ताकद वाढण्यासाठी अंडी ,मटण, चिकन,मासे खावे का?
कोरोना मधील आहार - शंका व समाधान
अंडी:-सध्या कोरोना मध्ये बहुतेक सर्वजण अंडी खात आहेत किंवा कधी सुरू करू असे विचारत आहेत.
अंडे हा पूर्ण गर्भ आहे.(High protein) साहजिकच पचायला जड , उष्ण - उष्णता वाढवणारा
बहुतांश ठिकाणी ब्रॉयलर कोंबडी ची अंडी मिळतात (क्वचित गावठी कोंबडीची) जी ब्रॉयलर कोंबडी व्यापारी उद्देशाने महिनाभरात स्टिरॉइड आणि तदसम आहार आणि इंजेक्शन देऊन वाढवली जाते.खरेदी करताना या कोंबड्यांचे सहज कुतूहल म्हणून निरीक्षण केले तर ती कोंबडी ज्या पद्धतीने वाढवली जाते त्यानुसार तिला स्वतःला स्वतःच्या पायावर उभे राहायची ताकद नसते किंवा पळायची ताकद नसते.
आयुर्वेदाच्या नियमानुसार आपण खाणार असणारा प्राणी हा चांगला असावा (शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त, शारीरिक व्यंग नसणारा ,आजारी-रोगी नसावा,चपळ तंदुरुस्त प्राण्यांचे मांस आणि अंडी जी ताकद देणार ती रोगट प्राण्यापासून मिळालेल्या मांस आणि अंड्यात नसते. & It really make sense.
याउलट देशी कोंबडी तयार व्हायला 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो.ती चपळ काटक आणि निरोगी असते. वाढीसाठी कोणतेही अवास्तव खाद्य आणि इंजेक्शन वापरलेली नसतात.देशी गावठी प्राण्यांच्या मांस आणि अंडी खाण्यातून जी ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढते ती साहजिकच सध्याच्या ब्रॉयलर मांस आणि अंड्यातून मिळणे दुरापास्त आहे.
चांगल्या प्रतीचे मांस आणि अंडी यातून हेच अभिप्रेत आहे.
मटण,मासे:-
हीच बाब मटण ,मांस आणि मासे या इतर मांसाहार बद्दल लागू होते.ते नैसर्गिक स्रोतांमधून उपलब्ध झालेले असावेत किंवा नैसर्गिकरित्या वाढवलेले कृत्रिम खाद्य औषधी विरहित मिळावेत यासाठी आपण आग्रही राहायला हवे.
आणि त्या पद्धतीचे उपलब्ध होत नसेल तर ते ताकदीच्या उद्देशाने खाल्ले गेले तर उपयोग होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता जास्त आहे.
ऋतू विचार
सध्या उन्हाळा चालू आहे.आयुर्वेदा नुसार या ऋतूत अग्नी मंद असतो . शारीरिक ताकद कमी असते.भूक मंदावते.बाहेर सूर्य त्याच्या उष्णतेने बाह्य सृष्टीचे जणू शोषण करतो.(याउलट हिवाळ्यात ताकद,भूक जास्त असते)
त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण ,पचायला जड पदार्थ टाळावेत. मांस, अंडी ,मासे मुळात उष्ण आणि पचायला जड त्यामध्ये वापरले जाणारे तिखट,आले-लसूण,मिरे आदी खडे मसाले सध्याचे सॉस,व्हिनेगर अजून उष्णतेत भर घालतात.मुळात कमी असलेल्या भुकेवर ताण येतो.आणि आजारपणात मंदावलेली भूक ,कमी झालेली ताकद वाढायच्या ऐवजी या प्रकारच्या आहाराने अपचन खाल्लेले न पचल्याने पित्ताचा त्रास, जळजळ,जेवण न जाणे आणि पुन्हा अशक्तपणा या चक्रात आपण अडकतो. बरे होण्याच्या ऐवजी आजार वाढण्यास आपणच हातभार लावतो.
म्हणून उन्हाळ्यात वाळा,गुलाब,चंदन इ थंड गोष्टींची सरबत पचायला हलका आहार घ्यावा.तेलकट तुपकट तळलेले मांसाहार शक्यतो खाऊ नये असा प्रघात आहे.
शरीराला ताकद म्हणून मांसाहार घ्यायचा झाल्यास तो चांगल्या प्रतीचा तसेच मांसरस,आळणी सूप,नारळाचे दूध घालून पांढरा रस्सा अशा हलक्या स्वरूपाचा असावा. तिखट ,मसालेदार,फोडणी,ग्रेव्ही,सॉस या गोष्टी टाळाव्यात
याऐवजी ओले खोबरे ,कोथिंबीर,कोकम,धने पावडर,दुधी भोपळा (प्युरी करण्यासाठी),तूप ,नारळाचे दूध सोलकढी यांचा मांसाहार सोबत वापर केल्यास उष्णता न वाढता ताकद वाढण्यास मदत होते.
सोबतीला गुलकंद,मोरावळा,आवळा,पेठा, सब्जा,वाळा,कोहळा यांचे सेवन उष्णता कमी करायला मदत करते.
लहान वाटी मुगामध्ये 2 अंड्या एव्हडी ताकद असते.प्रोटीन मिळते आणि कढणं स्वरूपात केल्याने मुगातील प्रोटीन आणि ताकद पाण्यात उतरते.liquid स्वरूपात घ्यायला सोपे,पचायला हलके,पित्त न वाढवणारे असे बलदायी कढणं पर्यायी म्हणून वापरणे योग्य.
तयार करण्याची पद्धत
लहान वाटी मूग, 7-8 ग्लास पाणी, उकळून मूग चांगले शिजल्यावर मुगातील पाणी गाळून घेणे
राहिलेले मूग घरात भाजीसाठी वापरणे
गाळलेल्या मुगाच्या पाण्याला जिरे लसणाची फोडणी देऊन चवीपुरते मीठ साखर घालून प्यायला देणे.
याप्रमाणे मुगाचे कढणं,मुगाचे इतर पदार्थ मुगडोसा, मुगलाडू,, गव्हाची लापशी,शेवया खीर,शिंगाडा पीठ यांचा वापर शहाकारी वर्ग करू शकतो.
वैद्य राहुल दिलीप चव्हाण
shashwatayurvedic.com
Cont- 9421619384
(वरील विषय हे वैद्यांचे वयक्तिक मत असून औषध वापर याविषयी सर्वजण सहमत असतील असे नाहीवापरा पूर्वी जवळील वैद्यांचा सल्ला घ्यावा ज्यांना आयुर्वेदाचे उपचार व विचार नको असतील त्यांनी कृपया मोठ्या मनाने दुर्लक्ष करावे)
तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला digitalshende@gmail.com या जीमेल वर सेंड करु शकता. आम्ही आपल्या नावासहीत इथे ते प्रसिद्ध करु.
धन्यवाद...