Translate

Sunday, April 25, 2021

Humble appeal to all News Channels | Media

 सर्वच न्युज चँनल , मिडीयाला कळकळीचे नम्र आवाहन 


चिंताजनक बातमी, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी, धक्कादायक बातमी, काळीज हेलावून टाकणारी बातमी, गंभीर बातमी, हृदय पिळवटून टाकणारी बातमी

आणि अनेक प्रकारच्या हेडलाईन्स वापरुन प्रेक्षकांना खरतर सावध करण्याच्या हेतूने न्यूज चॅनेल त्यांचे काम करत असतात. 

सध्याच्या काळात मात्र हे न्यूज चॅनल आठवड्यातील २४ तास फक्त आणि फक्त कोरोना कोरोना आणि कोरोनाच्याच बातम्या एवढ्या दाखवत आहेत की त्या माप नाही. यांनी काय बातमी दाखवावी तो त्यांचा प्रश्न (कृपया राजकारणी लोकांसारख तुम्ही म्हणू नका आम्ही दाखवतो  मग तुम्ही का पाहता तुमचीच चूक आहे.) आपली प्रत्येक बातमीचा समाजातील अनेक प्रकारच्या जनतेवर दाट परिणाम होत असतो.

T.V. वाल्यांनो आम्हाला धडधडत्या चिता,पेशंटने भरलेले हाँस्पीटल्स्, स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी लाईन, आम्हाला दाखवू नका. त्यामुळे जनतेच्या मनात कोरोना बद्दल जास्त भीती निर्माण होत आहे.

महामारी आहे. सगळ्यांना माहीत आहे.परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.हे पण सगळ्यांना माहीत आहे.

टि.व्ही. न्यूज चॅनलचा कहर तर नाशिकच्या ऑक्सिजन दुर्घटने पाहायला मिळाला इथ लोक तडफडत आहे, डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत. मृत्यु झालेल्यांचे नातेवाईक आक्रोश करत आहेत आणि काही टी. व्ही. न्यूज चॅनल वाले या सर्व प्रकरणाचं लाईव्ह टेलेकास्ट करण्यात मग्न होते. अरे काय हीच माणुसकी. 

नातेवाईकांना धीर देण्याचा सोडून त्याच लाईव्ह टेलेकास्ट करण्यात कसलं तुमचं कौशल्य... 

या प्रकरणामूळे कितीतरी जणांनी हळहळ वाटून घेतली. ज्यांना हृदयाचा त्रास आहे. तब्बेत ठीक नाही तसच मानसिक रित्या कमकूवत आहेत त्यांना तुम्ही नाहक त्रास दिला. याच बरोबर घरात लहान मुले, तरुण विद्यार्थी , १० वी १२ वी ला असणारे विद्यार्थी, वृद्ध लोक, महिला यांनी आपल्या असल्या भयंकर बातम्यांमूळे त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड ताण येतोच.

अशा कितीतरी घटना सांगता येतील...

टी. व्ही. न्यूज चॅनल नी जनतेला कोरोना काळात जास्तीत जास्त भितीयुक्त, घाबरगुंडी, गांगरुन टाकणा-या बातम्यांचा भडीमार खरच थांबवण गरजेच आहे...

T.V. वाल्यांनो कृपया खालील दिलेले मुद्दे जनतेला दाखवा !!

कोरोनाने बरे झालेल्या पेशंटचे इंटरव्ह्यु दाखवा.

आँक्सिजन सिलिंडर कुठे मिळतात ते दाखवा.

कुठल्या हाँस्पीटलमध्ये बेड उपलब्ध आहेत ते दाखवा.

रेमडिसिवीर इंजेक्शन कुठे मिळेल .हे दाखवा.

प्लाज्मा डोनर किती व कुठे आहेत त्याची माहिती दाखवा.

अँम्बुलन्स सेवा कुठे कुठे उपलब्ध आहे. ते दाखवा.

नवीन कोविड सेंटर कोणत्या शहरात? क़ोठे सुरु झाले. त्याची माहिती पत्त्यासह जनतेला द्या.

हाॅस्पीटलची जास्त आलेली बिले कशी कमी करावीत. याची माहिती दाखवा.

लसीकरणाबाबत जनजागृती करा.

रोज कोरोनामुक्त होणाऱ्या पेशंटचीच आकडेवारी दाखवा.

यामुळे खुप काही चांगले परिणाम दिसून येईल. 

आणि हे जमलेच नाहीतर टी.व्ही. चॅनल काही दिवस पूर्ण बंद करुन एखाद्या कोविड रुग्णालयात सेवा करायला गेलात तरी उत्तम. पण कोरोनामूळे आधीच काव-याबाव-या, गांगरुन गेलेल्या सर्वसामान्य जनतेचा करीत असलेला मानिसक छळ कृपा करु थांबवा.

 देव, देश, धर्माची भीती तुम्हाला वाटत नाही का?  दुसऱ्याला मरणाची भीती दाखवणे हे सुद्धा एक प्रकारचे पाप आहे. 

      आपल्या अनेक T.V. न्यूज चॅनलचा एक दर्शक


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा


    

No comments:

Post a Comment

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...