Translate

Thursday, September 23, 2021

Milk Process Industry Training

 दुध प्रकिया उद्योग प्रशिक्षण 




दुध हे प्रथम अन्न असल्यामुळे, शिवाय दुधाचे पदार्थ अत्यंत पौष्टिक असल्यामुळे रोजच्या आहारामध्ये दुधाच्या पदार्थांना भरपूर मागणी असते.

सणासुदीला पक्वांन्न म्हणूनही दुधाच्या पदार्थांनाच पहिली पसंती दिली जाते. याच कारणांमुळे दुधाच्या पदार्थांच्या व्यवसाला भरपूर मागणी असते. भरपूर फायदा असणाऱ्या दुधाच्या पदार्थांचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी.

२२ वर्षां पासून प्रशिक्षण देणाऱ्या 
भारत सरकार नोंदणीकृत 

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा येथे 

दुधपदार्थ व्यवसाय प्रशिक्षण

 सुरू होणार आहे.

हे प्रशिक्षण दि. 18/12/2023 ते 22/12/2023 या कालावधीत 5 दिवस 11 ते 4 यावेळेत असेल.

यामध्ये डेअरी उद्योगांची ओळख,

दुग्धव्यवसायातील उद्योग संधी, 

दुधाचे विविध पदार्थ जसे दही,ताक,मठ्ठा, मलई लस्सी,मँगो लस्सी, गुलकंद लस्सी,चक्का,श्रीखंड,आम्रखंड,फ्रूटखंड,बटरस्कॉच श्रीखंड,

मोजरीला चीझ,बदामशेक,फ्रुटसॅलेड,मसाला दुध,बासुंदी,रबडी,सिताफळ रबडी,अंजीर रबडी,खावा,गुलाबजाम,

रसगुल्ला,रसमलाई,अंगुर रबडी,मावा बर्फी,मॅंगो बर्फी,पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी,टू लेअर बर्फी,काजुकथली,मलई बर्फी,पणीर,कुंदा,पेढे,मलई पेढे,कुल्फी, बटरस्कॉच आईस्क्रिम, स्ट्रॉबेरी आईस्क्रिम, मॅंगो आईस्क्रिम,ड्रायफ्रुट आईस्क्रिम ई. पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दुधाच्या पदार्थांचा व्यवसाय कसा सुरू करावा, मशिनरी सेटप कसा करावा, सुरूवाती पासुनच कमितकमी 40000 ते 50000 रूपये कसे मिळवता येतात,

मार्केटिंग कसे करावे, विविध कर्ज योजना,लायसनिंग प्रोसिजर यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Join दुधपदार्थ व्यवसाय प्रशिक्षण Group


 प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व पुढे व्यवसाय व्यवस्थित सुरू होईपर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रवेश मर्यादित आहेत,

 प्रवेश घेण्यासाठी व आधिक माहिती साठी

 महेश कुलकर्णी ,उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , 

राजधानी टॉवर,राजवाडा बस स्टॉपजवळ, सातारा 

9822397384 येथे संपर्क साधावा.



Wednesday, September 8, 2021

 तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ? 


महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. 

Our Calendar

अमरावती 

एक महत्त्वाचे,मध्यवर्ती,औद्यो गिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र अशी ओळख असलेला हा जिल्हा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे झाले.


औरंगाबाद 

हा जिल्हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे.आजच्या औरंगा बादचे नाव पूर्वी खडकी होते.व अ.नगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.


बीड 

हा जिल्हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव झाले


भंडारा 

हा जिल्हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द असल्यामुळे भाण शब्दावरुन भाणारा असे नाव पडल्यामुळे त्यानंतर भंडारा असे ठेवण्यात आले.


बुलडाणा 

हा जिल्हा अजिंठ्याच्या डोंगर रांगामध्ये वसलेले. हे शहर प्राचीन काळात भिल्लठाणा म्हणून ज्ञात होते.भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे स्थान. त्यानंतर बुलढाणा हे नाव पडले आहे.


चंद्रपूर 

 चंद्रपूरला आधी चांदा म्हणून ओळख होती. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. या जिल्ह्यात कोळसा खाणी आणि चुन्याच्या खाणीही आहेत.


 धुळे 

महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्‍चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.


 गोंदिया 

महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.


 हिंगोली 

महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.


 जळगाव 

महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.


 जालना 

महाराष्ट्रातील जालना जिल्हा हा कुंडलिक नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. सुरवातीला धनवान मुहमद्दन व्यापाराच्या इच्छेप्रमाणे ज्याला या ठिकाणी खूप फायदा झाला. त्यांचा विणकामाचा (जुलाह) हा व्यवसाय होता. त्यामुळे जुलाह वरुन जालना या नावाने ओळख सुरु झाली.


 कोल्हापूर 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठमधील एक कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक शतकापर्यंत शहराचे जुने व सर्वसंमत असे नाव कोल्लापूर होते. पूर्वी कोला नावाचा एका असूराचा महालक्ष्मीने वध केला, त्यानंतर कोल्हापूर या नावाने ओळख सुरुवात झाली असे म्हटले जाते.


 लातूर 

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव लत्तपूर असे होते. त्यानंतर त्या नावात बदल करुन लातूर या नावाने ओळख निर्माण झाली.

 मुंबई 

महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण मुंबई शहराला ओळखतो. तसेच हा जिल्हा सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच या शहराला भारताचे हॉलिवूड असेही म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई हे नाव देण्यात आले आहे.


 नागपूर 

महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहत असल्याने पूर्वी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक शहरांच्या नावापुढे पूर हे लावले जाते. त्यापध्दतीने नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची नागपूर अशी ओळख निर्माण झाली.


 नंदुरबार 

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून नव्याने निर्माण झाला आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खान्देश असे म्हटले जाते.


 नाशिक 

महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.


 उस्मानाबाद 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.


 परभणी 

महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.


 पुणे 

महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.


 रायगड 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.


 सांगली 

महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.


 सातारा 

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.


 सिंधुदुर्ग 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.


 सोलापूर 

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्‍वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.


 ठाणे 

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.


 वर्धा 

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.


 वाशिम 

महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.


 यवतमाळ 

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले आहे.


 अकोला 

महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.

Welcome..! by Digital Shende

Thursday, September 2, 2021

Ayurvedic medicine training | Udyamita Vikas Training Center

Ayurvedic Medicine Training


 

यांत्रिकी करणामुळे माणसाचे कष्ट फारच कमी झाले आहेत . 

याच वेळी  उंचावलेले राहणीमान ,वाढती स्पर्धा , रोजचे ताणतणाव , व्यायामाचा अभाव यांमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.

आरोग्य राखण्यासाठी विविध चिकित्सा  पध्दतींचा उपयोग केला  जातो. यांमध्ये  आँलिओपँथी,हाँमिओपँथी,आयुर्वेद इ.चा समावेश होतो .

केवळ नैसर्गिक  वनस्पती ,खनिजे ,यांच्यावर प्रक्रिया करुन आयुर्वेद चिकित्सेमध्ये औषध  निर्मिती व उपचार केले जात असल्यामुळे या पध्दतीचा शरिरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही .

यांमुळेच अतिप्राचीन असणारी आयुर्वेदीक चिकित्सा पध्दतीला व आयुर्वेदीक औषधांना जगभरात चांगली मागणी निर्माण झाली आहे.

आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेञातील उद्योग संधी समजण्यासाठी 

भारत सरकार नोंदणीकृत 

उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत 

आयुर्वेदीक औषध निर्मित प्रशिक्षणाचे 

आयोजन 28/09/2021 पासून 

प्रत्येक मंगळवारी दुपारि 2ः30 वाजता चार महिने कालावधीचे सातारा येथे सुरु होत आहे .

आयुर्वेदीक औषधांचे उत्पादन व्यवसाय सुरू करता येण्यासाठी औषधिकरण प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येणार आहे .

Diploma in Nutrition Dietician | Udyamita Vikas Training Center

Diploma in Nutrition Dietitian
 



आपले जीवन समृद्ध आणि सुदृढ असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आनंदी आयुष्य जगता यावे यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. 

सुडौल शरीरयष्टी व उत्कृष्ट आरोग्य यामुळे जीवनाचा खरा आनंद उपभोगता येतो त्याच प्रमाणे आयुर्मानही वाढते . निरोगी राहण्यासाठी योग्य सात्त्विक समतोल आहार नित्य नियमाने घेणे आवश्यक आहे. हे समजण्यासाठी आपले शरिर त्याची रचना त्याची कार्यक्षमता  त्याच्या आहार गरजा  समजने अत्यंत आवश्यक आहे. 

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतः कडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी माणसांना वेळच नाही. त्यामुळे संपूर्ण शरीर रचनेचा, आवश्यक आहाराचा अभ्यास असणाऱ्या आहार तज्ञांची नितांत गरज भासते. 

आहारतज्ञ या क्षेत्रातील व्यवसाय संधी समजावून घेण्यासाठी आणि आहारतज्ञ म्हणून सल्लासेवा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी 

भारत सरकार नोंदणीकृत 
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा 

येथे 

डिप्लोमा इन डायटेशिअन अँड न्युट्रीशिअन 

हे प्रशिक्षण दि. 05/06 2022 पासून  सुरू होत आहे. 

हे प्रशिक्षण प्रत्येक रविवारी दु. 11.00 ते 1.30  असे एक वर्ष कालावधीचे असेल. 

यांमध्ये शरीर रचना शास्त्र , आहार पोषक घटक व प्रमाण ,पथ्य व अपथ्य, आजार व आहार व्यवस्थापन , बालकांचे आहार व्यवस्थापन , वद्धपकाळातील आहार व्यवस्थापन , व्यायाम , आदर्श दिनचर्या, डायबेटीस,संधीवात,पॅरालिसीस, हृदयरोग, त्वचा रोग ,केसगळणे,डोळ्यांचे आजार , वंध्यत्व, बद्धकोष्टता यांमध्ये आहार व्यवस्थापन ,वजन कमी करणे,वजन वाढवणे, वय उंची नुसार योग्य वजन असणे इत्यादीचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आहे. 

Register here

अधिक माहिती साठी व प्रवेश घेण्यासाठी  
महेश कुलकर्णी 
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र 
राजधानी टॉवर, 3 रा मजला 
राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा. 

Mobile : +91 9822397384 

येथे संपर्क साधावा.

Wednesday, September 1, 2021

Diploma in Fashion Designing | Udyamita Vikas Training Center, Satara





 Diploma in Fashion Designing

छान दिसणारे व्यक्तिमत्त्व  सुंदर कपडे परिधान केल्याने   अधिकच सुंदर,  आकर्षक   वाटते.

 प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे, 

इतरांनी आपल्या कपड्यांची तारीफ करावी , आपले कौतुक व्हावे असे वाटत असते. महिलावर्ग यासाठी खास मेहनत घेताना दासतो. 

छान रंगसंगतीचे, लेटेस्ट फॅशनचे, आकर्षक कपड्यांची हौस प्रत्येक महिलेला असते. त्याचमुळे महिलांचे लेटेस्ट फॅशनचे ब्लाउज,ड्रेस , फ्राॅक, वनपिस, लाचा, शरारा,घागरा ई .चे फॅशन डिझायनरच्या बुटीकला प्रचंड मागणी आहे. 

फॅशन डिझायनर होण्यासाठी, स्वतःचे बुटिक सुरू करता येण्यासाठी भारत शासन नोंदणीकृत  व 20 वर्षांपासून गुणवत्ता पुर्वक प्रशिक्षण देणाऱ्या उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्रा मार्फत डिप्लोमा ईन फॅशन डिझाईनिंग हे एक वर्षे कालवधीचे प्रशिक्षण सातारा येथे सुरू होत आहे. 

यामध्ये 

स्वतःचे बुटिक सुरू करता येण्याच्या दृष्टीने कापडांचे प्रकार, 

  • टिपांचे प्रकार, 
  • परफेक्ट मेजरमेंट,
  • पेपर कटिंग,
  • फॅशन क्रिएशन, 
  • परफेक्ट कापड कटिंग,
  • रंगसंगतीचे ज्ञान,
  • सुपर फिनिशिंग,
  •  बेबी गारमेट, 
  • फ्राॅक डिझायनिंग, 
  • ड्रेस डिझायनिंग, 
  • वेस्टर्न पॅटर्न डिझायनिंग, 
  • विविध हटके फॅशनसह ब्लाउज डिझायनिंग,
  • लेटेस्ट गळ्यांचे पॅटर्न,
  • विविध स्लिव्जच्या डिझाईन्स लाछा, शरारा, विवीध वन पिस , 
  • स्वतःचे बुटिक कसे सुरू करावे, मार्केटिंग कसे करावे,
  • भांडवल कसे उभे करावे, शासनाच्या कर्ज योजना असे गारमेंट मधील परिपूर्ण प्रशिक्षण आहे.
  •  प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

Join What's App Group


आधिक माहिती साठी 

महेश कुलकर्णी ,उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , 

राजधानी टाॅवर,३ रा मजला, 

राजवाडा बसस्टाॅप जवळ, सातारा. 9822397384.

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...