Translate

Saturday, August 21, 2021

Masale pickles Training | Udyamita Vikas Training Center, Satara





अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्र  बारामहिने मागणी असणारे  कमी भांडवलामध्ये व्यवसाय  सुरू करता येणारे  आणि नफ्याचे प्रमाण जास्त असणारे क्षेत्र आहे. यातीलच भरपूर मागणी असणाऱ्या मसाले व लोणची निर्मिती  उद्योगाचे  प्रशिक्षण मागिल २० वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. 

हे प्रशिक्षण 21/6/23 ते 24/6/23 या कालावधीमध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. 

या मध्ये 

मसाले - 

पावभाजी मसाला,सांबर मसाले,कच्छीदाबेली मसाला, मिसळ मसाला ,पनीर मसला,गरम मसाला,छोले मसाला ,चाट मसाला,बिर्याणी मसाला,दुध मसाला , चहा मसाला ,मटण मसाला, चिकन मसाला ,मॅगी मसाला, गोडा मसाला, चकली मसाला, चिवडा मसाला , मेतकूट, आले लसून पेस्ट,  

चटण्या - 

लसून चटणी , शेंगादाणे चटणी ,जवस चटणी , कारळे चटणी , तीळ चटणी , कोल्हापूरी ठेचा, व-हाडी ठेचा,शेजवान चटणी ई. 

लिंबू लोणचे, गोड लिंबू लोणचे, उपवास लिंबू लोणचे, मिरची लोणचे, व्हेजीटेबल लोणचे, मुळ लोणचे, आंबा लोणचे इ.

संपूर्ण प्रात्यक्षिकासह व्यवसाईक दृष्टीने शिकवण्यात येणार आहेत. 

त्याच बरोबर -

मसाल्यांचा व्यवसाय कसा सुरू करावा, 

मशिनरी कोणत्या घ्याव्यात , 

पॅकिंग कसे असावे, 

कोणाकडून घ्यावे, 

लायसनिंग प्रोसिजर, 

भांडवल उभारणे,

मार्केटिंग करणे ई. मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

प्रवेश मर्यादित आहेत. 

प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड काॅपी व एक फोटो आवश्यक आहे. 


अधिक माहीती साठी 

महेश कुलकर्णी , 

राजधानी टाॅवर, 3रा मजला,राजवाडा बसस्टाॅप जवळ सातारा 

9822397384 येथे संपर्क साधावा.

Saturday, August 14, 2021

Bridge Course guidance

 🎯 *सेतू चाचणी -3 ( प्रश्नउत्तरे ) डाउनलोड करा !*


👉 *सर्व इयत्ता व सर्व विषय (उत्तरे )*


*2️⃣इयत्ता दुसरी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*3️⃣इयत्ता तिसरी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*4️⃣इयत्ता चौथी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*5️⃣इयत्ता पाचवी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*6️⃣इयत्ता सहावी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*7️⃣इयत्ता सातवी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*8️⃣इयत्ता आठवी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*9️⃣इयत्ता नववी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

*1️⃣0️⃣इयत्ता दहावी* उत्तरे

http://bit.ly/3shRC1F

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतरांना पाठवा उपयोग होईल 🙏🏻



xybddsdsdsdsdsdsdsdsdsdds

Thursday, July 29, 2021

Social media and news channel

 



Socail media वरील अनेक बातम्या मधून लसी बाबत अनेक उलट सुलट बातम्या देण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते. खरं तर या प्रकार च्या बातम्या मुळे सर्व सामान्य जनतेला दिलासा कमी आणि गोंधळ जास्त मिळत आहे. 


खरं काय हे कोणालाच माहिती नसावं हे यावरून दिसत आहे. खरतर  लसीकरण म्हणजे संजवीनी नाही की अमृतही नाही की जी घेतलं की आपणास काहीच होणार नाही. मन मर्जीने आपण वागू शकतो असेही नाही तर लसीकरण ही मृत्यू प्रमाण रोखणे, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच कोरोना लागण झाल्यास त्याचे गम्भीर परिणाम पासून सुटका मिळणार आहे, घरच्या घरी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन त्यातून लवकर बरे होता येणार आहे 


लस घेतल्यावरही त्रिसूत्री च पालन करावंच लागणार आहे.  



तेव्हा या बातम्या वाल्यानी लसी बाबत योग्य जन जागृती करून जास्तीत जास्त लसी करण मोहिमेत जनता कशी सहकार्य करेल याकडे लक्ष द्यावं. 

अजून विशेष बाब म्हणजे याबाबत केंद्र सरकार किंवा आरोग्य यंत्रणा कधी काहीच माहिती जाहीर करताना दिसत नाही, मग यांनाच ही माहिती मिळते तरी कोठून, बरं हे टीव्ही चॅनेल वर या बाबत चे लाईव्ह टेलिकास्ट ही करताना दिसून येत नाहीत. 


Social media वर धडाधड बातम्या प्रकशित करण्यात यांचा सपाटा असतो 

Social media वर हजारो लोक ऍक्टिव्ह असतात त्यांना अशा प्रकारच्या बातम्या निश्चितच त्रास दायक ठरत असणार तेव्हा... 

सर्वच लसी या अतिशय उपयुक्त आहेत या मध्ये वर्गीकरण करून बातम्यावाल्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये हीच अपेक्षा... 

Wednesday, July 21, 2021

Diploma in Naturopathy and Yogic Science

 डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स (DNYS)  

प्रवेश सुरू  

 पंचमहाभुतांनी निसर्ग तयार झाला आहे आणि निसर्गातील प्रत्येक सजीवही पंचभुतांनीच तयार झाला आहे. मानवी शरीरही पंचभुतांनीच तयार झाले आहे. एक प्रकारे आपण निसर्गाचेच आपत्य असल्यामुळे निसर्ग आपल्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत आसतो. पण आपण बुद्धीजीवी निसर्ग नियमांना पायदळी तुडवून आजारांना निमंत्रण देत आहोत. याचा परिणाम आपली आरोग्य शक्तीच क्षीण होत चालली आहे. 





त्या मुळेच आपल्या आजूबाजूला अनेक लोक कॅन्सर, पॅरेलिसीस, डायबेटीस, थायराॅईड, हृदयरोग, डेंग्यू,.... करोना.... आजारांनी ग्रस्त झालेले दिसतात. ऑलिओपॅथी औषधे सहज सुलभ आणि परिणामकारक असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवन सुरू आहे कि शरिराची प्रतिजैविके बनवविण्याची (प्रतिकार शक्ती) क्षमताच कमी झाली आहे.  निसर्गतःच सुदृढ शरीर आपल्याल मिळवायचे असेल, आजार होऊच नये आणि झालाच तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याकडे हवी असे वाटत असेल तर अनन्यसाधारण अशा निसर्ग उपचार पद्धतीला समजून घेतले पाहिजे. 
 आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ,सुद्रुढ, सशक्त ठेवण्यासाठी निसर्गउपचार शिकून घेतलेच पाहीजेत आणि निसर्ग उपचार केंद्रे उभी राहीलीच पाहीजेत. 

निसर्ग उपचार केंद्र सुरू करता येण्यासाठी भारत सरकार नोंदणीकृत उद्यमिता प्रशिक्षण केंद्रा मार्फत डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स प्रशिक्षणाचे प्रवेश सुरू होत आहेत. 

हे प्रशिक्षण  23/6/2024 पासून प्रत्येक रविवारी दु. 11.00 ते 1.30  असे एक वर्ष कालावधीचे असेल. 

यामध्ये शरीरशास्त्र, शरिराला होणारे आजार व त्याची शास्त्रोक्त कारणे, शुद्ध निसर्गोपचार नियम, निसर्गोपचाराच्या विविध पद्धती यांमध्ये नाभीपरिक्षण,स्नेहन, स्वेदन( शास्त्रोक्त मसाज), शरिरशुद्धी(विषद्रंव्ये शरीराबाहेर काढणे ), विविध चिकित्सा पध्दती यामध्ये जलचिकित्सा, मडथेरपी, कुंजीर, हीपबाथ, कॅल्शिअम बाथ, एनिमा, एक्युप्रेशर शास्त्रोक्त पद्धतीने प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहेत. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

 

                                          अधिक माहीती साठी व प्रवेशप्रक्रियेसाठी 

महेश कुलकर्णी , राजधानी टाॅवर्स, राजवाडा बसस्टाॅपजवळ सातारा 

येथे संपर्क साधावा. 9822397384.

Tuesday, July 13, 2021

14 July 2021 availability of vaccine | Satara city

 14 जुलै साठी उपलब्ध असलेले मोफत लस प्रमाण 

+18 साठी फक्त 2 रा डोस कोवॅक्सिन 

सिव्हिल हॉस्पिटल 171

गोडोली 62

कस्तुरबा 57


 (13/7/2021 वेळ 10.57वाजता चा स्क्रीनशॉट )

Wednesday, June 9, 2021

Satara's delicious identity Dadaj Biryani साताऱ्याची लज्जतदार ओळख दादाज् बिर्याणी

 साताऱ्याची लज्जतदार ओळख "दादाज् बिर्याणी"



साताऱ्याच्या खाद्यसंस्कृतीत मागील काही वर्षांत अनेक नव्या ब्रँडची भर पडली आहे. सातारची दादाज् बिर्याणी हा ब्रँड त्यापैकी एक. एखाद्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर कष्ट घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी असेल तर छोट्या व्यवसायाचं अल्पावधीत मोठ्या व्यवसायात रूपांतर करता येतं. याच उत्तम उदाहरण म्हणजे दादाज् बिर्याणी हाऊस. श्रीकांत व प्रशांत या फडतरे बंधुंनी १४ वर्षांपूर्वी हॉटेलिंगच्या व्यवसायात उतरून तो यशस्वी करुन दाखविला आहे. साधारण १६ वर्षांपूर्वी आपल्या चुलत भावांसोबत भू विकास बँक चौकात (सातारा पेट्रोल पंपाशेजारी) चहा व वडापावचा गाडा सुरू केला. व्यवसाय छोटा असला तरी स्वप्न मात्र मोठी होती. 

सगळेच  करतात त्यापेक्षा वेगळ्या व्यवसायाची गणितं मांडली गेली. दहा-पंधरा वर्षांपूर्वी स्पेशल बिर्याणी खिलवणारी हॉटेलं साताऱ्यात नव्हतीच असं म्हटलं तरी चालेल. मेन्यू पक्का झाल्यानंतर १३ ऑगस्ट २००७ रोजी शाहू स्टेडियममध्ये (सातारा पेट्रोलपंपासमोर) एका गाळ्यात दादाज् बिर्याणी हाऊसचा शुभारंभ झाला. अवघ्या दोन कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू झालेलं हे बिर्याणी हाऊस आज ५० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देत आहे.  



आज इथे व्हेज व नॉनव्हेज अशा मिळून सव्वाशेपेक्षा जास्त डिश बनवल्या जातात. दादाज् म्हटलं की इथली लज्जतदार बिर्याणी आणि डिलिशियस चिकन तंदूर, एवढी ओळखही पूरेशी ठरते. केवळ अन्न पदार्थांचा दर्जा न साभाळल्याने म्हणा किंवा जास्तीचा नफा मिळविण्याच्या नादात केलेल्या तडजोडींमुळे कोट्यवधींची गुतंवणूक करुन सुरू केलेली रेस्टॉरंट अल्पायुषी ठरल्याची उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. 


दादाज् बिर्याणीमध्ये पदार्थांची चव जपण्याच्या बाबतीत कसलीच तडजोड केली जात नाही. लांब सडक ब्रँडेड तांदळापासून बनवलेली बिर्याणी असो, तंदूर असो अथवा इतर कोणताही पदार्थ... तो बनविण्यासाठी वापरला जाणारा सर्व मसाला घरीच बनविला जातो. बिर्याणीला दम देण्यासाठी गॅस न वापरता फक्त कोळशाचा वापर कटाक्षाने केला जात असल्याने चिकन, मटणाचा अर्क पूरेपूर उतरल्याचा अनुभव घास तोंडात गेल्या गेल्या येतो. घरी बनविलेल्या तुप व दह्यामुळे बिर्याणी आणि तंदूरची ऑथेंटिक चव तुमच्या जिभेवर दरवळत राहते. इथे घरगुती मसाल्यांचा सिक्रेट फॉर्म्युला असल्याने तुमचे पोट बिघडणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. ग्राहक हाच सर्वोपरी मानून श्रीकांत व प्रशांत हे बंधू इथे मालक व कामगार या दोन्ही भूमिकांमध्ये वावरताना दिसतात. रोज सकाळी ६ वाजता भाजी व मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदीपासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो.


सुरुवातीच्या काळात जास्त कामगार ठेवणे परवडत नसल्याने  आई-वडिलांसह दोघा भावांनी कसलीही लाज न बाळगता भांडी धुण्यापासून साफसफाई, प्लेटा उचलण्यासह आचाऱ्याच्या हाताखाली कामे केली. शिकून घेतले. व्यवसाय वाढवायचा, काहीतरी करून दाखवायचे एवढीच जिद्द होती. त्याचा व्यवसाय वाढीसाठीच फायदा झाला. अनेक अडीअडचणी येऊनही चव व दर्जा जपण्यात कसलीच तडजोड केली नाही. परिणामी चव लोकांना आवडत गेली. लोकांनी केलेली स्तुती हेच आमचं मार्केटिंग होतं. त्यामुळे जाहिरातीवर वेगळा खर्च करण्याची गरज पडली नाही. पहिली तीन वर्ष खर्च भागत होता. कर्जाचा हप्ता कधीतरी थकायचा मात्र, या दोघा बंधुंनी हार मानली नाही. ग्राहक व त्याच्या अपेक्षांची पुर्तता करीत गेले. हेच यशाचे गमक ठरले. 

त्यामुळे सुरुवातीला फक्त बिर्याणी व तंदूर हे दोनच पदार्थ होते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेल्यानंतर थाळी व डिश सिस्टिम आली. व्हेज पदार्थ आले. तीन वर्ष संघर्षात गेल्यानंतर व्यवसाय वाढू लागला तर जागा कमी पडू लागली. त्याचवेळी श्रीकांत व प्रशांतचे मामा मदतीला धावून आले. त्यांनी त्यांचे मुंबईतील घर गहाण ठेवून पैसे दिले व आणखी एक गाळा विकत घेतला. जागा वाढल्याने ग्राहकही वाढले. मग मागे वळून बघण्याची गरजच पडली नाही. त्याने त्या एका गाळ्याचे आठ गाळे झाले. त्यासोबतच दादाज् बिर्याणी हाऊसचा पसाराही वाढत गेला. दोन-तीन तासात हजार माणसांचे जेवण बनविण्याची क्षमता निर्माण झाली आहे. पहिल्या दिवसापासून जपलेली चव व दर्जा हे दादाजच्या आजच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच साताऱ्याचा हा बिर्याणी ब्रँड राज्यभर पोहोचण्यास सुरूवात झाली आहे.


आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Saturday, May 29, 2021

Leopard sightings in Satara



सातारा मध्ये सध्या कडक लॉकडाऊनमूळे सर्वत्र वाहनांची वर्दळ कमीच दिसून येते. तस पाहिल तर किल्ले अजिंक्यतारावर बिबट्याचे अस्तित्व असल्याचे बोलले जाते. कमालीची शांतता असल्यामूळे कचरा डेपोच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने आपले अगदी आरामशीर पहूडलेला बिबट्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल होतो आहे.

किल्ले अजिंक्यताराच्या उतारावर शाहूनगर परिसरातील घनदाट झाडीमध्ये बिबट्या दर्शन होणे ही नित्याची बाब आहे. तसच किल्ल्यावरील अनेक ठिकाणीही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे दिसते.

मात्र कचरा डेपोच्या संरक्षक भितीवर दिवसा बिबट्याचं दर्शन होणे ही तस पाहिल तर गंभीर बाब मानली पाहिजे, खरतर या परिसरात कायम वाहनांची वर्दळ सुरु असते. बिबट्या एवढ्या खाली येत असेल तर त्याला वेळीच जेरबंद करणे आवश्यक बनते.

या परिसरात रहिवासी वस्ती जरी कमी असली तरी वर्दळ मात्र कायम असते. येणा-या कच-याचा गाड्या, दु-चाकी तसच गुरे यांचाही वावर कायम असतो.


   
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

 तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...

Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...