Translate

Saturday, May 29, 2021

Leopard sightings in Satara



सातारा मध्ये सध्या कडक लॉकडाऊनमूळे सर्वत्र वाहनांची वर्दळ कमीच दिसून येते. तस पाहिल तर किल्ले अजिंक्यतारावर बिबट्याचे अस्तित्व असल्याचे बोलले जाते. कमालीची शांतता असल्यामूळे कचरा डेपोच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने आपले अगदी आरामशीर पहूडलेला बिबट्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल होतो आहे.

किल्ले अजिंक्यताराच्या उतारावर शाहूनगर परिसरातील घनदाट झाडीमध्ये बिबट्या दर्शन होणे ही नित्याची बाब आहे. तसच किल्ल्यावरील अनेक ठिकाणीही बिबट्याचे दर्शन होत असल्याचे दिसते.

मात्र कचरा डेपोच्या संरक्षक भितीवर दिवसा बिबट्याचं दर्शन होणे ही तस पाहिल तर गंभीर बाब मानली पाहिजे, खरतर या परिसरात कायम वाहनांची वर्दळ सुरु असते. बिबट्या एवढ्या खाली येत असेल तर त्याला वेळीच जेरबंद करणे आवश्यक बनते.

या परिसरात रहिवासी वस्ती जरी कमी असली तरी वर्दळ मात्र कायम असते. येणा-या कच-याचा गाड्या, दु-चाकी तसच गुरे यांचाही वावर कायम असतो.


   
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

 तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...

Friday, May 28, 2021

7 types of relaxation

 7 प्रकारच्या विश्रांती..


दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ?
झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार असतात.  

१) शारीरिक विश्रांती

आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. 

योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.


२) मानसिक विश्रांती


दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसराभोळे होयला सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं तेच सुरू असतं. रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही. 

८ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते. हे आपल्या सोबत कशामुळे होत असेल याचा विचार कधी आपण केला आहे का ?

मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग आपण अवलंबू शकत तर नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा. आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा . आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे.  रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होत अश्या विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू ? यावर आपण अभ्यास करू शकतो. 

३) सेन्सरी विश्रांती



विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे , सेन्सरी विश्रांती दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा समोर बसून काम करणे,  लाईट्स , आजूबाजूला होणारा आवाज , खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे , यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत पण ऑनलाइन मिटींग करून ही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा. 

४) क्रिएटीव्ह विश्रांती

क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अश्या प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी , छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटीव्ह विश्रांतीच . अश्या गोष्टी जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते , अश्या गोष्टी , छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो. आपण आपले आठवड्यातील 40 तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.

५) भावनिक विश्रांती


सतत इतरांना काय वाटेल यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते. 

अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्राना भेटा/फोन करा. तेव्हाच आपल्याला "भावनिक विश्रांती" मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे.  

६) सामाजिक विश्रांती 

भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहुयात , 

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी २ मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो अशा लोकांसोबत संपर्कात राहा. 

७) अध्यात्मिक विश्रांती


या विश्रांती नंतर अध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया , प्रेम , आपुलकी , स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं ही अध्यात्मिक विश्रांती.  आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल अशा कामांत स्वतःला गुंतवणे, रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान कराणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत  जोडले जा. 
मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता स्वतः साठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...



Monday, May 24, 2021

INS Vikramaditya 360 view

विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हा व्हिडीओ जरूर पहावा...

Students, parents, teachers must watch this video ...

आयएनएस विक्रमादित्य 360 degree मध्ये पाहण्याची संधी 

मोबाईल कुठल्याही दिशेला फिरवून नक्की पहा. आपण INS विक्रमादित्य वरच असल्या सारखे वाटते.
न चुकता जरूर पहा एक वेगळा अनुभव


विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा 

https://youtu.be/yy02rQMmKLU


तुमचा मोबाईल तुम्ही ज्या दिशेला फिरवाल तुम्हला नेव्हीच्या विक्रमादित्य या प्रचंड मोठ्या जहाजावर असल्याचा भास होईल व तिथूनच आपण समुद्र दर्शन करतो का काय असे भासेल


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

 तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...


Sunday, May 16, 2021

कोरोनाच्या या काळात मास्क घालून घराबाहेर पडणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.



एक मास्क नाही तर दोन तीन मास्क घालून वावरणारी दृष्टीस पडतात. मास्क म्हणजेच मुखपट्टी कोणता घालवा, कोणता मास्क जास्त उपयोगी आहे. यावरची चर्चा २०२० मध्ये होत होती जी २०२१ मध्ये मागे पडली. सर्व सामान्य जनता परवडेल त्या किंमतीचा मास्क सर्रास वापरतात. 

मास्क कसा वापरवा किती वेळा वापरावा याच्या गाईड लाईन्स ठरलेल्या आहेत. मास्कचा वापर ही आता कॉमन बाब झाली आहे. त्यामूळे तो तोंडावर असला म्हणजे झाल अशी लोकभावना दिसून येते.

सिंगल कापड असलेला, दुमेरी - तिमेरी घडीचा मास्क किंवा एखादं फडकं तोंडाला गुंडाळणे म्हणजे मास्क नाही.

बरेचजण मास्क म्हणून हातरुमालचाही वापर करताना दिसतात.

आपण मास्क घालून बाहेर जातो कुठेही फिरतो. घरी आल्या नंतर तो कुठे ठेवतो, कसा ठेवतो याचा विचार करतो का आपण याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. 


बाहेर वावरत असताना, बोलताना मास्क तोंडावर नीट आहे की नाही याची खात्री करत रहा.

उत्तम प्रकारच्या मास्कचा वापर करा... मास्क एक ढाल आहे...  शक्यतो तो वॉशेबल असावा.

घरी आल्यानंतर मास्क लगेचच सॅनिटाईज करुन स्वच्छ धूणे फार महत्वाचे ठरते. आपण बाहेर जातो. अनेक ठिकाणची धूळ, जंतू मास्कच्या बाहेरील भागावर असण्याची दाट शक्यता असते.

त्यामूळे घरी आल्यानंतर आपला मास्क स्वयंपाक घरात, खूंटीला, किंवा घराच्या आतील भागात बिंधास्तपणे न ठेवता तो त्वरीत सॅनेटाईज तसेच धुवून टाकणे हे प्रथम व्हायलाच हवं. लक्षात असे नाही केल तर मास्कवरील धूळ जंतू घरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हात रुमाल मास्क म्हणून वापरत असाल तर तोही घरात आल्या आल्या स्वच्छ धूतला पाहिजे. हात रुमालच्या २ ४ जोड्या मास्क साठी राखीव ठेवा. एकच रुमाल सारखा वापरुच नका. कोणत्या बाजूने रुमाल तोंडाला बांधला आहे हे पुढील वेळेस लक्षात न घेता उलटा सुलटा रुमाल मास्क म्हणून वापरला गेला तर जंतू, धूळ यांना आपण निमंत्रण देत आहात.

महिलांनी ओढणीचा वापर मास्क म्हणून कधीच करु नये. कारण एक तर ओढणी ही कपड्यासोबत घरात आणली जाते. ती कपाटात किंवा घराच्या आतील बाजूस तशीच ठेवली गेली तर बाहेरी धूळ, जंतू सरळ घरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मास्क ची वापर मर्यादा संपलेनंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. तो सरळ जाळून टाकला तर उत्तमच. मात्र  कचरा गाड्यात चूकुनही टाकू नका. तसेच रस्त्यावरही निष्काळजीपणे टाकून देवू नका.

एकच मास्क महिनों महिने वापरु नका... 

जीवन अनमोल आहे... तुमचा मास्क... तुमची जबाबदारी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

 तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...

 

Friday, May 14, 2021

Your social media account | Your responsibility.

माझ्या नावाने फेसबूकचे कोणीतरी डुप्लिकेट अकाऊंट सुरु केले आहे. 

त्या अकाऊंट वरुन पैसे मागितले तर देवू नका.

माझा आय डी चोरला आहे.

अशा विविध प्रकारच्या तक्रारी सध्या सोशल मिडीयावर झळकू लागल्या आहेत.



अस का होतय... याला जबाबदार कोण आहे...

चला जाणून घेवू या याबाबत...

खर तर सोशल मिडीयावरील कोणतेही अकाऊंट सहजासहजी हॅक करता येत नाही. मग ते का होत. तर यासाठी सर्वस्वी जबाबदार आपणच असतो.

काय

हो आपणच जबाबदार असतो. 

कसे ...

आपल्याला अनेक वेळ फेक मेसेज येतात. तुमचं भविष्य जाणून घ्या मागच्या जन्मी तुम्ही कोण होता. पुढची ७५ वर्ष तुमची अशी जाणार आहेत. जन्मवेळ पाहा. ही योजना तुमच्याच साठी. तुमचे वय जाणून घ्या. तुमच्या जोडीदारा बाबत माहिती घ्या. तुम्ही कोणत्या हिरो, हिरोईन सारखे दिसता.

अशा एक अनेक प्रकारच्या पोस्टस् सोशल मिडीयावर सतत आपल्याला दिसतात. खरतर या पोस्टस् पासूनच आपल्या अकाऊंटला धोका निमार्ण होत असतो. आपण क्षणाचाही विचार न करता संबंधीत लिंक वर सोशल मिडीयाच्या माध्यमातून क्लिक करतो आणि तिथेच आपण चूकतो. अशा प्रकारच्या वेबसाईट क्लिक करताच आपल्या डिजीटल डिव्हाईस मध्ये घूसून कॅचे फाईल्स सेंड करुन आपली माहिती काढून घेत असतात. हे काम एवढ्या चपळतेने चालते की आपल्याला काहीही कळत नाही.

आपल्याला अनेक ठिकाणाहून फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात काही तर मुद्दाम फेक असतात आपण फ्रेंड रिक्केस्ट आली की कुतूहल म्हणून नाव, प्रोफाईल फोटो, पोस्ट तसच काही इतर माहिती मिळते का हे त्या संबंधीत फ्रेंड रिक्केस्टच्या वॉल वर जावून ३ ते ४ मिनीट पाहतो याही ठिकाणी आपली माहिती, अकाऊंट डिटेल्स लिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तिसरं म्हणजे आपल्याला येणारे मेसेज. कोणताही मेसेज वरील लिंक ओपन करुन पाहण्याआधी ती लिंक सुरक्षित आहे की नाही हेही पाहण्याचे कष्ट सुशिक्षीत लोकं घेत नाहीत याचं आश्चर्य आहे. अशा फेक लिंकवर जावून तेथील पेजेवर वेळ घालवणे म्हणजे स्वत:ला संकंटात लोटून घेण्यासारख आहे.

काय कराल...

सोशल मिडीयावर येणा-या लिंक उघडण्यापूर्वी त्या सुरक्षित HTTPS आहेत का याची खात्री करा मगच उघडा.

येणा-या फ्रेंड रिक्वेस्ट मधील प्रोफाईल फोटो नसेल किंवा तो व्यक्तीचा नसून फूलाचा, ग्राफीक्सचा अथवा एखाद्या अन्य प्रकारच्या बाबींचा असेल तर सरळ ती रिक्केस्ट डिलीट करा. त्याचे डिटेल्स शोधत बसू नका.

आपले प्रोफाईल लॉक करा. जेणे करुन अनोळखी व्यक्तींना आपल्या पोस्टस, मोबाईल नंबर, पत्ता दिसणार नाही.

जरी तुम्ही तुमच्या डिजीटल वरुन सोशल मिडीयाला लॉग-इन असाल तरी देखील पासवर्ड बदलत राहा. सोशल मिडीया अकाऊंटला तुमचा इ-मेल आय डी जोडून घ्या.तुम्ही वापरत असलेले डिजीटल डिव्हाईस वरील सर्व कॅचे, हिस्टरी याबाबी वेळोवेळी क्लिन करत रहा.

सर्वात महत्वाचं सर्व सोशल मिडीया अकाऊंटस् ला टु-वे व्हेरिफीकेशन ही फॅसीलीटी त्वरीत करुन घ्या.

तुमचं सोशल मिडीया अकाऊंट तुमची जबाबदारी... तो मी नव्हेच म्हणून चालणार नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा


Monday, May 10, 2021

Last Tweet of Kangana Ranaut

अभिनेत्री कंगना राणावत तिच्या बिनधास्त ट्वीटसमूळे गेल्या काही दिवसात चांगलीच चर्चेत आली होती. मग ते  मुंबई पोलीस यांचे बाबत असो किंवा समाजात घडणा-या अनेक ब-यावाईट घटनाबाबत असो.


अर्थात सोशल मिडीया हा प्लॅटफॉर्मच स्वताची मते जगासमोर मांडण्यासाठीच तयार करण्यात आलाय. कोणीही येथे कोणत्याही विषयावर आपली मते मांडू शकतो हा नियम सर्व सामान्य जनतेला लागू पडतो. पण जे सामाजिक स्तरावर काम करतात मग ते नेते असो किंवा कलाकार त्यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या प्रत्येक पोस्टवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे असते.

कंगना राणावत ही तशी शुन्यातून विश्व निर्माण केलेली हरियाणाची अभिनेत्री. यशाची हवा डोक्यात गेली की डोक गरगर करायला लागत हा अनुभव सर्वानांच येतो. मग राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त असलेली कंगना याला अपवाद कसा राहू शकते नाही का.

धडाधड अगदी रोजच टीव टीव वाचून तीचे चाहते चर्चा करु लागले. वातावरण बदललं तसं तीच टीव टीव करणही बदलत गेल. तीच्या ट्वीटस् आवडीने वाचल्या जावू लागल्या त्यास views, like, comment, share मिळत गेल्या फॉलोअर्सची ही संख्या प्रचंड वाढत गेली तसतस ती बेताल होवून ज्या विषयाशी तिचा काडीमात्र संबंध नाही त्याबाबतही टीव टीव करत राहीली आणि इथचं ती चूकत गेली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबतचे ट्वीट तिच्या ट्वीटमधील उतरती पायरी मानली जावू शकते. तिथून ती जास्तच ट्रोल होवू लागली. त्या आधी काही प्रमाणात मिळालेले यश तिला तेव्हापासून मानवले गेल नाही.


बरेच ट्वीटरकर तीचं अकौंटच सस्पेंड करा अशी मागणी करु लागले. अशा काळातही कंगना बेताल टीव टीव करतच गेली.

मीच राणी महाराणी आख्ख्या देशात माझ्यासारख कोणीच नाही हे सिद्ध केल ते तिला या वर्षी केंद्र सरकारने दिलेल्या Y सुरक्षा आणि गेल्या वर्षी एकाही चित्रपटात काहीही काम न करता पुन्हा राष्ट्रीय पारितोषिक अलगदपणे बहाल करणं.

यामूळे कंगना एखाद्या परी प्रमाणे हवेतच तरंगू लागली. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या निडवणूका लागल्या आणि सत्ताधारी पक्ष निवडून आला. निकाल लागताच तेथे दंगल सुरु झाली. या परिस्थीत कंगना आपला ज्याच्याशी काडी मात्र संबंध नाही ज्या विषयातील आपल्याला काहीही समजत नाही त्या दंगली विषयी टीव टीव करुन गेली जे पंतप्रधान माननीय मोदी आणि पश्चिम बंगाल सरकार या दोघांनाही रुचल नाही आणि जे देशाच्या सामाजिक हितास बाधा आणणारे ठरले.

ते नेमके ट्वीट हे होते...


या ट्वीटमूळे ट्वीटरवर गहजब उडाला. जरी तीने तिची चूक लक्षात येताच ते डीलीट केल तरीही जो बूंद से गयी ... या उक्तीप्रमाणे घडल. अनेक जणांनी तिचा खरपूस समाचार घेतला.

ट्वीटर इंडीयाने या ट्वीटची गंभीर दखल घेत तीच अकौंट कायमस्वरुपी सस्पेंड केलं. जो तिला जबरदस्त धक्का आहे. तीने इंस्टाग्रामचं अकौंट ओपन केलय तेही बंद झाल्याची चर्चा आहे.

यावरुन एकच बोध घ्यावा उतू नये मातू नये यशाची हवा डोक्यात घालू नये...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन आवर्जून कळवा. आम्ही आपल्या करिता माहितीयुक्त, प्रेरणादायी, मनोरंजनात्मक लेख घेवून येत असतो. आवडल्यानंतर लाईक व शेअर जरुर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. 

तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.

धन्यवाद...

हेही वाचा

Important information to contact the forts of Maharashtra in case of emergency

आपत्कालीन परिस्थितीत गडांवर संपर्क साधण्यासाठी महत्वपूर्ण माहिती पावसाळ्याच्या हंगामात अनेक ट्रेकिंग प्रेमी सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर भटक...