कोरोनाच्या या काळात मास्क घालून घराबाहेर पडणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
मास्क कसा वापरवा किती वेळा वापरावा याच्या गाईड लाईन्स ठरलेल्या आहेत. मास्कचा वापर ही आता कॉमन बाब झाली आहे. त्यामूळे तो तोंडावर असला म्हणजे झाल अशी लोकभावना दिसून येते.
सिंगल कापड असलेला, दुमेरी - तिमेरी घडीचा मास्क किंवा एखादं फडकं तोंडाला गुंडाळणे म्हणजे मास्क नाही.
बरेचजण मास्क म्हणून हातरुमालचाही वापर करताना दिसतात.
आपण मास्क घालून बाहेर जातो कुठेही फिरतो. घरी आल्या नंतर तो कुठे ठेवतो, कसा ठेवतो याचा विचार करतो का आपण याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
बाहेर वावरत असताना, बोलताना मास्क तोंडावर नीट आहे की नाही याची खात्री करत रहा.
उत्तम प्रकारच्या मास्कचा वापर करा... मास्क एक ढाल आहे... शक्यतो तो वॉशेबल असावा.
घरी आल्यानंतर मास्क लगेचच सॅनिटाईज करुन स्वच्छ धूणे फार महत्वाचे ठरते. आपण बाहेर जातो. अनेक ठिकाणची धूळ, जंतू मास्कच्या बाहेरील भागावर असण्याची दाट शक्यता असते.
त्यामूळे घरी आल्यानंतर आपला मास्क स्वयंपाक घरात, खूंटीला, किंवा घराच्या आतील भागात बिंधास्तपणे न ठेवता तो त्वरीत सॅनेटाईज तसेच धुवून टाकणे हे प्रथम व्हायलाच हवं. लक्षात असे नाही केल तर मास्कवरील धूळ जंतू घरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हात रुमाल मास्क म्हणून वापरत असाल तर तोही घरात आल्या आल्या स्वच्छ धूतला पाहिजे. हात रुमालच्या २ ४ जोड्या मास्क साठी राखीव ठेवा. एकच रुमाल सारखा वापरुच नका. कोणत्या बाजूने रुमाल तोंडाला बांधला आहे हे पुढील वेळेस लक्षात न घेता उलटा सुलटा रुमाल मास्क म्हणून वापरला गेला तर जंतू, धूळ यांना आपण निमंत्रण देत आहात.
महिलांनी ओढणीचा वापर मास्क म्हणून कधीच करु नये. कारण एक तर ओढणी ही कपड्यासोबत घरात आणली जाते. ती कपाटात किंवा घराच्या आतील बाजूस तशीच ठेवली गेली तर बाहेरी धूळ, जंतू सरळ घरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मास्क ची वापर मर्यादा संपलेनंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. तो सरळ जाळून टाकला तर उत्तमच. मात्र कचरा गाड्यात चूकुनही टाकू नका. तसेच रस्त्यावरही निष्काळजीपणे टाकून देवू नका.
एकच मास्क महिनों महिने वापरु नका...
जीवन अनमोल आहे... तुमचा मास्क... तुमची जबाबदारी...
धन्यवाद...
No comments:
Post a Comment