Translate

Friday, April 23, 2021

Living in the world of social media

सोशल मिडीयाने मनातलं बोला जग खूल होईल अशी काळजाला हात घालणारी टॅग लाईन केली आणि सर्वांनाच सोशल मिडीयाची दुनिया आवडू लागली. यामध्ये प्रामख्यानं अनेक महिलांना अनेक संकटाना सामोरं जाव लागतं.

याबाबतचा हा लेख आपणांस नक्कीच विचार करायला लावणारा...



सोशल मिडीयाच्या जगात जगताना 

आपकी आँखो में कूछ मेहके हूए से ख्वाब है.......

सकाळी अशीच छान गाणी सुरु होती ...रंगोली मध्ये
वाह क्या बात है!

बाजारे का सूट्टआ.....

हे काय आहे??????????

संपली रंगोली
काही नवीनच कार्यक्रम सुरु झाला......

खरं तर आयुष्य असच झालंय जे आवडतं ते फार नाही ऐकू येत, आपण तीच गोष्ट शोधत राहतो...... सापडली तरी आधी ऐकताना आलेला मनाचा ताजेपणा किंवा तो आनंदी क्षण परत तसाच येत नाही.

एखाद्या माणसाशी आपली Virtual ओळख होते ... आता इथे बाई माणूस पण म्हणू शकता....... आणि त्यानंतर चांगले वाईट बरेचं अनुभव येतात.....त्यातून आपण काय शिकतो आणि कसे way out शोधतो ... याच्या काही स्टोऱ्या आहेत या..  

आता खरी गोष्ट

सोशल मिडीया नावाच्या मायाजालात मी पदार्पण केलं आणि हे काय आहे??? हे समजायच्या आतच एक फ्रेंड रिक्वेस्ट आली
आनंद पोटात माईना वाली फिलिंग....!
लगेच accept केली request

आणि मग जे काय घडलं ते सांगणेबल आहे म्हणजेच ते सांगणं म्हणजे आपल्याच अक्कल हुषारीचे पाढे वाचण्या सारखं आहे......

सोशल मिडीयावर वर account open करणं एक थ्रिल होतं! त्या स्टेज मध्ये माझं account सुरू केलं..
इकडून सांगणं झालंच सांभाळ ग!...

पण त्यात काय विशेष अशा ओव्हर च confidence मध्ये सगळे सेटिंग्ज करून सोशल मिडीयाच्या छत्रा खाली वावरायला सुरूवात केली.


सुरवातीला timeline पाहणे....like करणे..... आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये जाऊन प्रत्येकाची प्रोफाइल चेक करणे हे उद्योग चालायचे... आणि तेव्हा नेट चा स्पीड आणि त्याचे रेट एक व्यस्त गणित होत.

कसकाय इतके फ्रेंड्स असतात लोकांना...आपले मोजून ४० भरच आहेत हे दुःख..... 
तर मुद्दा असा की फ्रेंड request आली
.... accepted.....confirm
आणि लगेच सवयी प्रमाणे प्रोफाइल चेक वगैरे.... त्यावेळी messenger फार वापरला जात नव्हता.... आलाच मेसेज तर सोशल मिडीया open केल्यावर दिसायचा किंवा मोबाईल मध्ये message यायचा.....
असाच मेसेज आला
Hiiiiiiiiii
हे असं का लिहितात काय माहित,
पण आपल्याशी बोलायला कोणी तरी मेसेज केलाय याचा कोण आनंद!
Hello
How are you?
कुठे राहतेस??
डायरेक्ट!!!!!!??????
असं लगेच कसं काय विचारलं??? मी विचारात....

खरं म्हणजे लग्ना नंतर च्या बदलेल्या नावाचं social media होत... त्यामूळे माझं वय आणि आलेल्या रिक्वेस्ट च वय यातला फरक मला दिसत होता....


तो सुरूच
कशी आहेस????
काय करत आहेस????
अरे हो हो.......
संपतच नव्हतं
आणि आलाच expected message
एक फोटो दे ना...
सांगावं वाटत होतं अरे बाळा काय करतोयस ....
आता खरं तर या रिक्वेस्ट ला मी ओळखत होते....

पण लगेच आपण हुशार आहे हे दाखवाव आणि जगाच्या सुधारणेचा ठेका घेतल्याच्या आवेशात ठरवलं या request la धडा शिकवायचा.....

आणि एकदम खूपच गप्पा झाल्या आणि पुढच्या २ तासात भेटायचं ठरलं...
Address दिला... ........अजुन एक मूर्ख पणा ...

अगं मी याच बिल्डिंग समोर राहतो...!
आधी कधी दिसली नाहीस?...
माझ्या नजरेतून कशी सुटलीस???

अरे तू area cha CCTV aahes का?????

आता खरं तर असं आपण बोलूच शकत नाही पण या request ला Jr KG पासून पाहिलं होतं आणि हे सगळं माझ्या समोर च्या घरा जवळ बसून लिहिणं चाललं होत 

आणि आला हा घरी ठरल्या वेळी
बेल वाजवली....
मी दरवाजा उघडला....
ताई कधी आलीस?.... कशी आहेस...? 
पण नजर शोधत होती बोलावणारीला....
शेवटी मीच म्हणाले फेसबूक फ्रेंड साठी आलाय ना?
इथेच आहे ती
तुझ्या समोर..... मीच **********
प्रचंड मोठा आ वासलेला
Confusion
मग सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या

आता हे सगळं पूर्ण ओळखीच्या माणसाबद्दल झालं म्हणून इतकी रिस्क घेतली...
इकडून सांगणं झालंच
असले उद्योग करू नकोस...
आपण फार हुशार असल्याच आव आणत जाऊ नकोस.

खरं तर गंमत या संकल्पनेतून पाहिलं तर छान वाटेल पण  virtual जगात हे खुप धोकादायक आहे याचा प्रत्यय प्रत्येक स्त्री ला नक्कीच येतो कोणी सांगतो कोणी सांगत नाही

आता परत आपकी आँखो मे ऐकव की
बाजरे का सूट्टआ.....
#माझं Virtual जीवन

शब्दांकन ईशिता जोशी (joshiishita@gmail.com)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा


No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...