दिनचर्या पाळावी | वेळेत उठणे वेळेत झोपणे | वेळेवर पथ्यकर आहार घ्यावा
केळी, पेरू,सीताफळ,ice क्रीम, कोल्ड ड्रिंक,फ्रीझ मधील पदार्थ,दही,गार पाणी ज्याने सर्दी खोकला होईल ते सर्व टाळावे...
उन्हाळा आहे उगाचच आले,लवंग,मिरी ,दही असे उष्ण पदार्थ टाळावे
दुधाचे आटवलेले पदार्थ पेढा,बासुंदी,श्रीखंड, आम्रखंड,पनीर,चीझ हे बेताने खावे टाळलेले चांगले
ताकद यावी म्हणून अंडी ,मासे,चिकन,मटण असे नॉनव्हेज पदार्थ पचायला जड असल्याने टाळावेत
घ्यायचे झाल्यास चांगल्या प्रतीचे आणि मांसरस,आळणी सूप,पांढरा रस्सा अशा स्वरूपात घ्यावे
त्याऐवजी मुगाचे कढणं, खजुराचे सरबत,ताजी भाकरी-चपाती फळभाज्या(दुधी,भेंडी,गवारी,कोबी,
फ्लॉवर,टोमॅटो, गाजर,बिट,मुळा,(उकडून,वाफवून कच्चे नको) तूप,हळद सुंठ टाकून दूध यांचा आहारात समावेश असावा
भाताचे प्रमाण कमी करावे तांदूळ 1 वर्ष जुना आणि कुकर ऐवजी पातेल्यात भात करावा तो पचायला हलका आणि कमी कफकारक
होतो
फळांमध्ये डाळिंब,खजूर,अंजीर,आंबा हे सिझन नुसार खावे
काळे मनुके,बेदाणे,सुके अंजीर,तवकिर,शिंगाडा,तूप,ताजे लोणी,सब्जा,वाळा, गुलाबपाणी
कोकम सरबत,आवळा सरबत,वाळा सरबत,खजूर सरबत,यांचा रेग्युलर पाण्यासोबत वापर करावा
प्राणायाम, योगासने,हलका व्यायाम,चालणे,सायकलिंग, श्वसनाचे व्यायाम करावेत
ज्यांचे वजन जास्त आहे आणि कष्टाचे काम कमी त्यांनी दिवसा झोपणे टाळावे
दिवसा झोपायचे असल्यास टेबल खुर्चीवर बसून झोपावे (कफ आणि वजन वाढत नाही)
वैद्य राहुल दिलीप चव्हाण
shashwatayurvedic.com
Cont- 9421619384
(वरील विषय हे वैद्यांचे वयक्तिक मत असून औषध वापर याविषयी सर्वजण सहमत असतील असे नाहीवापरा पूर्वी जवळील वैद्यांचा सल्ला घ्यावा ज्यांना आयुर्वेदाचे उपचार व विचार नको असतील त्यांनी कृपया मोठ्या मनाने दुर्लक्ष करावे)
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...
No comments:
Post a Comment