये येणा-या तसचं सातारकरांना सेल्फी काढण्यासाठी भूरळच पाडली आहे.
पाहाव तिकडं आय लव्ह गावाचं... शहराचं नाव पाहायला मिळत... मात्र राजधानी असलेलं फक्त सातारा मध्येच बरं का...
म्हणूनच राजधानी सातारा सेल्फी पॉईंट सोबत फोटो असलाच पाहीजे...
सकाळ, दुपारी, सायंकाळी, रात्री हा पॉईंट सध्या गजबजलेला असतोय.
आहो राजधानी सातारा सोबत फोटो असणं म्हणजे मराठी माणसाला अभिमानाचीच बाब...
मग राजधानी सातारा सेल्फी पॉईंटला दिलीये ना भेट नसलं तर आवर्जून द्याच.
पत्ता पोस्ट ऑफिस समोर, पोवई नाका सातारा Show on Google Map
आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com
No comments:
Post a Comment