Translate

Tuesday, December 19, 2023

Diploma in Optometrist Training

 


डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरामध्ये आहे.डोळ्यामुळेच आपण हे सुंदर सृष्टी पाहू शकतो, आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी आनंदी करण्यासाठी, डोळे हे आपले अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.सध्याच्या जीवनशैलीमुळे खूप लवकर डोळ्यांच्या अनेक तक्रारी खूप कमी वयात सुरू झालेल्या दिसून येतात.चष्मा लागणं ही आता वयावर अवलंबून असणारे गोष्ट राहिलेली नाही.अगदी लहान वयापासून चष्मा लागण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसून येते त्याचमुळे चष्मा तयार करून देण्याच्या व्यवसायाला फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे.

नेत्रतज्ञ म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येण्यासाठी चष्मा निर्मिती आणि चष्मा दुकान सुरू करता येण्यासाठी भारत शासन नोंदणीकृत उद्यामिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा आयोजित डिप्लोमा इन ऑप्टोमेट्रीस्ट प्रशिक्षण कार्यक्रम सातारा येथे सुरू होत आहे.   एक वर्ष कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १२/०२/२०२४ असून यामध्ये डोळ्यांची रचना त्याचे कार्य डोळ्यांचे आजार नंबर चे प्रकार चष्म्याचे प्रकार चष्मा तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध मशिनरींचे माहिती त्याचा वापर चष्मा तयार करणे चष्मा दुरुस्त करणे असा सर्व सखोल अभ्यास शिकवण्यात येणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भारत शासनाच्या प्लानिंग कमिशन द्वारा स्थापित भारत सेवक समाज या टेक्निकल .बोर्डाची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्वतःचे चष्मा तयार करण्याचे दुकान सुरू करणे, चष्मा दुरुस्ती व विक्रीचे दुकान सुरू करणे, त्याचबरोबर डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या कडेे नेत्रतज्ञ या पदावर नोकरी मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम शासनाने प्रारित केलेला आहे.

या प्रशिक्षणात प्रवेश मर्यादित असून पात्रता दहावी पास व त्यापुढे आहे.या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी महेश कुलकर्णी संचालक उद्यामिता विकास प्रशिक्षण केंद्र राजधानी टॉवर , तिसरा मजला राजवाडा   बस स्टॉप जवळ सातारा फोन नंबर 98 223 97 384 येथे संपर्क साधावा.

Join Whats app Group


Thursday, November 9, 2023

Namkeen training



अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या प्राथमिक गरजा आहेत आणि त्या प्राथमिक गरजा असल्यामुळे अत्यंत आवश्यक गरजांमध्ये या येतात आणि त्या बरोबरीने अन्न हा जो भाग आहे त्याच्यामध्ये चवीने खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणूनच नमकीन इंडस्ट्री एक वेगळी अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये इंडस्ट्री आहे. ज्याला मागणी फार मोठी आहे आणि ती सतत वाढत असते. या नमकीन इंडस्ट्रीला कधीही मरण नाही, कधीही बंद होत नाही.  नमकीन इंडस्ट्री म्हणजेच चटपटीत पदार्थ, रुचकर पदार्थ, पुन्हा पुन्हा खावे वाटणारे पदार्थ, अशी भरपूर मागणी असणारा नमकीन उद्योग चालू करता येण्यासाठी भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे "नमकीन  प्रशिक्षण"   दि. २०.०३.२०२४ ते दि. २२/०३/२०२४  असे ११ ते ४ वा. यावेळेत ५  दिवस कालावधीचे सुरू होणार आहे. यामध्ये  फरसाण : शेव, भावनगरी, पापडी, खारी बुंदी, लसून शेव, झीरो न. शेव, मसूर, शेंगदाणे (फ्राईड), खारी डाळ, चिवडा : दगडी पोहे, पात्तळ पोहे, मका चिवड, शाबुदाना चिवडा, लक्ष्मी नारायण शेवडा, खट्टा-मिठा, बटाटा चिवडा, भडंग साधे,  गार्लिक पिवळे भडंग इतर मुगडाळ, चणाडाळ, डाळ, सोया स्टिक्स, चकली, आलू भुजिया, भुजिया, केळाचे वेफर्स, बटाटा वेफर्स, मेथी मुठीया, अळूवडी, कोथिंबीर वडी, बाकरवडी,ढोकळा  इ. प्रशिक्षण असणार आहे.

तसेच  पॅकिंग कसे असायला पाहिजे त्याची एमआरपी कशी काढायची असते, लोकांपर्यंत पोहोचायचं कसे असते त्याचे मार्केटिंग कसे करायचे याचेही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. फोन नं. 9822397384

Join what's app group 



Sunday, October 1, 2023

आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं!”, त्या रायबाचं पुढे काय झालं




“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं”… सुभेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतीय. *‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’ या एकाच ध्येयाने उदयभानशी दोन हात करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या कानात लेकाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही, मात्र कोंढाण्यावर भगवा फडकवणं या एकाच ध्यासाने पेटून उठलेल्या तानाजींना इतर कशाचीही फिकीर नव्हती.*


लाडक्या रायबाच्या विवाहाची उत्साहाने तयारी करणाऱ्या तानाजींना अखेर हा विवाह याची देही याची डोळा पाहता आला नाहीच हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. आपली प्रतिज्ञा खरी करताना गड आला मात्र सिंह गेला.


तानाजींचं कतृत्व आजही गायलं जातं, मात्र त्यांचे पुत्र रायबा यांचं इतिहासातील स्थान केवळ त्यांच्या प्रतिज्ञेपुरतंच मर्यादित राहिलं का? वडिलांच्या पश्चात खुद्द शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी रायबांचं लग्न लावलं, मात्र डोक्यावर अक्षता पडल्यानंतर पुढे रायबांचं काय झालं? *पराक्रमी पित्याचा हा लेक स्वराज्याच्या कामी आला का? स्वराज्यासाठी लढला असेल, तर त्याचा इतिहास आपल्याला कधीच का सांगितला जात नाही? असे प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधलीत तर तुम्हाला ठाऊक नसलेला इतिहासाचा एक पैलू हाती लागेल.*


*लग्न झालं अन्…*


नऊ वर्षीय रायबाचं लग्न हा इतिहासातील एक महत्वाचा भाग आहे. रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेल्या तानाजींचा एक आदर्श योद्धाच नव्हे तर आदर्श वडील म्हणूनही उल्लेख केल जातो याचं कारण म्हणजे लहानग्या रायबांना त्यांनी दिलेली शिकवण!


अजाणत्या वयात वडिलांकडून मिळालेला हा कानमंत्र रायबांनी पुढे तंतोतंत जपला.


तानाजींच्या पश्चात शिवाजी महाराजांनी स्वतः रायबाचं लग्न लावलं. पतीविरहात गुरफटेलल्या सावित्रीनेही उभारी घेत रायबासह छोट्या वधुला आपलंसं केलं. इथपर्यंतचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे.


मात्र इतिहासाचे यापुढचे पान अधिक तेजस्वी आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही.


लग्नानंतरही रायबांवर महाराजांचे लक्ष होते. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीनेही मुलाचे शिक्षण निगुतीने पाहिले. वेळोवेळी राजगडावर रायबांची वारी होत होती.


रायबा मोठे होत होते, आणि वडील तानाजींप्रमाणेच शस्त्रविद्येत आपलं कौशल्य सिद्ध करत होते. तरुण वयातील रायबांना पाहताना महाराजांना तानाजींचाच भास होत असे. महाराजांच्या विश्वासातील मात्तबर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिलं, घडवलं.


स्वभावाने धाडसी आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचे सरनौबतपद सोपवले. याकाळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते.


ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलणा-या रायबांना पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या होत्या.


*'पारगडावर' नाव कोरले गेले*


रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी, विश्वासू सेनापतींसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले. अर्थातच यात रायबा सामील झाले. स्वराज्याची दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले होते.


मोहिम आटपून परतताना दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहिल्यानंतर महाराजाना कल्पना सुचली. यातील किमान एक गड स्वराज्याच्या ताब्यात घेत तेथे मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतील नव्हे तर सीमेबाहेरील शत्रुंनाही रोखण्यात यश मिळेल या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली.


*कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या 'चंदगड' मध्ये दिमाखाने उभा राहिलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला.* चारही दिशांनी गर्द झाडीत लपलेल्या या किल्ल्याला सुरक्षेसाठी निसर्गाचं वरदान लाभलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता. *किंबहूना स्वराज्याच्या नियोजित सीमेपार असलेल्या या किल्ल्याचे यावरूनच १६७४ साली किल्ल्याची डागडुजी पूर्ण झाल्यावर ‘पारगड’ नामकरण करण्यात आले.*


*मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या या किल्ल्याचे प्रतिनिधित्व नेमकं कुणाला देणार? या सर्वांच्याच प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले, ‘रायबा मालुसरे’! तरुण वयातच रायबांवर आणखी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली, मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता.*


ज्या दिवशी पारगडची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली, ” जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत पारगडचं रक्षण करा, हा किल्ला अभेद्य ठेवा, त्याची सेवा करा ”. महाराजांचे हे शब्द रायबांसाठी गुरुमंत्र होता. त्याक्षणापासून पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले.


*गडाची वास्तुशांत व गडप्रवेश यासाठी महाराजांचा या गडावर निवास होता.*


*उमरजहून मालुसरेचं संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला. त्यांच्यासह तानाजी मालुसरेंचे निष्ठावंत असलेले शेलार मामा, शिंदे, होळकर, पेठे, कुबल आदी मावळेही कुटुंबासह पारगडावर आले.*


स्वराज्य सुरक्षित रहावा यासाठी त्याच्या सीमेबाहेरील असलेल्या शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी रायबांनी आखलेली रणनिती, मावळ्यांची बसलेली घडी पुढील अनेक वर्ष भक्कम राहिली.


मोहिमांवर निघालेले महाराजही अनेकदा पारगडावर वास्तव्य करत रायबांचे काम पहायचे, त्यांचे भरभरून कौतुक करायचे, मात्र दरवेळी ‘हा पारगड अभेद्य राखा’ असा सल्ला द्यायचे, याचे कारण म्हणजे सीमांच्या सुरक्षेसाठी पारगडचे असलेले महत्त्व!


१६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान यांनी गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांना वीर मरण आले. त्यांची समाधी गडावर आहे.


*रायबांच्या प्रयत्नांमुळे केवळ पारगडचं नव्हे तर स्वराज्य आणि त्याच्या सीमाही कायम मजबूत राहिल्या. सीमेवर आलेल्या शत्रूंना आधी पारगड पार करावा लागेल, जो त्यांना शक्य नाही या विचारांनी रायबांनी सुरक्षायंत्रणांचे नियोजन केले होते. स्वराज्यासाठी त्यांचे हे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले.*


सुरक्षेच्या विस्ताराने कालांतराने शिवखान्यातील तोफखान्याचे प्रमुख, घोडदळ पथकप्रमुख या पदांवरील अनेक सेनापतींचाही पारगडावर मुक्काम होता.


*महाराजांच्या मृत्युनंतरही रायबांनी पारगड जपला. एक, दोन नव्हे तर तब्बल साठ वर्ष रायबा पारगडावर राहून स्वराज्याच्या सीमांवर दक्ष होते.*


आपल्या या कर्मभुमीतच रायबांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यापुर्वी आपल्या मुलांच्या तर हाती पारगडचे व्यवस्थापन सोपविले होते. रायबांनंतर मुंबाजी, येसाजी, अप्पाजी अशा मालुसरेंच्या अनेक वंशजांनी पारगडचे अधिपत्य राखले.


*आजही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामी आहे. त्यांच्यासह शेलार मामांचे वंशज तसेच अनेक मावळ्यांच्या वंशजांचीही पारगडावर ये-जा असते.*


साडेतीनशेंहून अधिक वर्ष सरली, अनेक हल्ले पचवून स्वराज्य बळकट राहिले, स्वराज्याची नवी पिढी आज हे स्वातंत्र्य अनुभवत आहे, मात्र राजांनी दिलेला सल्ला रायबांनी त्यांच्या मृत्युनंतरही जपला.

आजपर्यंत पारगडावर कोणतंही आक्रमण टिकलं नाही, कोणत्याही परकीय शत्रूंना पारगड जिंकता आला नाही, परिणामी स्वराज्याचा अभेद्य किल्ला अशी पारगडने ओळख मिळवली. *चंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची साद आणि या हाकेला उत्तर देणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.*

Thursday, September 28, 2023

Cafe, Ice Ball and Tea Stall Training





चमचमीत नाष्टा आणी फक्कड चहा सगळ्यांनाच आवडतो. तरूणाईला कॅफेत वेळ घालवणे नित्याचेच, उन्हाळ्यात थंडगार लस्सी, कोल्ड्रींक,कॉकटेल,बदामशेक, फालूदा पिण्यात मौज वेगळीच, याच कारणांमुळे कॅफे आणि टी स्टॉल व्यवसायाला कायमच मागणी असते. भांडवली गुंतवणूक कमी आणि फायदा भरपूर असणाऱ्या 
कॅफे, आईस गोळा अँड टी स्टॉल प्रशिक्षण  सुरू करता येण्यासाठी   

भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे "कॅफे, आईस गोळा अँड टी स्टॉल प्रशिक्षण" दि. 30/10/2023 ते 03/10/2023 असे स. 11 ते 4 यावेळेत 5 दिवस कालावधीचे सुरू होणार आहे.  या प्रशिक्षणामध्ये 

१. चहा : स्पे.चहा, गुळाचा चहा, साधा चहा, मसाला चहा, बासुंदी चहा, लेमन टी
२. कॉफी : ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, थिक कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी विथ आईसक्रिम, कोल्ड कॉफी विथ क्रश
३. कोल्डड्रिंक (मॉकटेल) : मोहिनो, ब्लु लगुन, स्क्रू ड्रायव्हर, सन रायस, पिना कोलाडा
४. पिझ्झा : व्हेज पिझ्झा, पनीर पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, कॉर्न पिझ्झा, ऑनियन पिझ्झा, फार्म हाऊस पिझ्झा
५. आईस गोळा: प्लेन आईस गोळा, रोज, कच्चा आम, खट्टा मिठा, काला खट्टा, राजभोग, चॉकलेट चिप्स
६. लस्सीचे विविध प्रकार, मिल्कशेक, फालूदा, कोल्ड काको
७. सँडविच : व्हेज सँडविच, व्हेज मेयो सँडविच, व्हेज चिज सँडविच व इतर
८. बर्गर : व्हेज बर्गर, क्रिस्पी पनीर बर्गर, व्हेज चीज बर्गर, पनीर टिक्क बर्गर व इतर
९. फ्राईज : सिंपल फ्राईज, पेरी पेरी फ्राईज, चीज फ्राईज चीज पेरी पेरी फ्राईज व इतर

इत्यादींचे सखोल प्रशिक्षण प्रमाणपत्रासह दिले जाणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी


महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. फोन नं. 9822397384

Friday, August 4, 2023

Diploma in Psychology and Hypnotherapy




 डिप्लोमा इन सायकॉलॉजो अँड हिप्नोथेरपी 

माणसाचे आयुष्य अनेक भावभावनानी भरलेले आहे, सजलेले आहे.आनंद, दुःख, राग, माया, उत्साह, नैराश्य, उमेद अश्या भावनांची गोळाबेरीज म्हणजे आयुष्य आहे असे म्हटले तर वावागे ठरणार नाही. या सगळ्यां भावभावना मनाशी संबंधित आहेत. मन हे एक अथांग समुद्रासारखे आहे, त्याची खोली सहजा सहजी कळत नाही. वरून माणूस शांत वाटत असला तरी त्याचा मनात कल्लोळ चाललेला असू शकतो. 

मनामुळेच एखाद्याला अचंबित करणारे असे यश एखाद्या खेळा मध्ये मिळू शकते आणी एखाद्याला निराशेच्या गर्तेत नेऊ शकते. अशा मनाचा अभ्यास करता यावा, मानस शास्त्र समजून घेऊन त्या द्वारे माणसाला मदत करता येण्यासाठी , मानस शास्त्रतिल व्यवसाय संधीं शिकण्यासाठी डिप्लोमा इन सायकॉलॉजी अँड हिपनोथेरपी  प्रशिक्षणाचे  आयोजन प्रत्तेक शनिवारी दुपारी 2:30 ते 5 असे एक वर्ष कालावधीचे करण्यात आलेले आहे. यामध्ये 

मानस शास्त्र ओळख, वर्तणूक शास्त्र , मानसशास्त्राचा दैनंदिन उपयोग , सेल्फ अँड पर्सन्यालिटी, स्ट्रेस मॅनेजमेंट, गुणवत्तांचा विकास, मन व एकाग्रता, चाईल्ड सायकोलॉजी, डिसऑर्डर ओळखणे, मोटिव्हेशन, स्वसंमोहन, हिप्नॉटिझम, मास  हिप्नॉटिझम, स्टेजशोज, क्लिनिकल हिप्नॉटिझम, पास्टलाईफ रिग्रेशन, मेस्मोरिझम आणि बरेच काही... फायदे 

१) मानसमित्र  म्हणून काम करता येते. २) हिप्नोथेरपीस्ट म्हणून व्यवसाईक काम करता येते. ३) समुपदेशक व्यवसाय करता येतो. 

Join what's app group 

प्रशिक्षण प्रमाणपत्रासह दिले जाणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. फोन नं. 9822397384

Sunday, March 26, 2023

dnyanadaonline




 मोबाईल एप्लिकेशन डेव्हलपमेंट कोर्स


या कोर्स मधून कोणीही व्यक्ति ज्याच्या मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आहे उत्तम प्रकारचे मोबाईल एप्लिकेशन कोणतेही प्रोग्रॅमींगची माहीती नसतानाही अगदी सहजरित्या तयार करु शकतो.

या कोर्समध्ये पुढील एप्लिकेशन्सचा समावेश करण्यात आला आहे.

उदा. सिंगल स्क्रिन एप्लिकेशन, मल्टीपल स्क्रिन एप्लिकेशन, मोबाईल एप मधून कॉल सिस्टिम तयार करणे, वेबसाईटवर जाणे (वेबसाईट लिंकींग), एप मध्ये वेबसाईट ओपन करणे, ऑडीओ – व्हिडीओचा करुन मोबाईल एप्लिकेशन तयार करणे, फोटो काढून शेअर करणे, एपमध्ये डाटाबेस चा वापर करणे, वेळ तारीख दाखवणे, स्वतासाठी टू डु लिस्ट तयार करणे, डिजीटल सिग्नेचर तयार करणे, रंगबिरंगी मोबाईल स्कि्रन्स, मोबाईल एप स्क्रिन डिझाईन करणे, मोबाईल एप टेस्टिंग करणे, मल्टीपल वेबसाईट लिंकींग करुन मिनी प्रोजेक्ट करणे अशा विविध प्रकारच्या मोबाईल एप्लिकेशन्स चे साध्या सोप्या मराठी भाषेतून सादरीकरण करण्यात आले आहे.

संक्षिप्त बाह्यरेखा (short overview)







Thursday, March 9, 2023

Cafe and Tea Stall

 



चमचमीत नाष्टा आणी फक्कड चहा सगळ्यांनाच आवडतो. तरूणाईला कॅफेत वेळ घालवणे नित्याचेच, उन्हाळ्यात थंडगार लस्सी, कोल्ड्रींक,कॉकटेल,बदामशेक, फालूदा पिण्यात मौज वेगळीच, याच कारणांमुळे कॅफे आणि टी स्टॉल व्यवसायाला कायमच मागणी असते. भांडवली गुंतवणूक कमी आणि फायदा भरपूर असणाऱ्या कॅफे आणि टी स्टॉल सुरू करता येण्यासाठी   

भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा येथे "कॅफे आणि टी स्टॉल प्रशिक्षण" दि. 24/7/2023 ते 28/7/2023 असे स. 11 ते 4 यावेळेत 5 दिवस कालावधीचे सुरू होणार आहे.  या प्रशिक्षणामध्ये 
1) चहा : स्पेशल चहा, गुळाचा चहा, साधा चहा, मसाला चहा, लेमन टी, बासुंदी चहा
2) कॉफी : ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, थिक कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी विथ आईसक्रिम, कोल्ड कॉफी विथ क्रश.
3) कॉल्ड्रिंक(मॉकटेल) : मोहितो, ब्लू लगून, स्क्रु ड्रायव्हर, सन रायस, पिना कोलाड, ओरिओ शेक, किटकॅट शेक, स्ट्रॉबेरी शेक
4) पिझ्झा: व्हेज पिझ्झा, पनीर पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, कॉर्न पिझ्झा, ऑनियन पिझ्झा, फार्म हाउस पिझ्झा
5) चायनिज सुप : व्हेज मंचाव सूप, स्विट कॉर्न सूप, हॉट अॅंड सॉर सूप, व्हेज मंच्युरियन सूप, व ईतर
6) चायनिज स्टार्टर: व्हेज मंच्युरिनय, गोबी 65, पनीर चिल्ली, पनीर मंच्युरियन व ईतर
7) सॅंडविच : व्हेज सॅंडविच, व्हेज मेयो सॅंडविच, व्हेज चिज सॅंडविच व ईतर
8) बर्गर : व्हेज बर्गर, क्रिस्पी पनीर बर्गर, व्हेज चीज बर्गर, पनीर टिक्का बर्गर व ईतर
9)फ्राईज : सिंपल फ्राईज, पेरी पेरी फ्राईज, चीज फ्राईज, चीज पेरी पेरी फ्राईज व ईतर
10) सलाड : फ्रेश व्हेजीटेबल सलाड, सीझर सलाड
11) मोमोज : सेजवान मोमोज, चीज मोमोज, पेरिफेरी मोमोज
12) नाचोज : मॅक्सिकन नाचोज, बार्बीक्यू नाचोज, ग्रोव्हर लोड नाचोज

इत्यादींचे सखोल प्रशिक्षण प्रमाणपत्रासह दिले जाणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन संचालक उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र, सातारा यांनी केले आहे. प्रवेश मर्यादित आहेत. अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी 

महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. फोन नं. 9822397384




Holistic Healing Heaven एका स्वप्नातून सुरू झालेला आरोग्याचा प्रवास...

  प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या विचारातून होते. Holistic Healing Heaven ची सुरुवातही अशाच एका विचारातून झाली – लोकांना औषधांवर अ...