Translate

Thursday, July 29, 2021

Social media and news channel

 



Socail media वरील अनेक बातम्या मधून लसी बाबत अनेक उलट सुलट बातम्या देण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते. खरं तर या प्रकार च्या बातम्या मुळे सर्व सामान्य जनतेला दिलासा कमी आणि गोंधळ जास्त मिळत आहे. 


खरं काय हे कोणालाच माहिती नसावं हे यावरून दिसत आहे. खरतर  लसीकरण म्हणजे संजवीनी नाही की अमृतही नाही की जी घेतलं की आपणास काहीच होणार नाही. मन मर्जीने आपण वागू शकतो असेही नाही तर लसीकरण ही मृत्यू प्रमाण रोखणे, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच कोरोना लागण झाल्यास त्याचे गम्भीर परिणाम पासून सुटका मिळणार आहे, घरच्या घरी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन त्यातून लवकर बरे होता येणार आहे 


लस घेतल्यावरही त्रिसूत्री च पालन करावंच लागणार आहे.  



तेव्हा या बातम्या वाल्यानी लसी बाबत योग्य जन जागृती करून जास्तीत जास्त लसी करण मोहिमेत जनता कशी सहकार्य करेल याकडे लक्ष द्यावं. 

अजून विशेष बाब म्हणजे याबाबत केंद्र सरकार किंवा आरोग्य यंत्रणा कधी काहीच माहिती जाहीर करताना दिसत नाही, मग यांनाच ही माहिती मिळते तरी कोठून, बरं हे टीव्ही चॅनेल वर या बाबत चे लाईव्ह टेलिकास्ट ही करताना दिसून येत नाहीत. 


Social media वर धडाधड बातम्या प्रकशित करण्यात यांचा सपाटा असतो 

Social media वर हजारो लोक ऍक्टिव्ह असतात त्यांना अशा प्रकारच्या बातम्या निश्चितच त्रास दायक ठरत असणार तेव्हा... 

सर्वच लसी या अतिशय उपयुक्त आहेत या मध्ये वर्गीकरण करून बातम्यावाल्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये हीच अपेक्षा... 

Wednesday, July 21, 2021

Diploma in Naturopathy and Yogic Science

 डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स (DNYS)  

प्रवेश सुरू  

 पंचमहाभुतांनी निसर्ग तयार झाला आहे आणि निसर्गातील प्रत्येक सजीवही पंचभुतांनीच तयार झाला आहे. मानवी शरीरही पंचभुतांनीच तयार झाले आहे. एक प्रकारे आपण निसर्गाचेच आपत्य असल्यामुळे निसर्ग आपल्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत आसतो. पण आपण बुद्धीजीवी निसर्ग नियमांना पायदळी तुडवून आजारांना निमंत्रण देत आहोत. याचा परिणाम आपली आरोग्य शक्तीच क्षीण होत चालली आहे. 





त्या मुळेच आपल्या आजूबाजूला अनेक लोक कॅन्सर, पॅरेलिसीस, डायबेटीस, थायराॅईड, हृदयरोग, डेंग्यू,.... करोना.... आजारांनी ग्रस्त झालेले दिसतात. ऑलिओपॅथी औषधे सहज सुलभ आणि परिणामकारक असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवन सुरू आहे कि शरिराची प्रतिजैविके बनवविण्याची (प्रतिकार शक्ती) क्षमताच कमी झाली आहे.  निसर्गतःच सुदृढ शरीर आपल्याल मिळवायचे असेल, आजार होऊच नये आणि झालाच तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याकडे हवी असे वाटत असेल तर अनन्यसाधारण अशा निसर्ग उपचार पद्धतीला समजून घेतले पाहिजे. 
 आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ,सुद्रुढ, सशक्त ठेवण्यासाठी निसर्गउपचार शिकून घेतलेच पाहीजेत आणि निसर्ग उपचार केंद्रे उभी राहीलीच पाहीजेत. 

निसर्ग उपचार केंद्र सुरू करता येण्यासाठी भारत सरकार नोंदणीकृत उद्यमिता प्रशिक्षण केंद्रा मार्फत डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स प्रशिक्षणाचे प्रवेश सुरू होत आहेत. 

हे प्रशिक्षण  23/6/2024 पासून प्रत्येक रविवारी दु. 11.00 ते 1.30  असे एक वर्ष कालावधीचे असेल. 

यामध्ये शरीरशास्त्र, शरिराला होणारे आजार व त्याची शास्त्रोक्त कारणे, शुद्ध निसर्गोपचार नियम, निसर्गोपचाराच्या विविध पद्धती यांमध्ये नाभीपरिक्षण,स्नेहन, स्वेदन( शास्त्रोक्त मसाज), शरिरशुद्धी(विषद्रंव्ये शरीराबाहेर काढणे ), विविध चिकित्सा पध्दती यामध्ये जलचिकित्सा, मडथेरपी, कुंजीर, हीपबाथ, कॅल्शिअम बाथ, एनिमा, एक्युप्रेशर शास्त्रोक्त पद्धतीने प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहेत. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

 

                                          अधिक माहीती साठी व प्रवेशप्रक्रियेसाठी 

महेश कुलकर्णी , राजधानी टाॅवर्स, राजवाडा बसस्टाॅपजवळ सातारा 

येथे संपर्क साधावा. 9822397384.

Tuesday, July 13, 2021

14 July 2021 availability of vaccine | Satara city

 14 जुलै साठी उपलब्ध असलेले मोफत लस प्रमाण 

+18 साठी फक्त 2 रा डोस कोवॅक्सिन 

सिव्हिल हॉस्पिटल 171

गोडोली 62

कस्तुरबा 57


 (13/7/2021 वेळ 10.57वाजता चा स्क्रीनशॉट )

Wednesday, June 9, 2021

Satara's delicious identity Dadaj Biryani साताऱ्याची लज्जतदार ओळख दादाज् बिर्याणी

 साताऱ्याची लज्जतदार ओळख "दादाज् बिर्याणी"



साताऱ्याच्या खाद्यसंस्कृतीत मागील काही वर्षांत अनेक नव्या ब्रँडची भर पडली आहे. सातारची दादाज् बिर्याणी हा ब्रँड त्यापैकी एक. एखाद्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर कष्ट घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी असेल तर छोट्या व्यवसायाचं अल्पावधीत मोठ्या व्यवसायात रूपांतर करता येतं. याच उत्तम उदाहरण म्हणजे दादाज् बिर्याणी हाऊस. श्रीकांत व प्रशांत या फडतरे बंधुंनी १४ वर्षांपूर्वी हॉटेलिंगच्या व्यवसायात उतरून तो यशस्वी करुन दाखविला आहे. साधारण १६ वर्षांपूर्वी आपल्या चुलत भावांसोबत भू विकास बँक चौकात (सातारा पेट्रोल पंपाशेजारी) चहा व वडापावचा गाडा सुरू केला. व्यवसाय छोटा असला तरी स्वप्न मात्र मोठी होती. 

सगळेच  करतात त्यापेक्षा वेगळ्या व्यवसायाची गणितं मांडली गेली. दहा-पंधरा वर्षांपूर्वी स्पेशल बिर्याणी खिलवणारी हॉटेलं साताऱ्यात नव्हतीच असं म्हटलं तरी चालेल. मेन्यू पक्का झाल्यानंतर १३ ऑगस्ट २००७ रोजी शाहू स्टेडियममध्ये (सातारा पेट्रोलपंपासमोर) एका गाळ्यात दादाज् बिर्याणी हाऊसचा शुभारंभ झाला. अवघ्या दोन कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू झालेलं हे बिर्याणी हाऊस आज ५० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे.  



आज इथे व्हेज व नॉनव्हेज अशा मिळून सव्वाशेपेक्षा जास्त डिश बनवल्या जातात. दादाज् म्हटलं की इथली लज्जतदार बिर्याणी आणि डिलिशियस चिकन तंदूर, एवढी ओळखही पूरेशी ठरते. केवळ अन्न पदार्थांचा दर्जा न साभाळल्याने म्हणा किंवा जास्तीचा नफा मिळविण्याच्या नादात केलेल्या तडजोडींमुळे कोट्यवधींची गुतंवणूक करुन सुरू केलेली रेस्टॉरंट अल्पायुषी ठरल्याची उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. 


दादाज् बिर्याणीमध्ये पदार्थांची चव जपण्याच्या बाबतीत कसलीच तडजोड केली जात नाही. लांब सडक ब्रँडेड तांदळापासून बनवलेली बिर्याणी असो, तंदूर असो अथवा इतर कोणताही पदार्थ... तो बनविण्यासाठी वापरला जाणारा सर्व मसाला घरीच बनविला जातो. बिर्याणीला दम देण्यासाठी गॅस न वापरता फक्त कोळशाचा वापर कटाक्षाने केला जात असल्याने चिकन, मटणाचा अर्क पूरेपूर उतरल्याचा अनुभव घास तोंडात गेल्या गेल्या येतो. घरी बनविलेल्या तुप व दह्यामुळे बिर्याणी आणि तंदूरची ऑथेंटिक चव तुमच्या जिभेवर दरवळत राहते. इथे घरगुती मसाल्यांचा सिक्रेट फॉर्म्युला असल्याने तुमचे पोट बिघडणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. ग्राहक हाच सर्वोपरी मानून श्रीकांत व प्रशांत हे बंधू इथे मालक व कामगार या दोन्ही भूमिकांमध्ये वावरताना दिसतात. रोज सकाळी ६ वाजता भाजी व मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदीपासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो.


सुरुवातीच्या काळात जास्त कामगार ठेवणे परवडत नसल्याने  आई-वडिलांसह दोघा भावांनी कसलीही लाज न बाळगता भांडी धुण्यापासून साफसफाई, प्लेटा उचलण्यासह आचाऱ्याच्या हाताखाली कामे केली. शिकून घेतले. व्यवसाय वाढवायचा, काहीतरी करून दाखवायचे एवढीच जिद्द होती. त्याचा व्यवसाय वाढीसाठीच फायदा झाला. अनेक अडीअडचणी येऊनही चव व दर्जा जपण्यात कसलीच तडजोड केली नाही. परिणामी चव लोकांना आवडत गेली. लोकांनी केलेली स्तुती हेच आमचं मार्केटिंग होतं. त्यामुळे जाहिरातीवर वेगळा खर्च करण्याची गरज पडली नाही. पहिली तीन वर्ष खर्च भागत होता. कर्जाचा हप्ता कधीतरी थकायचा मात्र, या दोघा बंधुंनी हार मानली नाही. ग्राहक व त्याच्या अपेक्षांची पुर्तता करीत गेले. हेच यशाचे गमक ठरले. 

त्यामुळे सुरुवातीला फक्त बिर्याणी व तंदूर हे दोनच पदार्थ होते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेल्यानंतर थाळी व डिश सिस्टिम आली. व्हेज पदार्थ आले. तीन वर्ष संघर्षात गेल्यानंतर व्यवसाय वाढू लागला तर जागा कमी पडू लागली. त्याचवेळी श्रीकांत व प्रशांतचे मामा मदतीला धावून आले. त्यांनी त्यांचे मुंबईतील घर गहाण ठेवून पैसे दिले व आणखी एक गाळा विकत घेतला. जागा वाढल्याने ग्राहकही वाढले. मग मागे वळून बघण्याची गरजच पडली नाही. त्याने त्या एका गाळ्याचे आठ गाळे झाले. त्यासोबतच दादाज् बिर्याणी हाऊसचा पसाराही वाढत गेला. दोन-तीन तासात हजार माणसांचे जेवण बनविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पहिल्या दिवसापासून जपलेली चव व दर्जा हे दादाजच्या आजच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच साताऱ्याचा हा बिर्याणी ब्रँड राज्यभर पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.


आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Saturday, May 29, 2021

Leopard sightings in Satara



सातारा मध्ये सध्या कडक लॉकडाऊनमूळे सर्वत्र वाहनांची वर्दळ कमीच दिसून येते. तस पाहिल तर किल्ले अजिंक्यतारावर बिबट्याचे अस्तित्व असल्याचे बोलले जाते. कमालीची शांतता असल्यामूळे कचरा डेपोच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने आपले अगदी आरामशीर पहूडलेला बिबट्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल होतो आहे.

किल्ले अजिंक्यताराच्या उतारावर शाहूनगर परिसरातील घनदाट झाडीमध्ये बिबट्या दर्शन होणे ही नित्याची बाब आहे. तसच किल्ल्यावरील अनेक ठिकाणीही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे दिसते.

मात्र कचरा डेपोच्या संरक्षक भितीवर दिवसा बिबट्याचं दर्शन होणे ही तस पाहिल तर गंभीर बाब मानली पाहिजे, खरतर या परिसरात कायम वाहनांची वर्दळ सुरु असते. बिबट्या एवढ्या खाली येत असेल तर त्याला वेळीच जेरबंद करणे आवश्यक बनते.

या परिसरात रहिवासी वस्ती जरी कमी असली तरी वर्दळ मात्र कायम असते. येणा-या कच-याचा गाड्या, दु-चाकी तसच गुरे यांचाही वावर कायम असतो.


   
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

 तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...

Friday, May 28, 2021

7 types of relaxation

 7 प्रकारच्या विश्रांती..


दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ?
झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार असतात.  

१) शारीरिक विश्रांती

आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. 

योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.


२) मानसिक विश्रांती


दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसराभोळे होयला सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं तेच सुरू असतं. रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही. 

८ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते. हे आपल्या सोबत कशामुळे होत असेल याचा विचार कधी आपण केला आहे का ?

मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग आपण अवलंबू शकत तर नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा. आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा . आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे.  रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होत अश्या विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू ? यावर आपण अभ्यास करू शकतो. 

३) सेन्सरी विश्रांती



विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे , सेन्सरी विश्रांती दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा समोर बसून काम करणे,  लाईट्स , आजूबाजूला होणारा आवाज , खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे , यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत पण ऑनलाइन मिटींग करून ही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा. 

४) क्रिएटीव्ह विश्रांती

क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अश्या प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी , छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटीव्ह विश्रांतीच . अश्या गोष्टी जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते , अश्या गोष्टी , छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो. आपण आपले आठवड्यातील 40 तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.

५) भावनिक विश्रांती


सतत इतरांना काय वाटेल यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते. 

अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्राना भेटा/फोन करा. तेव्हाच आपल्याला "भावनिक विश्रांती" मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे.  

६) सामाजिक विश्रांती 

भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहुयात , 

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी २ मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो अशा लोकांसोबत संपर्कात राहा. 

७) अध्यात्मिक विश्रांती


या विश्रांती नंतर अध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया , प्रेम , आपुलकी , स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं ही अध्यात्मिक विश्रांती.  आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल अशा कामांत स्वतःला गुंतवणे, रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान कराणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत  जोडले जा. 
मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता स्वतः साठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...



Monday, May 24, 2021

INS Vikramaditya 360 view

विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हा व्हिडीओ जरूर पहावा...

Students, parents, teachers must watch this video ...

आयएनएस विक्रमादित्य 360 degree मध्ये पाहण्याची संधी 

मोबाईल कुठल्याही दिशेला फिरवून नक्की पहा. आपण INS विक्रमादित्य वरच असल्या सारखे वाटते.
न चुकता जरूर पहा एक वेगळा अनुभव


विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा 

https://youtu.be/yy02rQMmKLU


तुमचा मोबाईल तुम्ही ज्या दिशेला फिरवाल तुम्हला नेव्हीच्या विक्रमादित्य या प्रचंड मोठ्या जहाजावर असल्याचा भास होईल व तिथूनच आपण समुद्र दर्शन करतो का काय असे भासेल


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

 तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...


Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...