Translate

Monday, December 20, 2021

The wedding of Om and Sweetu took place in this famous temple.

येऊ कशी कशी मी नांदायला या झी मराठी वरील मालिकामधील ओम  आणि स्वीटू यांचं लग्न रत्नागिरीत जयगडमधील कचरे या छोट्याशा गावात विनायकाचे एक मंदिर आहे या प्रसिद्ध मंदिरात झालं लग्नाचे चित्रकरण झाले. सदरचे मंदीर अतिशय सुंदर आहे. 



2003 साली या मंदिराची स्थापना झाली. गावातील जिंदाल मंडळाने हे मंदिर उभारले. तुम्हाला इथे भेट द्यायची असल्यास रत्नागिरी बस स्थानकापासून मंदिर जवळपास 37 किलोमिटर अंतरावर आहे आणि गणपती पुळे 13 किलोमिटर अंतरावर आहे. तसेच 6 किलोमिटरवर जयगडचा किल्ला देखील आहे. 

त्यामुळे या ठिकाणी आल्यावर अनेक व्यक्ती विनायकाच्या मंदिराला देखील भेट देतात. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला मूषकराजाचे दर्शन होते. इथे हनुमाची देखील एक मूर्ती आहे. जिची उंची 6 फूट एवढी आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर देखील नयनरम्य आहे. माशांनी भरलेलं तलाव आणि हिरवळीची मखमल असलेला बगीचा इथे आहे.  


तुम्ही जर रत्नागिरीला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या भव्य मंदिराला देखील नक्की भेट द्या.



आपल्या व्यवसायाची जाहीरात आपल्या लोकप्रिय सोशल मिडीया सातारा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा digitalshende@gmail.com

Show on Google Map

Saturday, December 18, 2021

Vastu shastra वास्तुशास्त्र तज्ञ प्रशिक्षण

 वास्तुशास्त्र तज्ञ प्रशिक्षण 


जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणा पर्यंत माणूस सुख मिळण्यासाठी सतत धडपड करत असतो. 

चांगले राहणीमान,चांगले आरोग्य , चांगला जोडिदार, चांगली संतती, सुंदर टूमदार घर, चांगली आर्थिक स्थिती हे सुख मिळावे असे सगळ्यांनाच वाटत असते. अनेकांकडे यातील सर्व सुखे कमिजास्त प्रमाणात असतातही. पण ब-याचदा यश,सुख समाधान खूप प्रयत्न करूनही हवे तसे मिळत नाही . याची कारणे शोधताना आपण ज्या वास्तूमध्ये राहतो,आपला व्यवसाय ज्या वास्तू मध्ये आहे ती वास्तू कशी असावी याचा शास्त्रोक्त अभ्यास वास्तूशास्त्रा मध्ये केलेला आढळतो. पंचमहा भुतांनी आपली पृथ्वी तयार झालेली आहे. आणि आपले शरीरही पंचमहाभूतांनीच तयार झालेले आहे हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. 

याच सिद्धांतांवर अधारीत असणाऱ्या वास्तूशास्त्राचा अभ्यास केल्यावर लक्षात येते कि आपल्या अनेक संशोधक रृशी मुनींनी अत्यंत बारकाईने मनुष्याला वास्तूसुख मिळण्यासाठी वास्तू कशी असावी याचा आभ्यास केलेला आहे. 

वास्तू अभ्यासपूर्ण बांधलेली असेल, चांगली हवा, प्रकाश यांच्या नियोजनासह अर्थातच वास्तू चांगली उर्जा देणारी असेल तर मनुष्याला निरोगी आयुष्य मिळेल,तो सुदृढ असेल,जीवनात सुख, समाधान,यश यामुळे मिळेल आसा विचार करून वास्तूशास्त्राची निर्मिती व आखणी झालेली आहे. 

वास्तूशास्त्र समजून घेण्यासाठी व अधुनिक वास्तूशास्त्राशी सांगड घालून सुखदाई वास्तू कशी होते हे समजून घेण्यासाठी 

त्यातील उद्योग संधीचा शोध घेण्यासाठी वास्तूशास्त्र  तज्ञ प्रशिक्षणाचे आयोजन 

रविवार दि.23 जानेवारी पासून 

भारत शासन नोंदणीकृत उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र सातारा 

येथे करण्यात आलेले आहे. 

हे प्रशिक्षण 4 महिने कालावधीचे 

प्रत्येक रविवारी सकाळी 11 ते 1 यावेळात घेण्यात येणार आहे. 

यामध्ये वास्तूशास्त्राचा इतीहास, वास्तू दिशा ज्ञान, प्रवेशव्दार,प्लॉट, फ्लॅट, दुकान गाळा यांची रचना त्यामध्ये असणारे दोष, त्यामुळे येणाऱ्या अडचणी , 

त्यावरील उपाय, विविध संस्कार जसे नंदाप्रतिष्ठापना, शंकूस्थापना, पंचशीर्ष स्थापना ,रत्नदिप संस्कार ,पि-यामिड वास्तू,धातू संस्कार ,धान्य संस्कार , औषध संस्कार , विविध यंत्रांचा अभ्यास, 

विविध विधींचा अभ्यास वृक्षछेदन विधी, वास्तूशांत विधी अधुनिक काळानुसार वास्तूरचना इत्यादींचा  सखोल अभ्यास करून घेतला जाणार आहे. 

प्रवेश मर्यादित आहेत. 

अधीक माहिति साठी व प्रवेशासाठी 

महेश कुलकर्णी , उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र , राजधानी टॉवर, 3 रा मजला,राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. 

फोन नं. 9822397384

Thursday, December 9, 2021

Jams, sauces, syrups, pickles training


लोणची, जाम, सॉस प्रशिक्षण




अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कमी भांडवला मध्ये जास्त नफा मिळणारे उद्योगात  जाम, सॉस, सिरप, पिकल्स मधील उद्योगास मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे.

या मध्ये विविध प्रकारचे जाम जसे मँगो जाम,पायनॅपल जाम,  स्ट्रॉबेरी जाम, मिक्सफ्रुट जाम, जेली स्विट  चॉकलेट.
 विविध सिरप जसे रोज सिरप, खस सिरप
कोकम सिरप, स्ट्रॉबेरी बेरी क्रश सिरप, लेमन सिरप, पायनॅपल सिरप, मँगो सिरप, कालाखट्टा सिरप, तसेच 
टोमॅटो सॉस, ग्रिन चिली सॉस,  रेडचिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, शेजवान चटणी.
विविध प्रकारची लोणची जसे  लिंबू लोणचे गोड लिंबू लोणचे, उपवास लिंबू लोणचे ,मिरची लोणचे, व्हिजीटेबल लोणचे, मुळ लोणचे, आंबा लोणचे.

इत्यादींचे  सखोल व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय कसा सुरू करावा याचे सखोल मार्गदर्शन, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र,  प्रवेश मर्यादित. 

जाम, सॉस, सिरप, पिकल्स  व्यवसाय सुरू करता येण्यासाठी सदर प्रशिक्षणाचे आयोजन 
भारत सरकार नोंदणीकृत 
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र,सातारा 
 सदरचे प्रशिक्षण दि. 05/01/2022 ते 07/01/2022 या कालावधीत होणार आहे.
अधिक माहीती साठी
महेश कुलकर्णी , संचालक
उद्यमिता विकास प्रशिक्षण केंद्र 
राजधानी टॉवर्स, 3 रा मजला, राजवाडा बसस्टॉप जवळ, सातारा 
9822397384 येथे संपर्क साधावा.

website show on map

Tuesday, December 7, 2021

Why the color of the passenger plane is white

माहित करुन घ्या... प्रवासी विमानाचा रंग हा पांढरा का असतो!! 

विमान प्रवास आपल्यापैकी अनेकांनी केला असेल किंवा नसेलही केला तरी लहानपणापासून अनेकांनी दूरुन का होईना विमान पाहिलेलं असतं. हे पाहत असताना तुम्ही याकडे कधी लक्ष दिलं नसेल की, काही अपवाद वगळता बहुतेक प्रवासी विमाने ही पांढऱ्या रंगांची असतात. 

मग ते कोणत्याही देशाचं असो. पण कधी विचार केलाय का, की प्रवासी विमानांना पांढराच रंग का असतो? 

खरंतर याच्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. ती काय हे जाणून घेऊया....

सूर्याचा प्रकाश होतो रिफ्लेक्ट

विमानाला पांढरा रंग ठेवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाचा चांगला रिफ्लेक्टर असतो. काळा किंवा इतर कोणत्या डार्क रंगांप्रमाणे पांढरा रंग हा सूर्याचा प्रकाश आणि त्याची गरमी शोषूण घेत नाही. जर विमानाचा रंग डार्क असेल तर याने सूर्य प्रकाश आणि त्याची गरमी शोषूण घेतली जाईल आणि याने विमानाच्या मशीनवर वाईट प्रभाव पडू शकतो. 

तेलगळती सहज कळते

 जर विमानातील मशीनरी किंवा कोणत्याही भागातून तेलगळती होत असेल तर, तेव्हा पांढऱ्या रंगामुळे ती सहजपणे बघता येऊ शकते. त्यामुळे विमानांचा रंग हा पांढरा ठेवला जातो. 

शोधणं सोपं होतं

जर विमानाचा अपघात झाला असेल आणि विमान कुठे जंगलात किंवा पाण्यात पडलं असेल तर पांढऱ्या रंगामुळे शोधणं सोपं होतं. रात्रीच्या अंधारात पांढऱ्या रंगाचं विमान सहज बघितलं जाऊ शकतं. 

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...