सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान
सातारा जिल्हा परिषद पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत नेहमीच अग्रसेर असणारी जिल्हा परिषद आहे.उत्कृष्ट कामगिरीबाबत अनेक पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेने आजवर प्राप्त केले आहेत. या पुरस्कारात आता दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 (पडताळणी वर्ष 2019-20) मिळाल्याने पुरस्कारांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२४ एप्रिल २०२१ रोजी पंचायतराज दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेस हा पुरस्कार प्राप्त झालेचे घोषित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायतराज मंत्री उपस्थित होते.
हेही वाचा
१० सकारात्मक लघू कथा मनातल्या घरात देवपूजा एक उत्तम मेडिटेशन कोरोनाफोबिया टाळा
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...
No comments:
Post a Comment