माझ्या नावाने फेसबूकचे कोणीतरी डुप्लिकेट अकाऊंट सुरु केले आहे.
त्या अकाऊंट वरुन पैसे मागितले तर देवू नका.
माझा आय डी चोरला आहे.
अशा विविध प्रकारच्या तक्रारी सध्या सोशल मिडीयावर झळकू लागल्या आहेत.
चला जाणून घेवू या याबाबत...
खर तर सोशल मिडीयावरील कोणतेही अकाऊंट सहजासहजी हॅक करता येत नाही. मग ते का होत. तर यासाठी सर्वस्वी जबाबदार आपणच असतो.
हो आपणच जबाबदार असतो.
कसे ...
आपल्याला अनेक वेळ फेक मेसेज येतात. तुमचं भविष्य जाणून घ्या मागच्या जन्मी तुम्ही कोण होता. पुढची ७५ वर्ष तुमची अशी जाणार आहेत. जन्मवेळ पाहा. ही योजना तुमच्याच साठी. तुमचे वय जाणून घ्या. तुमच्या जोडीदारा बाबत माहिती घ्या. तुम्ही कोणत्या हिरो, हिरोईन सारखे दिसता.
अशा एक अनेक प्रकारच्या पोस्टस् सोशल मिडीयावर सतत आपल्याला दिसतात. खरतर या पोस्टस् पासूनच आपल्या अकाऊंटला धोका निमार्ण होत असतो. आपण क्षणाचाही विचार न करता संबंधीत लिंक वर सोशल मिडीयाच्या माध्यमातून क्लिक करतो आणि तिथेच आपण चूकतो. अशा प्रकारच्या वेबसाईट क्लिक करताच आपल्या डिजीटल डिव्हाईस मध्ये घूसून कॅचे फाईल्स सेंड करुन आपली माहिती काढून घेत असतात. हे काम एवढ्या चपळतेने चालते की आपल्याला काहीही कळत नाही.
आपल्याला अनेक ठिकाणाहून फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात काही तर मुद्दाम फेक असतात आपण फ्रेंड रिक्केस्ट आली की कुतूहल म्हणून नाव, प्रोफाईल फोटो, पोस्ट तसच काही इतर माहिती मिळते का हे त्या संबंधीत फ्रेंड रिक्केस्टच्या वॉल वर जावून ३ ते ४ मिनीट पाहतो याही ठिकाणी आपली माहिती, अकाऊंट डिटेल्स लिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तिसरं म्हणजे आपल्याला येणारे मेसेज. कोणताही मेसेज वरील लिंक ओपन करुन पाहण्याआधी ती लिंक सुरक्षित आहे की नाही हेही पाहण्याचे कष्ट सुशिक्षीत लोकं घेत नाहीत याचं आश्चर्य आहे. अशा फेक लिंकवर जावून तेथील पेजेवर वेळ घालवणे म्हणजे स्वत:ला संकंटात लोटून घेण्यासारख आहे.
काय कराल...
सोशल मिडीयावर येणा-या लिंक उघडण्यापूर्वी त्या सुरक्षित HTTPS आहेत का याची खात्री करा मगच उघडा.
येणा-या फ्रेंड रिक्वेस्ट मधील प्रोफाईल फोटो नसेल किंवा तो व्यक्तीचा नसून फूलाचा, ग्राफीक्सचा अथवा एखाद्या अन्य प्रकारच्या बाबींचा असेल तर सरळ ती रिक्केस्ट डिलीट करा. त्याचे डिटेल्स शोधत बसू नका.
आपले प्रोफाईल लॉक करा. जेणे करुन अनोळखी व्यक्तींना आपल्या पोस्टस, मोबाईल नंबर, पत्ता दिसणार नाही.
जरी तुम्ही तुमच्या डिजीटल वरुन सोशल मिडीयाला लॉग-इन असाल तरी देखील पासवर्ड बदलत राहा. सोशल मिडीया अकाऊंटला तुमचा इ-मेल आय डी जोडून घ्या.तुम्ही वापरत असलेले डिजीटल डिव्हाईस वरील सर्व कॅचे, हिस्टरी याबाबी वेळोवेळी क्लिन करत रहा.
सर्वात महत्वाचं सर्व सोशल मिडीया अकाऊंटस् ला टु-वे व्हेरिफीकेशन ही फॅसीलीटी त्वरीत करुन घ्या.
तुमचं सोशल मिडीया अकाऊंट तुमची जबाबदारी... तो मी नव्हेच म्हणून चालणार नाही.
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...
खूप छान
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख
गरजेचं लिखाण
धन्यवाद जी🌹✍️